पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २०२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. राणी जनाबाई साहेब यांचे मंत्री आहेत. इंग्रज सरकारची ज्यांजवर अवकृपा झाली त्यांच्या विरुद्ध पक्षाचा आश्रय केला म्हणजे इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्था- पित केलेल्या सर्व दोषांपासून मुक्तता होऊन लागलीच ते इंग्रज सरकारच्या कृपेला पात्र होतात. भाऊ तांबेकराबरोबर गणेशपंत भाऊंचे वैमनस्य हेच त्यांजवरील कल्पित आ- रोपाच्या परिमार्जनास कारण झालें, त्याचप्रमाणे मल्हारराव महाराजांबरोबर जम्नाबाईचा वैरभाव आणि अण्णा किबे जम्नाबाईचे आश्रित यामुळे त्यांच्या दोषाचे क्षालन होऊन ते पवित्र झाले. गणेशपंत भाऊ व अण्णा किबे यांजविषय आह्मीं लिहिलें आहे, त्यांत त्या सद्- गृहस्यांस उद्देशून लिहिण्याचा आमचा मुळींच हेतु नाहीं. ते राजाचे बदसलागार नव्हते, व त्यांच्या चालीही वाईट नव्हत्या. त्यांचे उदाहरण येथे दाखविण्याचा आमचा हेतु इतकाच आहे की, आपल्या देशांतील राजेरजवाड्यांवर इंग्रज सरकारची इतराजी झाली म्हणजे त्या दरबारांतील सदाचरणी, प्रामाणिक, नेकसलागार, आणि शहाणे कामदार देखील दुराचरणी, अप्रामाणिक, बदसलागार आणि मूर्ख ठरतात आणि त्या लोकांस न्याय मिळण्यास जागाच राहात नाहीं. बडोद्याच्या दरबारांत ज्यानी पुष्कळ वर्षे प्रामाणिकपणाने नौकरी केली, ते मल्हारराव महाराजांचे कारकीर्दीत दुराचरणी व बदसलागार कसे होतील याबद्दल कमिशनानी यो- 'डासा विचार करावयाचा होता, व त्याणी मल्हारराव महाराजाच्या नैसर्गिक स्वभावाकडे व त्यांच्या भूतकालिक आचरणाकडे लक्ष देऊन कामदार लोकांविषयीं मनांत तोल करावयाचा होता म्हणजे खरोखर त्या दुर्दैवी लोकांचा बचाव झाला असता. आम्ही मागे एके ठिकाणी लिहिले आहे की, मल्हारराव महाराज यांचा दिवाण जर चांगला असता तर मल्हारराव महाराज यांचे दुर्गुण दिवाणाच्या सद्गुणांत कदाचित लपले देखील असते. खंडेराव महाराज यांचे आप्त व प्रीतिपात्र लोक यांजवर केलेला लोकांच्या स्त्रिया राजवाडयांत आणून त्यांजबरोबर केलेल्या चेष्टा याबद्दल जुलूम आणि - मात्र काय कांहीं सामान्य नजराणे घेऊन मल्हारराव महाराज स्वतः जबाबदार होते. आतां ही त्यांची दोन्ही दुष्कर्मे नव्हतीं, परंतु त्यांखेरीज इतर सर्व दुष्कर्माचें मूळ काय तें नाना साहेब खानवेलकर होता, आणि सर्व गोष्टी त्याच्या दिवाणगिरीत झाल्या होत्या. महाल इजानें देणें, एकाची मिळकत दुसऱ्यास देणे व हुद्याच्या जाग्याची वि करणे, ह्या सर्व गोष्टी नाना साहेब याणी केल्या. करणे, सावकार लोकांच्या नेमणुका व इनामें बंद जप्त करणे, ह्या सर्व गोष्टी नाना साहेब यांचे दिवाणगिरीचे कारकीर्दीत घडल्या. दिवाणाची नेमणूक करण्याची स्वतंत्र जोखम जर मल्हारराव महाराज यांजकडे नसती, व इंग्रज सरकारानी जर त्यांस स्वतंत्रपणे हा अधिकार दिला नसता तर ह्या सर्व दुष्ट कृत्यांची जबाबदारी दि वाणावर आली असती. शिलेदार लोकांचे एकंदर पगार कमी करणे, व इनामदार लोकांची इनामें राजाच्या व दिवाणाच्या ह्या दुष्ट कृत्यांशी इतर कामदार लोकांचा काय बरे संबंध होता ! खंडेराव महाराज यांच्या मेहेरबानींतील मंडळीवर जुलूम करण्याविषयीं महाराजांस