पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचे कमिशन. ( १९५ ) रेव्हिन्यु कमिशनर यांचा अम्मल मोठा जुलमी आहे आणि त्यांजवर लांच घेतल्याबद्दल आणि जुलम केल्याबद्दल आरोप आलेले आहेत असें कमिशन याणीं लिहिलें आहे. लांच घेतल्याबद्दल अथवा जुलम केल्याबद्दल फिर्याद झाली म्हणजे पुरे, मग त्याबद्दल पुराव्याची (मागील पृष्टावरून.) मूलतत्वाला त्यानी हरताळ लावून " अशा गोष्टींचा देशी राजांच्या दरबारांत सुकाळ आहे " असें त्या नय निपुण देशी गृहस्थाचे म्हणणे खरें केलें नाहीं काय ? जर त्यांचं करणें रास्त होतें तर खरी गोष्ट स्पष्टपणे लिहितांना ते इतके कां संकोचले होते. पैशा संबंधी कांहीं लचांडे होतीं, त्यांचा तडजोडीनें निकाल करून घेतला, त्या लोकांनी बडोदें सोडलें आहे, ते आतां राज्यकारभारांत कांहीं वित्र आणणार नाहींत आणि त्यांजपाशीं पुष्कळ पैसा आहे. अशी त्या कलमांतील शब्दयोजना अव्यक्त, गूढ, आणि संदेहजनक कां बरें ? त्या लोकां- जवळ पुष्कळ पैका आहे हें त्यांस कशासाठी ल्याहावें लागलें ? त्यांस आम्हीं अगदीं नागवून सो- डलें नाहीं असे आम्ही सदय आणि न्यायी आहोंत असा पुरुषार्थ मिरविण्यासाठींच ना ? योग्य रीतीनें कायदेशीर कामे चालविल्यावांचून लोकांस धरणें, कैदेत टाकणे, दंड घेणें, मिळकती जप्त करणें, मुलुखाबाहेर हकून लावणें आणि प्राणांत होण्याची वेळ जवळ येईपर्यंत कैदेत ठेवणें ह्या गोष्टी बडोद्याच्या राज्यांत ज्यांच्याविषयीं आपणास पराकाष्ठेचा अभिमान आहे व ज्यांच्या शहाणपणाबद्दल आपण प्रशंसा करतो आणि आपल्या लोकांतही असे राजधर्मवित् पुरुष आहेत असा पुरुषार्थ मिरवितों त्यांच्या हातांत राजसूत्र आल्यावर किहो घडल्या !! गवरनर जनरलचे एजंट बडोद्यास असतात यामुळे राजा सर टी. माधवराव यांच्या रिपोर्ट- तील अशा कलमांचीं ममैं काय हें त्यांस कळत असेल, परंतु तशा कलमावरून गवरनर जनरल 'आणि स्टेट सेक्रेटरी यांची काय समजूत होत असेल ती ईश्वरोवेत्ति. आतां त्यांची लेखनपद्धतीच अशी आहे असें जर ह्मणावें तर तसेंही नाहीं. जुन्या राज्य- पद्धतीची निंदा करितांना आणि स्वतःच्या राज्यकारभाराची स्तुति करितांना त्यांनी केलेली शब्द- योजना पाहावी तर अगढ़ स्पष्ट, प्रशस्त, असंदिग्ध आणि मर्मस्पृक अशी आहे. दंड घेऊन त्यांच्या मिळकती लुटून काम चालविण्याचें प्रयोजन काय अहो तुम्ही म्हणतां काय, आणि राजा सर. टी. माधवराव साहेब यांस दोष देतां कसचे. मल्हा- रराव महाराज यांच्या राजकारभारांत जी मंडळी होती ती सारी दुष्ट, लबाड लांचखाऊ होती. त्यांस धरलेच पाहिजे होतें. कैदेंत टाकलेच पाहिजे होतें. हकून दिलेच पाहिजे होतें. त्यांजवर कायदेशीर रीतीनें आणि त्यांच्या दुष्टाचरणाबद्दल योग्य रीतीचा पुरावा मिळाला नाहीं ह्मणून त्यांस सोडून द्याव- याचें काय ? मल्हारराव महाराज यानीं खंडेराव महाराज यांच्या मंडळीवर जुलूम केला तेव्हां त्यांजवर कोठें कायदेशीर रीतीनें काम चालवून शाबिती झाल्यावर शासने केली होतीं, आणि आतां अशा धार्मिकपणाच्या कसच्या गोष्टी सांगतां. असा आपणास कोणी दोष देईल, पण असा दोष कोण देईल बरें ? न्याय ह्मणजे काय दें ज्यास माहित नाहीं तोच असें वेडें विद्वे कांहीं तरी म्हणेल ना ? त्यांची आम्हास परवा नाहीं. ज्यांस न्याय म्हणजे काय हें चांगलें समजतें त्यांनी राजा सर टी. माधवराव यांच्या कारकीर्दीत वर लिहिल्याप्रमाणें घडलेल्या गोष्टीला नायत्व आणण्याक- रितां टक्कर साहेब यांच्या मिनिटास जोडलेल्या त्या राजकारण नियमांत किंवा हल्ली सयाजीराव महाराज यांजसाठीं जो राजकारण नियमांचा मसुदा तयार होत आहे असें ह्मणतात, त्यांत तसें एक नवें कलम घालवावें म्हणजे वाद मिटला. मग आम्ही त्याबद्दल एक चकार शब्द देखील (पुढे चालू.)