पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मीटचें कमिशन. ( २०३ ) सला देण्यांत त्यांस कांही तरी अर्यलाभ होता काय ? लोकांच्या बायका - धरून राजवाड्यांत आणणे, या अभ्रमपणाच्या कृत्यांत कामदार लोकांचा संबंध होता किंवा त्याणी तशी मल्हारराव यांस सला दिली असें कोणाच्याने तरी म्हणवेल काय ? महालची कामे व त्याखेरीज इतर कारखाने यांपैकी कोणतेही कामाशी मल्हारराव यांचे अमलांत कामदार मंडळीनीं बिलकुल संबंध ठेविला नव्हता. पैसा जमा करणे अथवा खर्च करणे अशा कोणत्याही कामाशी कामदार मंडळीचा संबंध नव्हता, हें एक त्यांच्या निस्पृहप- णाचे प्रमाण आहे. गवरनर जनरलच्या ठरावावरून कामदार मंडळीपैकी काही लोकांनी आपल्या नौकरीचा राजीनामा दिल्याबरोबर त्यांस दरबारच्या पैशाचा हिशेब देणे किंवा एकाद्या कामाबद्दल जबाबदारी देणे, असें त्यांजकडे कांही एक उरले नव्हते. एकंदर महाल व कारखाने यांची वाटणी नाना साहेब खानविलकर वगैरे सरकारचे आप्त, आणि महारा- जांच्या पूर्वाश्रमांतील मंडळी यांनमध्ये झालेली होती. सारांश, देशी राजांच्या दरबारांतील अन्यायाने पैसा जमा करण्याच्या जाग्यांशी कामदार मंडळीचा कांही संबंध नव्हता. याप्रमाणें नानासाहेब खानविलकर यांच्या अनन्वित कर्मामध्ये आपला अर्थ साधून घेण्यासाठीं कामदार मंडळीनी वांटा घेतला नसतां ते चांगल्या चालीचे नाहींत, व कामास लायक नाहींत असें म्हणणें प्रमाणावांचून कसे शोभेल ! नेटिव दरबारच्या कामदारांवर बदसलागारपणाचा आरोप आणण्याची जशी एक इंग्रज सरकारची ठरीव पद्धत आहे, तशीच दुसरी ते सर्व लांचखाऊ आहेत असे म्हणण्याची एक ठरीव पद्धतच आहे.

बडोद्याच्या राज्यकारभाराविषयीं मुंबई सरकारानी इंडिया सरकारास ता० २९ आगष्ट सन १८७३ नंबर ६४ टी निशाणीचे पत्र लिहिले. त्यांतील कांहीं वाक्यांत आम्ही वर लिहिले आहे त्याजविषयीं प्रमाण सांपडेल. सदर पत्राचे पहिल्या कलमांत ते असे म्हणतात कीं, रेसिडेंट साहेब याणी किती एक कामाविषयीं जाहिर केले आहे त्याजविषयीं जर पु- रावा होईल तर त्यावरून असे सिद्ध होईल की, फारच जुलूम करण्यांत येत आहे, व प्रधान आणि दुसरे अधिकारी, अधिकाराच्या जागा विकून भारी लांच घेण्याचा सांप्रदाय करून बसले आहेत. वाचणारांनी लक्षांत ठेवले पाहिजे की, वरील वाक्यांत मंत्री आणि कारभारी हो • बहुवचने आहेत. ७५६ आतां आपणास पाहिलें पाहिजे की, वरील वाक्यांत रेसिडेंट साहेब यांच्या नंबर 932 च्या रिपोर्टावर मुंबई सरकाराने हवाला दिला होता, त्यांत दरबारांतील कोण कोणत्या कामदारांची नांवे आली होती. हा रिपोर्ट मी अक्षरशः वाचला. त्यांत ब्रिटिश सरकारच्या रयतेवर, गायकवाडां-

  • " The appended letter from the Resident No. 144 756 of the 18th instant, has brought to notice various caces which, if substantiated, will establish that gross op- pression is commited that the Ministers and other officers systematically receive heavy bribs in connection with the sale of offices ( Blue Book No. I Page 16. )