पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १९४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. स्थिति कळविण्याची सवड सांपडली आणि कर्नल फेरही त्यांस प्रतिकूळ नव्हते यामुळे मल्हारराव महाराज यांच्या राज्यकारभाराशीं इतर कामदारांप्रमाणेच त्यांचा संबंध असताही त्यानी बाजी जिंकली ही मोठी आनंदाची गोष्ट झाली. (मागील पृष्ठावरून. ) परंतु इतकें तर त्या कलमावरून उघड होतें कीं, मल्हारराव महाराज यांच्या कारभारांतील पुढारी मंडळीपैकी कितीएक लोकांस कैदेत टाकून ठेविलें होतें व त्यांजवर योग्य रीतीनें कायदेशीर खटला न करितां त्यांजपासून कांहीं पैसा घेतला, आणि त्यांस बडोद्याच्या बाहेर हकून देऊन असा सदयपणा प्रदर्शित केला आहे कीं, त्या लोकांस अगदीं नागवून हकून दिले नाहींत. त्यांच्या- जवळ अद्याप देखील पुष्कळ द्रव्य राहूं दिलें आहे. तेव्हां हैं कलम वर लिहिलेल्या त्रिवर्गास उद्देशून लिहिलें असावें असें वाटतें; कारण मल्हारराव महाराज यांच्या राज्यकारभारांतील पुढारी मंडळीपैकीं ते होते. त्यांस कैदेत टाकून ठेविलें होतें व त्यांजपासून दंड घेऊन त्यांस बडोद्यांतून हकुन लाविण्यांत आले आहे. नानासाहेब खानवेलकर यांचें आचरण चांगले नव्हते यामुळे कायदेशीर रीतीनें मजवर काम चालवून अपराध शाबीत झाल्यावर मग माझें काय पाहिजे तें करा असें म्हणण्याची त्याची ताकद नव्हती, परंतु हरीबा गायकवाड आणि नारायणभाई यांणी आमचे दोष बाहेर आणू नका अशी 'प्रार्थना करून दंड देऊन आपली सुटका करून घेतली असेल असें संभवत नाहीं. दोषदर्शी लोकांच्या विचाराप्रमाणें ते लांच घेत होते असें जरी मानले तरी तो अपराध सहज रीतीनें त्यांज- वर लागू करितां येईल अशा रीतीनें त्याणीं लांच घेतले असतील असे कांहीं कबुल करवत नाहीं; कारण नाना साहेब खानवेलकरासारखे ते अविचारी, लोभी व निर्लज्य नव्हते. त्यांस पुष्कळ महिनेपर्यंत कैदेत टाकून ठेविलें होतें व तुम्हावर कामें चालवून गुन्हा शाबीत झाला तर कडक शिक्षा करूं असें भय घातलें होतें तथापि ते डगले नाहींत. पण त्यांच्या यातना त्यांच्या 'बायका मुलांस पाहावेनात. त्याणीं त्यांच्या अनुमतावांचून गजानन विट्टल यांच्या द्वारें दंडाबद्दल ४. बोलाचाल सुरू केली आणि दंड देऊन आपल्या परम प्रिय आप्तांची सर्वतोमुख आहे. " सुटका करून घेतली असे तसें झालें तर नाहींच पण क्षणभर असें गृहित करूं कीं, त्या लोकांनी आमचे दोष उघड करूं नका आणि आम्हापासून दंड घेऊन आमची सुटका करा असें म्हटलें होतें, परंतु त्या कलमांत असे लिहिले आहे की, “ त्या लोकांनी बडोदें सोडलें आहे " हा वर्तमानभूत प्रयोग फार व्यापक आहे. त्या लोकांनी बडोदें सोडलें ही क्रिया सर टी. माधवराव यांची इच्छा असेल तोपर्यंत चाला- 'वयाची. असो, त्या लोकांनी स्वतः होऊन बडोदें सोडलें हैं राजा सर टी. माधवराव याण सत्याला स्मरून लिहिलें आहे ना? जर तसें असेल तर आज जर ते पुनः बडोद्यास आले तर राजा सर टी. त्यांस येऊ देतील कां ? जर येऊ देणार नाहींत तर कां बरें ? स्वतः होऊन ज्यानीं बडोदें सोडलें त्यांस स्वत: होऊन बडोद्यास येण्याची हरकत ती कोणती ? सर रिचर्ड मोड यानी आपल्या कारकीर्दीत कांहीं लोकांस बडोद्याबाहेर जाण्याविषयीं हुकूम करून चोवीस तासांत त्यांस बडोद्याच्या हद्दीबाहेर हकून दिलें, तेव्हां वर लिहिलेल्या राजकरण नियमांतील नियमाप्रमाणे कायदेशीर रीतीनें त्या लोकांवर काम चालवून अपराध शाबीत झाल्यावर कां त्यांस काढून दिलें नाहीं ? बरें तो वेळ तसा होता पण आज त्या लोकांस बडोद्यास येण्याची राजा सर टी. माधवराव परवानगी न देतां आपल्या उज्वलित यशास कांहो काळिमा लावून घेतात ? हा त्यांचा त्या लोकांवर अन्यायाचा जुलूम नाहीं काय ? त्या राजकारण नियमांतील मियमाच्या (पुढे चालू.)