पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मीडचे कमिशन. (२०१ ) वाड यांचा रेसिडेंटाबरोबर जेव्हां बेबनाव झाला, तेव्हां महाराजांजवळ जे कांही कामदार होते त्या सर्वांस महाराजांचे बदसलागार लोक ही पदवी मिळाली. गणपतराव महाराजांचे कारकीर्दीत बडोद्याचे दिवाण भाऊ तांबेकर यांचे आणि सर औटराम साहेब यांचे वैमनस्य पडले तेव्हां दरबारांतील सर्व कामदार महाराजांचे बदसलागार असे ठरवून भाऊ तांबे- कर यांजसुद्धां सर्वांस दरबारांतून हकून लाविलें. तीच पद्धत मल्हारराव महाराजांच्या दरबारांतील कामदारांविषयीं सारासार विचार न करितां नेहमींच्या सांप्रदायाप्रमाणे इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यानीं स्वीकारिली आहे. जेथे जेथें म्हणून मल्हारराव महाराजांच्या कारकीर्दीचा संबंध आला तेथें तेथें दरबारच्या कामदारांचा संबंध असो अगर नसो, बेधडक बदसलागार या पदवीचें त्यांस बक्षीस मिळाले आहे. नेकसलागार अथवा बदसलागार ठरविणें हें ब्रिटिश रेसिडेंटाच्या मेहेरबानीवर व इतराजीवर अवलंबून असते. त्यास एकाद्या दुर्दैवी मनुष्यास सतत बदसलागार लोकांच्या मालिकेत गोंवितां येतें, अथवा त्यांतून काढून नेकसलागार लोकांच्या मालिकेत मेरुस्थानी स्थापन करितां येतें. सयाजीराव महाराज यांचे कारकीदीत गणेश सदाशिव ओझे हे महाराजांचे सलागार होते. इंग्रज सरकारची ज्या लोकांस जामिनकी होती त्यांजविषय महाराजांचे दु- ष्टभाव उत्पन्न करितात, असा त्यांजवर आरोप आणून रेसिडेंसीकडील कोणत्याही कामांत त्याणीं कांहीं बोलूं नये असा प्रतिबंध केला होता. प्रतिबंध कर- ण्याचा तरी हा एक अपूर्व मासला होता. या आरोपास प्रमाण काय ते इंग्रज सरकारच्या जामिनकीच्या बळावर जे लोक महाराजांस तुच्छ मानून हमेषा रेसिडेंटाचे कान भरीत होते त्या लोकांचें सांगणे. या जामिनकीचा शेवटीं परिणाम काय झाला हे सर्वांस माहित आहे. जोपर्यंत जामिनगिरीचा संबंध कायम राहिला तोपर्यंत हर्दू सरकारच्या दरम्यान कधींही मनःपूर्वक रहस्य राहणार नाहीं असे इंग्रज सर - कारच्या प्रचितीस आले, आणि म्हणून त्याणी सर्व प्रकारच्या जामिनक्या काढून टाकून आपली सुटका करून घेतली.. गणपतराव महाराज यांचे कारकीर्दीत भाऊ तांबेकर जेव्हां कारभारी झाले तेव्हां ग- णेशपंत भाऊ यांस दरबारची चाकरी सोडून जावे लागले. भाऊ तांबेकर यांस कामा-' वरून दूर केले तेव्हां गायकवाड सरकार यानी गोविंदराव रोडे यांस मुख्य कारभारी नेमून गणेशपंत भाऊ यांस त्यांचे मदतनीस नेमिलें, दिवाण पसंत करणे हा अधिकार त्यास- इंग्रज सरकारच्या हातांत होता, व सयाजीराव महाराज यांच्या वेळेस गणेशपंत भाऊ नुस्ता फडणिसाचा कारभार करीत असतां त्यास बदसलागार ठरविले होतें, त्यास पुढे बडोद्याचे दिवाण केलें तेव्हां त्याविरुद्ध रेसिडेंट साहेब याणी एक अवाक्षर देखील काढले. नाहीं. जो मनुष्य रेसिडेंसीचे कामांत बोलण्यास योग्य नव्हता त्यास रेसिडेंसींतून लष्करी मान मिळू लागला, व सर्व राज्यांत त्याची अकुंटित सत्ता चालू लागली. भाऊ तांबेकर यांचे मसलतदार अंणा किवे याणी नुसता बडोद्यांत पाय दिला की, त्यांचे मागे पोलिसचे शिपाई लावून त्यांस बडोद्याच्या हद्दीबाहेर घालवीत असत, त्याच गृहस्थास सर टी. माघ- वराव यांच्या दिवाणगिरींत बडोद्याच्या दरबारांतून एक मोठी नेमणूक मिळते, आणि ते