पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १९६ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. कांहीं गरज नाहीं अशी जर न्यायाची रीत असेल तर कमिशनच्या लेखावर कांहीं दोष' देतां येत नाही. पण कोणावर नुस्ती फिर्याद झाल्याने त्यास दोष लावितां येत नाहीं. (मागील पृष्ठावरून.) बोलणार नाहीं, आणि सयाजीराव महाराजांस त्यांच्या पूर्वजांचें अनुकरण करण्यास मोकळीक होईल. मल्हारराव महाराज यानी खंडेराव महाराज यांच्या मंडळीवर जुलम केला तसा राजा सर टी. माधवराव यांच्या कारकीर्दीत मल्हारराव महाराजांच्या राजकारभारांतील मंडळीवर झाला नाहीं असें आम्ही कबूल करितों; आणि करण्याची ताकत काय पण न्यायदृष्टीने पा हिलें असतां ह्या नव्या कारकीर्दीत माजी महाराजांच्या राजकारभारांतील मंडळीवर ज्यास्त जुलूम झाला असें नयज्ञ लोकांनीं कबूल केलंच पाहिजे; कारण मल्हारराव महाराज यांस राज्यसत्ता ह्मणजे काय, तिचा उपयोग केव्हां कसा करावा, प्रजेचें जीवित, अत्रु, मालमत्ता, आणि स्वातंत्र्य हरण करण्याचा आपणास केव्हां अधिकार येतो याचें कांहीं ज्ञान नव्हतें. मी ईश्वर, माझी प्रजा हे माझे गुलाम, आणि राज्य हैं माझी वतनवाडी अशी त्यांची समजूत होती तशी तर राजा सर टी. माधवराव यांची नाहीं ना !! ते आपणास राजधर्मवित ह्मणवितात व आहेत असें आपणही कबूल करितों, आणि अगदी मोकळ्या मनानें आपण - त्यांस आपले शिरोभूषण मानतों, त्यांच्याविषयीं वर्तमानपत्रांत उत्तम लेख पाहून आपण पराकाष्टेचे आनं- दित होतों, आणि त्यांचे यश निष्कलंक राहून त्यांचा उत्तर काल गोड व्हावा अशी आपण इच्छा करितो. त्यांच्या कारकीर्दीत जर असा अन्याय झाला तर ते दोषपात्र नाहींत काय ? आणि त्याबद्दल आपल्यास दुःख वाटणार नाहीं काय ? ज्ञान असून अन्याय केला तरच पातक घडते असा सर्व धर्माच्या धर्मपुस्तकांचा एकवाक्यतेनें निर्बाध सिद्धांत आहे, आणि त्या दृष्टीने पाहिलें असतां मल्हारराव महाराज यांच्या राज्यकारभारांतील मंडळीवर विशेष जुल्म झाला असें लटल्यावांचून राह- वत नाहीं, व त्याबद्दल सर टी. हे जबाबदार आहेत. जर प्रत्यक्ष राजधर्म तें राजकरण नियमांचं पुस्तक हातांत घेऊन राजा सर टी. माधवराव यांच्या समोर उभा राहून त्यांस विचारील कीं, दिवाण साहेब, या राजकरण नियमांत असा एक नियम आहे कीं, योग्य रीतीने कायदेशीर काम चालविल्यावांचून अमुक अमुक गोष्टी करूं नयेत, हा नियम आपल्यास मान्य आहे का ? जर मान्य आहे तर मल्हारराव महाराज यांच्या कारभारांतील मंडळीस धरणें, कैदेत टाकून ठेवणें, त्यांजपासून दंड घेर्णे व त्यांस मुलुखा बाहेर हळून लावणें हों सर्व कृत्यें आपल्या कारकीर्दीत घडलीं तीं त्या नियमांस अनुसरून घडलीं काय ? बडोद्यांतून हकून लाविले- ल्या लोकांस आपण बडोद्यास येण्याची परवानगी देऊं नये असा त्या लोकांवर अपराध शाबीत होऊन देश निकालाच्या शासनास ते पात्र होते अशी आपली खात्री झाली आहे काय ? आपण राजधर्मवित् पुरुषांमध्ये अग्रगण्य ह्मणवितां आणि आपणच आपल्या कारकीर्दीत ते पवित्र नियम पायाखालीं तुडवितां हें आहे तरी काय ? असें झालें असतां आपले हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहील अशी राष्ट्रांतील लोकांनों कोणत्या आधारावर आशा ठेवावी; तर या प्रश्नांची उत्तरे देतांना दिवाण साहेब यांची धांदल उडेल ह्यांत संशय नाहीं. कायो, तुली किती तरी हो अकृतज्ञ. राजा सर टी. माधवराव याणी बडोद्याचा राज्यकारभार हात घेतल्यावर राज्यांत किती सुधारणूक केली असून प्रजेच्या हिताकडे त्यांचे किती लक्ष आहे, व त्यापासून बडोद्याचें राष्ट्र किती उन्नत दशेस येत चालले आहे याजकडे तुम्ही लक्ष न देतां "त्यांचे दोष काढीत बसता है काय? असें करणें तुम्हास योग्य नाहीं असें कोणी ह्मणेल; कारण कीं, (पुढे चालू.)