पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मीटचें कमिशन. ( २०५ ) व्यांत येते. त्या लोकांस मुलुखाबाहेर हकून लावणे, त्यांच्या नेमणुका बंद करणे, त्यांचे मागील पगार बरोबर न देणे, अन्यायाने पुष्कळ द्रव्य मिळविले आहे हे बोधित करण्या- करितां त्यांजपाशीं पुष्कळ पैसा आहे असे मिथ्या उल्लेख करणें, अशा प्रकारचे जुलूम त्यांजवर चालू असून त्यांचा पूर्णपणे छळ केला असतां अद्याप तृप्तीच होत नाहीं. मग अजून त्यांच्या कपाळी काय काय दुःखे भोगण्याची आहेत तें न कळे. त्यांस चार मंडळीत बसण्याची चोरी. ज्या छापखान्यांत हल्लींच्या बडोद्याच्या राज्यकारभाराविषयी चर्चा केलेली वर्तमानपत्रे छापली जातात त्या छापखान्यांत पाऊल ठेविण्याचीच चोरी. बडोद्याच्या राज्यकारभाराच्या संबंधानें कोणी कांहीं बूक छापले किंवा वर्तमानपत्रांत कांहीं मजकूर आला की, त्या लोकांवर संशय आहेच. त्याच्या मागें डिटेकटिव्ह लागले आहेतच. ते हतभाग्य लोक असल्या अनुपपत्तीने अगर्दी त्रस्त झाले आहेत. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा व अब्रु कशी राखावी याबद्दल त्यांत पंचाईत पडली आहे. त्यांस भीक मागण्याची लज्जा आणि मजुरी करण्याची अशक्तता अशा विपत्तील ते आहेत. बडोद्याच्या राज्यकारभारांत सर्प आहेत की, विंचु आहेत याबद्दल उठाठेव करून बुके छापविणे व वर्तमानपत्रांस बातम्या देणे याचे त्यांजमध्ये सामर्थ्यच कोठें उरलें आहे, परंतु इतकें मनांत आणतो कोण. एकाद्या मृतावर जसे घाव घालावे तसे त्यांजवर घाव होतातच आहेत. कोणी कोणास विचारलें कीं, हे कोण ह्मणजे अगोदर नोटोरियस या विशेषणापासून त्यांची हकीगत सांगण्यास आरंभ व्हावयाचा. हे विशेषण दुष्कर्मे करून लोकप्रसिद्धीस आलेल्या मनुष्यास लावितात असें दिसतें. जुन्या कामदारांपैकीं ज्याला अगदी इंग्रजी येत नाहीं आणि बहु- तकरून इंग्रजी येत नाहीं असेच पुष्कळ आहेत. त्याला देखील आतां असे समजूं लागलें आहे कीं, नोटोरियस शब्द निघाला ह्मणजे कांहीं तरी आपल्या संबंधी बोलणे चाललें आहे. असा त्याचा तर्क होऊन लज्जेने तो तेथून उठून जातो. अशी ही सत्ताविशिष्ट लोकांच्या लेखणीच्या अग्राची शक्ति आहे. ते एकदां नाश करण्यास प्रवृत्त झाले म्हणजे विषदिग्ध शराने जें कार्य होत नाहीं तें त्यांच्या पेनाने सहज होते. आलीकडे थोड्या दिवसांत कोणी अविचारी मनुष्याने इंग्रजीमध्ये एक लहानसें बुक छापून त्यांत हल्लींच्या राज्यकारभाराची पराकष्ठेची विटंबना केली आहे. सारांश त्या अविचा- री मनुष्याने आपल्या नीच स्वभावाची पराकष्ठा करून सोडली आहे. त्याप्रमाणे

  • मानाजी यशवंत मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीत न्यायाधीश होते. सर रिचर्ड मी- डच्या कमिशनांत त्यांचें कोठें नांव आलें नव्हतें व त्यांच्या रिपोर्टति देखील त्यांजविषय कांहीं लि- हिलें नव्हतें, असें असतां सर लुईस पेली यानी बडोद्याचा चार्ज घेतल्याबरोबर त्यांस कामावरून दूर केलें व सर रिचर्ड मोड यानीं त्यास बडोद्याहून हकुन लाविलें व सर टी. माधवराव यानी खंडेराव महाराज यानीं त्यांस करून दिलेली चार हजार रुपयांची वंशपरंपरेची नेमणूक बंद केली. कांहीं महिन्यावर त्यांस रेवाकाठ्यांतील उदेपूरचे संस्थानिक कारभारी नेमीत होते, परंतु पोलिटिकल एजंट यानीं त्यांस बडोद्याहून हकुन लाविल्याची सबब सांगून कार- भारी नमूं दिलें नाहीं. याप्रमाणें आई जेऊं घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी दुःखदा-

यक स्थिति झाली आहे. २६.