पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २०४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. लिहिले असून कडून जुलूम झाल्याबद्दल चार प्रकरणे कर्नल फेर याण मुंबई सरकारच्या कानावर नेली. होती, त्यांपैकी दोन मुकदम्यांत कांहीं लांच घेतल्याबद्दलचा संबंध नव्हता. तिसऱ्या मुकदम्यांत नवसरीच्या कामदारांनी एका पारशाजवळ दिवाणी मुकदम्याच्या संबंधाने लांच मागितला असतां दिला नाहीं, ह्मणून त्या पारशास कैद केल्याबद्दल चौथा मुकदमा नाना साहेब खानविलकर यास लांच दिल्याबद्दल होता. त्याखेरीज इतर कामदारांपैकी कोणावर देखील रेसिडेंट साहेब यांजकडे कोणी लांचेबद्दल फिर्याद केली. नव्हती, व रेसिडेंट साहेब याणीही त्या रिपोटांत कोणाचे नांव लिहिले नव्हते. डेप्युटी रोव्हन्यु कमिशनर नारायणभाई ललुभाई याणी अन्यायोपार्जित द्रव्य नडियादेस पाठ- विलें आहे तें व नाना साहेब खानविलकर याण कोंकणांत पाठविलें तें परत ओकविण्या- विषयीं महाराज अनुमोदन देतील तर पंधरा अगर वीस लाख रुपयांची महाराजांस प्राप्ति होईल, असें रेसिडेंटाना महाराजांबरोबर भाषण केलें त्याजबद्दल मजकूर होता. नाना साहेब खानविलकर याजला लांच दिल्याबद्दल सदहू रिपोटांतील सहावे कलमांत नो मजकूर लिहिला होता तो अधिकाराच्या जागा विकून भारी लांच घेण्याच्या संबंधाने जो मजकूर मुंबई सरकारच्या पत्रांत लिहिला होता त्यास लागू होता, परंतु त्यांत इतर कामदारांचा कांहीं एक संबंध नव्हता, असे असतां नाना साहेब खानविलकर यांनबरोबर बहुवचनाने दरबारांतील सर्व कामदारांस गोविलें होतें. हा आम्हीं जी दुसरी एक पद्धत सांगितली आहे तिचा मासला आहे. मुंबई सरकारच्या पत्रांतील जे कलम टिपेंत लिहिले आहे त्यांत “ शाबित करून देण्यांत येईल तर " अर्शी अक्षरे आहेत त्याप्रमाणें कमिशनापुढे कामदार लोकांवर लांच घेतल्याबद्दलचे आरोप शाबित झाले काय ? अपराधाची शाबिती तर एकीकडे राहूद्या. कमिशनापुढे कामदार लोकांपैकी गोविंदराव मामा, बळवंतराव देव वैगेरे लोकांविषयीं कोणी एक शब्द देखील वाईट बोलला काय ? जाहिरनामे लावून मिथ्या आरोप करणारांस आणि खोटया साक्षी देणारांस उत्तेजन देण्यांत आलें असतांही त्या कामगार लोकांवर कोणी फिर्यादी करण्यास पुढें आला नाहीं, हा त्यांच्या प्रामाणिकपणाचा आणि जनानुरागाचा भक्कम पुरावा असून कमिशनास किती एक कामदाराचे मागील दोष उकरून काढावे लागले आणि त्यांतही खरेपणाचा अभाव फार, आणि महाराजांच्या राज्यकारभाराच्या संबंधाने त्या लोकांस कांहीं दोष लावितां आला नाहीं, हे देखील त्यांच्या प्रामाणिकपणाचा ज्यास्त पुरावा आहे. . मल्हारराव महाराज यांच्या राज्यकारभाराशी फक्त संबंध ठेविल्यामुळे काय हो हा दारुण परिणाम झाला ! कमिशनच्या अधिकाऱ्यांचे किती हो भयंकर स्वातंत्र्य ! कमिशनानी पुरा - व्यावांचून कोणाच्याही अब्रूवर खुशाल हल्ला करून त्यास दोषी ठरवावें, आणि त्यांच्या अभिप्रायाचें ग्रहण करून त्यांच्या वरिष्टानी खुशाल त्या लोकांस नौकरीवरून काढून टा- कण्याविषयीं राजास आज्ञा करावी. बरे इतक्याने तरी त्या बिचाऱ्यांची सुटका झाली काय ! नाहीं. कमिशनानी त्यांच्याविषयी वाईट लिहिले हे त्यांच्या कपाळचे सटवीचे लेख हो- ऊन बसले आहेत. त्यांस कोणी जोड्यापाशीं देखील उभे राहू देत नाहीं. त्यांस कोणी चाकरीस ठेवीत नाहीं व कोणी संस्थानिक चाकरीस ठेवू लागला तर त्यास हरकत कर