पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचे कमिशन. ( १९७ ) आणि त्याबद्दल पुराना पाहिजे अशी जर न्यायाची रीत असेल तर हरीबा दादाविषय कमिशनाच्या अभिप्रायाला कांहीं महत्व देतां येत नाहीं. (मागील पृष्टावरून.) यांपासून किती एक गोष्टींत बडोद्याच्या प्रजेचे उत्तम हित झाले आहे यांत संशय नाहीं व त्याबद्दल आपणही कृतज्ञ आहोंत. आज देशी राजांचा राज्यकारभार चालविणें कांही कठीण नाहीं, व तो चालविण्यासाठी मोठ्या विद्वानांचाही आज तोटा नाहीं. देशांत दंगे. धोपे. नाहींत, बाहेरून कोणी शत्र येऊन राज्यावर हल्ला करील हें भय नाहीं, कोणा बरोबर लढाई करावयाची किंवा तह करावयाचा नाहीं. आपले राज्यसंरक्षण कर- ण्याकरितां, अथवा आपलें वर्चस्व कायम ठेवण्याकरितां कांहीं राज्यकारस्थानें करा- वयाची नाहीत; राज्यकारभाराच्या संबंधाने जितकें शहाणपण मिरवावयाचे तितकें मिरविण्यास युरोप खंडांतील राष्ट्रांची प्रधानमंडळी योग्य आहेत, किंवा आज हैदराबादचे दिवाण सर सालरजंग या- नीं मिरविलें असें ह्यटलें तरी शोभेल; कारण इंग्रज सरकारच्या अधिकान्यांची त्यांजवरील कृपादृष्टी फार कमी झाली असून त्यांचा सोबती तो त्यांचा बैरी होता, तरी त्यानीं आपल्या राज्यकारभारांत उणेपणा दिसू दिला नाहीं. बडोद्याचा राजा बालक, रेसिडेंट अनुकूल, राष्ट्रांतील सरदार वगैरे बडेलोक निरुत्साह, निस्तेज आणि अनभिज्ञ आणि प्रजा अगर्दी गरीब, अशा राष्ट्राच्या राज्य- कारभारांत सुधारगुकी केल्याबद्दल राजा सर टी. माधवराव साहेब यांची स्तुतिपाठकाप्रमाणे स्तुति करावी असें तें त्यांत काय आहे ? त्यांच्या जागी दुसरा कोणी आला असता तर या गोष्टी त्याच्या हातून झाल्या नसत्या कीं काय ? अशा विचाराचे लोक पुष्कळ आहेत. आणि ते त्यांचे विचार अगदीं अप्रयोजक नसून त्यांत किंचित देखील द्वेषबुद्धि आहे असें म्हणतां येत नाहीं. परंतु बडोद्याच्या दरबारांत किती वर्षांपासून अव्यवस्था चालत आली होती आणि ती दूर करून चांगल्या पायावर राज्यकारभाराची उत्तम इमारत उभारणें हें काम किती कठीण होतें ह्याची ज्यास माहिती आहे त्यास राजा सर टी. माधवराव साहेब यांचा गुणापकर्ष करण्याकरितां मुद्दाम कांहीं तरी कारणे शोधून काढिलों आहेत असें वाटल्यावांचून राहणार नाहीं. नेटिव लोक किती जरी शहाणे असले तरी उत्तम रीतीनें राज्यकारभार चालविण्यास ते आमची बरोबरी करू शकणार नाहीत हे काम अस्मादिकाचेच असे इंग्रज लोकांचें अभिमानपूर्वक म्हणणे असून ते देखील राजा सर टी. माधवराव यांची पराकाष्ठेची स्तुति करतात. हैं कांहीं सामान्य यश नाहीं. आणि तसे यश मिळविणारे पुष्कळ निघतील असेही नाहीं. आतां तहनाम्यानें आपल्या देशांतील राजांचे जे हक कायम राहिले आहेत ते सुरक्षित ठेवण्याची देशी राजांच्या दिवाणावर मोठी जबाबदारी आहे. आणि ती गोष्ट राजा सर टी. माधवराव यांसही कबूल आहे. ग्रंथाच्या उत्तरार्धातील पान ६१ याजवरील टीप पहा) परंतु त्या संबंधाने त्यांचा राज्यकारभार सुयशस्कर नाहीं असें म्हणण्यास लोकांस जागा आहे, आणि त्यांस मांडवीच्या गिरास हक्काचे आणि अफूचे हो दोन प्रकरणे प्रमाणास बस आहेत. राजा सर टी. हे बडोद्याच्या राज्याचे ट्रस्टी होते. त्यांस वादग्रस्त हक्क कबूल करण्याचा अथवा राजाचा एखादा हक सोडून देण्याचा मुळींच अधिकार नव्हता. असें असतां मांडवीच्या गिरास हक्काबदला त्यानी कबुलायत दिली. व अफुच्या संबंधानें त्यानी राजाचा हक्क सोडून देऊन बडोदे सरकारचें व प्रजेचें व व्यापायांचे पराकाष्ठेचे नुकसान केले. मल्हारराव महाराज यानों व्यक्तींची नुकसानें केलीं तीं राजा सर टी. यानी भरून दिलीं, परंतु व्यक्तीच्या नुकसानांत आणि राष्ट्राच्या नुकसानांत फार अंतर असून त्यांच्या कारकीर्दीत झालेले नुकसान शाश्वतचे असल्यामुळे आतां कोणाच्यानेही ते भरून देतां येणार नाहीं, असे त्यांच्या राज्यकारभारांत कांहों दोषही आहेत; परंतु त्यांच्या जागी दुसरा कोणी असता तर त्यास तसे करणे भाग पडले नसतें कीं काय ? हा मुख्य प्रश्न आहे, आणि त्याचे उत्तर नास्तिकपक्षानें कोणाच्याने देऊ शकवेल असे वाटत नाहीं. आतां अशा प्रसंग आपण देशी राजांचे सानुराग मित्र आहोत ते म्हणणे खरें करून देण्याकरितां त्यानी स्वार्थाची उपेक्षा करून राष्ट्राच्या हक्काविषयों शेवट पर्यंत आग्रह धरिला असता तर तो गोष्ट त्यास विशेष भूषणाई झाली असती हैं खरें आहे; परंतु आज अशा सत्पुरुषांची फारच दुर्मिळता आहे. (पुढे चालू.) ( या