पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचे कमिशन. ( १९९ ) बडोद्याच्या दरबाराला त्यांस नोकरीत ठेवू दिले नसतें. ते रेसिडेन्ट होते तेव्हां दिवाणाच्या बरोबर कामकाजासाठी नारायणभाई नेहमी रेसिडेन्सींत जात होते, यावरून कमिशन म्हणतात तसे कांहीं झालें होतें असे वाटत नाहीं. आतां ते परदेशस्य असून बडोद्यांतील लोकां- शीं त्यांचा संबंध तादृश असल्यामुळे लोक त्यांस तितके चाहत नवते, पण हा दोष सर्व परदेशस्थ लोकांच्या कपाळी सारखा लागू आहे. बडोद्याच्या राष्ट्रांतील राहणाऱ्या लोकांस त्या राष्ट्रांतील लोकांची भीड मुक्त पडेल व त्यांच्या हिताविषयीं त्यांस जितकी कळकळ असेल तितकी परकीय लोकांस कधीही असणार नाहीं व त्यांच्या हातून लोकांचे तितकें चांगले कधीही होणार नाहीं. आज बडोद्याच्या राज्यकारभारांत काय ती मोठी उणीव हीच आहे की, ज्यांच्या हातीं लोकहित करण्याचा अधिकार आहे ते मोठे कामदार सर्व परदे - शांतील असल्यामुळे त्यांस जुन्या लोकांविषयीं दया नाहीं, माया नाहीं आणि त्यांच्या हिताविषयीं जितकी असावी तितकी काळजी नाहीं, मग त्याबद्दल नारायणभाई यांजकडे- सच दोष कां ? हे नवे लोक प्रजानुरागाचें गांठोडे बरोबर घेऊन जातील अशी स्वप्नांत - . ही कल्पना आणूं नका. बळवंतराव यशवंत यांस खंडेराव महाराज याणी लांच घेतल्याबद्दल कैदेत ठेविले होते असे आम्हास कळविण्यांत आलें असें कमिशन म्हणतात. ही गोष्ट सर्वथैव खोटी आहे. त्या सद्गृहस्थावर लांच घेतल्याबद्दल कधीही आरोप आला नव्हता. भाऊ शिंदे यांचे व बळवंतराव यशवंत व त्यांचे बंधु नानाजी यशवंत यांचे पराकाष्ठेचें वैमनस्य असे. भाऊ शिंदे ह्यांजकडे जेव्हां दिवाणगिरी होती तेव्हां या उभयतां बंधूकडे मोठी कामे असून त्यांजवर कांहीं आरोप आणावा यासाठीं भाऊ शिंदे डोळ्यांत तेल घालून बसले होते, परंतु त्यांस कांहीं देखील छिद्र सांपडलें नवते. याप्रमाणें त्याणी खंडेराव महाराज यांच्या अमलांत दिवाणाच्या द्वेषाची परवा न ठेवितां एक निष्ठेने चाकरी केली होती. खंडेराव महाराज यानी आपल्या मरणापूर्वी उभयतां बंधूंस घराबाहेर जाण्याचा प्रतिबंध केला होता. इतक्या पुरता मात्र कमिशनचा लेख खरा आहे, पण त्याचें कारण निराळेच होते. भाईचंद जव्हेरी यांचे त्यांजकडे कर्ज होते त्याच्या फेडीसाठी त्यांस अटकावांत ठेविलें असें वरकांती दाखविलें होतें, परंतु आपणास पुनः दिवाणगिरी मिळण्याच्या कामांत ते विघ्न करितात असे भाऊ शिंदे याणी महाराजांचे मनांत भरविल्या- मुळे त्यांचे कोणा बरोबर दळण वळण होऊं देऊं नये म्हणोन त्यांस प्रतिबंध केला होता. भाऊ शिंदे दुसऱ्याचा घातपात करण्यास कसकशा युक्त्या योजीत हे मार्गे सांगितले आहे, त्याजवरून सर्वांस कळोन आले आहे कीं, कोणत्याही गोष्टींत खुदाच्या साक्षात्काराचा संबंध आणोन महाराजांचे मनांत भरवून देणे हे त्यास अगदी शक्य होते; तथापि देखील उभयतां बंधूंनी कोणापासून लांच घेतला किंवा दुसरें कांहीं दुष्ट आचरण केलें असे त्यांनवर त्यांच्याने निमित्त आणवलें नाहींच. मल्हारराव महाराज राज्याधिकारी झाल्यावर या उभयतां बंधूंविषयीं बडोद्याचे माजी असिस्टंट रेसिडेंट सालमीन साहेब याणी शिफारस केल्यावरून बळवंतराव यांस सरफौजदार आणि नाना यांस न्यायाधीश नेमिलें असे आम्हीं मार्गे सांगितले आहे. खंडेराव महाराज