पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २०० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. याणी त्यांस लांच घेतल्याबद्दल कैदेत ठेविले असते तर असिस्टंट रोसेडेंट साहेब याणी त्यांजबद्दल शिफारस केली असती व कर्नल बार साहेब याणीं त्यांस टेका दिला असता असे संभवतें तरी काय ? • बळवंतराव यशवंत हुजूर फौजदार यांस दुसरा असा दोष दिला आहे कीं, कमिशना- पुढे ज्या कांहीं वाईट गोष्टी आल्या त्यांपैकी कितीएक कामांत ते मिसळले आहेत असें निदर्शनास आले आहे. बळवंतराव यशवंत हे वाईट कामांत मिसळले आहेत म्हणजे काय ? दामोदरपंत नेन्या जसा व्यभिचारी कर्मामध्ये मिसळला होता तसे बळवंतराव यशवंत दुर्नयामध्ये मिसळलेले कमिशनास आढळले होते काय ? त्या सद्गृहस्थांनी तशा प्रकारचें तर कोणतेंही कृत्य केले नवते. त्यांजकडे फौजदारीचा अधिकार होता, यामुळे महाराजांच्या हुकुमाप्रमाणे लोकांस पकडणें, कैद करणे, बेड्या घालणे, फटके मारविणें, हैं काम त्यांचे कपाळी आलें होतें, आणि त्याबद्दल न्यायान्यायाची निवड जर मल्हारराव याणी त्यांस करूं दिली नव्हती तर तेथे त्यांचा कांहीं एक इलाज नव्हता. कायदेशीर हुकूम असतील तितके मात्र त्याणी अमलांत आणावे आणि गैर कायदेशीर अमलांत 1. आणू नये, असा नियम ठरला होता काय ? तात्या पवार याजला विषप्रयोग केल्याच्या गुन्ह्याबद्दल मल्हारराव याण ज्या लोकांस फटके मारण्याचा हुकूम केला होता, त्यांस फी- जदार आपल्या हुकुमाप्रमाणे फटके मारितात किंवा नाहीं याजविषयीं शोध करण्यासाठी मल्हारराव महाराज याणी आपल्या खाजगी मंडळीपैकी कांही लोक गुप्त हेर म्हणून पाठ- विले होते आणि फटके मारण्यांत कांहीं हयगय झाली तर फौजदाराची तशीच दुर्दशा मल्हारराव महाराज करणार होते. अशा संकटांत बळवंतराव यशवंत होते. त्यांस आ- पल्या हुद्याचा राजीनामा देऊन देखील सुटका नवती. गोविंदजी नाईक यास महाराजानी तीव्र यातना करून मारविल्याबद्दल मागे लिहिले • आहे. याबद्दल सर लुईस पेली यांचे अमलांत चौकशी झाली, व त्याबद्दल त्याणी हिंदु- स्थान सरकारास ता० २५ फेब्रुवारी सन १८७५ रोजी रपोट केला. त्यांत त्याणी लि- हिले आहे कीं, गोविंदजी नाईक याचे पायांत बळवंतराव यशवंत याणी हलक्या वजनाची बेडी घातली होती त्याबद्दल महाराजानी आपली नाखुषी दाखवून मुद्दाम सव्यामण वजनाची नवी वेडी करविली आणि गोविंदजी नाईक याजवर देखरेख करण्यासाठी आपल्या खास- गी मंडळीपैकी तात्या टोणपे यांस नेमिलें. यावरून उघड होते की, मल्हारराव महाराज यांच्या अवोर कृत्यांत कोणत्याही प्रकारचें बळवंतराव यशवंत याचे अंग नव्हते. एकाद्या नेटिव दरबारावर इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्याची इतराजी झाली किंवा त्या दरबारापासून कांहीं अर्थ साधून घ्यावयाचा असला आणि त्यांत दरबारी लोक प्रतिकूळ असले म्हणजे त्या दरबारी लोकांत कांहीं एक अवड नावड न करितां त्यांस राजाचे बद- सलागार लोक म्हणून संज्ञा देण्यापासून आरोप करण्यास आरंभ करावयाचा अशी एक ठरीव पद्धतच आहे. ह्या बडोद्याच्या राष्ट्राच्या संबंधाने ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यानी या मागें जीं वर्तनें केलीं त्यांतच अशी पुष्कळ उदाहरणे सांपडतात. सयाजीराव गायक-