पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १९८ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- आतां हरीवा गायकवाड यांचा सारा जन्म राजांच्या समागमांत गेल्यामुळे राजांपासून . जी कांहीं अयोग्य आचरणे झाली त्याबद्दल हरीबा दादा यांस वाटेकरी केले तर त्या अप- वादाचें क्षालन करणे कठीण आहे; कारण राजांची मनोधारणा करून त्याणी आपण उदयास आणिले होते, परंतु त्यांचे मन दुष्ट नव्हते. त्यांस न्यायान्याय काय हे चांगले कळत होतें. ते लांच खाऊ आणि जुलमी नवते, आणि राजा जर अन्यायप्रवृत्त झाला. तर युक्तिप्रयुक्तीने त्याचे मन वळविण्याकरितां ते यत्न करीत असत, व त्यांच्या यत्नापासून चांगले परिणामही झाले आहेत; पण ते थोडे म्हणून लोकदृष्टीस आले नाहींत. राजे • जर न्यायी असते तर त्यांच्या समागमास हरीबा गायकवाड अगदी योग्य असें त्यानी जगा- .पासून म्हणवून घेतले असतें, परंतु विषयलंपठ, छांदिष्ट, आणि अनपवर्ती राजांबरोबर त्यांचा संबंध घडल्यामुळे त्यांस तदनुवर्ती होऊन वागावे लागले. गणपतराव महाराज यांच्या चांदणीच्या मोजेत, खंडेराव महाराज यांच्या शिकारीच्या आणि खबुत्रे उडविण्याच्या छंदांत, व मल्हारराव महाराज यांजबरोबर होळीचे रंग खेळण्यांत हरीबा दादा प्रमुखत्व स्वीकारून वागत होते, आणि तसे केल्यावांचून त्यांचा इलाजही नव्हता; यामुळे त्यांच्या कपाळी कालिमा लागळी आहे खरी, परंतु वास्तविक रीतीने पाहिले असतां राजाचा समागम सुटला की, त्यांची खतःची स्थिति अशी लोकनिंद्य नवती की, त्यांस लोकानी राजांच्या दुर्वृत्त वृक्षाचं बीज काय ते, हरीबाच होते असे म्हणावें. कसेही असो, कोणत्याही राजाच्या वाईट राज्यकारभाराला स्वतः हरीबा दादा कधीही प्रेरक झाले नाहींत. राजाच्या इच्छेला मात्र अनुसरले होते, आणि नाहीं अनुसरत असा आहे तरी कोण ? डेप्युटी रिव्हिन्यु कमिशनर नारायणभाई यांस ब्रिटिश सरकारच्या नौकरींतून काढून दिले होते असें कमिशन यानी म्हटले आहे. बडोद्याच्या दरबारांत जेव्हां त्यांस नौकर ठेविलें तेव्हां बडोद्याचे रेसिडेंट कर्नल बालिस साहेब होते व ते रेवाकांठ्याचे पोलिटि- कल एजंट असतां नारायणभाई त्यांचे दप्तरदार होते. त्यांजकडे कांहीं दोष लागू करून त्यांस ब्रिटिश सरकारच्या नौकरीवरून बरतर्फ केले असते तर कर्नल वालिस साहेब यानी (मागील पृष्ठावरून.) सारांश सारासार विचार करून पहातां त्यांच्या राज्यकारभारांत दोषापेक्षां गुण फार आहेत, हें निर्मळ मनानें कबुल करून त्यांजामुन बडोद्याचे राष्ट्राचे जे हित झाले आहे त्याबद्दल आपण पराकाष्टेचे कृतज्ञ असावे आणि त्यानी आपण कांहीं ज्यास्त केलें नाहीं असे मानावें हें योग्य; कारण सुविद्या आणि अनुभव यांचा तो स्वाभाविक परिणाम होय. आम्रवृक्षाने अमृतफळे दिलों यांत आश्चर्य तें कोणतें !! त्या वृक्षापासून सर्वांनी अमृतफळाची अपेक्षा करावी अशी त्याची योजता असतां त्याने पंक्तीप्रपंच करून एकास अमृत फर्के आणि दुसन्यास फळें दिली तर त्याबद्दल त्यास दोष देणाराकडे कांहीं अकृतज्ञतेचा दोष लागू होतो असे वाटत नाहीं. तोंडाने सत्यास सर्व मान देतात व उत्तम उपयुक्त नियम प्रौढ शब्दांनी उल्लेखित करणारेही पुष्कळ आहेत, परंतु तदनुरूप वर्तन करणारा पुरुष फार विरळा. जे कोणी आपला स्वार्थ साधण्याकरितां असत्य स्वीकारून सत्याचा अपमान करितात ते समजून उमजून तसे करतात सबब त्यांत आश्चर्य नाहीं, परंतु नवल हैं कीं जे प्रामाणिक आहेत व कोणतीही गोष्ट लपविण्यास किंवा अन्याय करण्यास इच्छित नाहींत, ते कांहीं प्रकारांत सत्यावर ठेवावा तितका भरवसा न ठेवितां अन्याय करितात ! ! तस्मात देशी राजांच्या राज्यकारभारांतील कांहीं दृष्ट गोष्टी अगदीं अत्याज्य आहेत असे मानून स्वस्थ बसले पाहिजे.