पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मौडचें कमिशन. ( १९३ ) रावसाहेब बापुभाई दयाशंकर यांजविषयीं कमिशनानीं जो अभिप्राय दिला आहे तो योग्य आहे. कमिशनच्या अधिका-यांकडे त्यांचे जाणे येणे होते, यामुळे त्यांस आपली (मागील पृष्टावरून. ) का देहांत करावा ह्मणून थोड्या महिन्यावर भडोचेस आला होता मग वारला किंवा जिवंत आहे हे माहीत नाही. ज्या लोकांस वडोद्या बाहेर हफन लाविले आहे त्यांस राजे सर टी. माधवराव बडोद्यास येऊ देत नाहीत, आणि ते लोक विचारतात की, आम्हास कोणत्या अपराधाबद्दल है शासन केले पण त्याविषयों त्यांस कोणी जवाब देत नाहीं. त्यांचे बडोद्यांतील प्रिय आत आणि मित्र मरणकाळी त्यांच्या भेटीचा लाहो घेऊन मोठया दुःखानें प्राण सोडतात, परंतु त्यांच्या भेटी होत नाहींत. सर लुईस पेली आणि सर रिचर्ड मोड यांच्या कारकीर्दीत जे कांहीं झालें त्याचे गुणदोष पाहण्यांत कांही अर्थ नाहीं; कारण तो वेळ अमळसा तसाच होता. न्यायाची तराजू हातांत घेऊन न्याय तोलीत बसण्याचा वेळ नव्हता असा पक्ष घेऊन कोणी बाद करूं शकेल, परंतु राजा सर टी. माधवराव यांच्या कारकीर्दीत ज्या वर लिहिलेल्या गोष्टी घडल्या त्या राजकरण नियमांतील एक नियम पर लिहिला आहे त्याप्रमाणे योग्य रीतीने कायदेशीर काम चालवन आरोप शाबीत झाल्यावर घडल्या आहेत किंवा ललाटपट लिखित विधिलेखाप्रमाणे राजा सर टी. माधवराव यांस देखील देशी राजाच्या राज्यकारभारांतील दुष्ट चाली अत्याज्य झाल्या तें पाहिलें पाहिजे. बडोद्याच्या राज्यव्यवस्थेबद्दल राजा सर टी. माधवराव यांचा पहिला रिपोर्ट सन १८७५-७६ चा आहे. त्यांत स्नानवेलकर वगैरे लोकांपासून दंड घेतल्याबद्दलची स्पष्ट हकीकत असेल असें वाटल्यावरून तो रिपोर्ट वाचून पाहिला तेव्हां त्यांत पाली लिहिल्याप्रमाणे एक कलम अढळले आहे. . "Verious and complicated pecuniary matters pending against some of the lead- ing members of Malharroo's administration were got rid of by effecting summary compromises with them they thus saved themselves much unpleasant detention and exposure, while the Durbar has been spared not a little time and trouble. They have left Baroda and may be expected to possess inteligence enough to leave Baroda affais alone. They have ample means to make themselves happy in private life. " (Raja Sir. T. Madhavarao's report for 1875- 76 Page 21 Section 30.) या कलमाचा माषार्थ असा आहे की मल्हारराव महाराज यांच्या राज्यकारभारांतील कांही पुढारी मंडळीकडे गुंतागुंतीचों कितोएक पैशासंबंधीं लचांडें होतीं त्याबद्दल संक्षेपेंकरून तडजोड करून तीं निकालास लाविलों तो तडजोड मान्य करून त्या लोकांनी फार दिवस कैदेत राहण्या- च्या दुःखापासून आपली सुटका करून घेतली व आपले दोषही बाहेर येऊ दिले नाहींत, आणि दरबारचाही वेळ मोडला नाहीं व त्यांस श्रम पडले नाहीत. त्या लोकांनों बडोदें सोडले आहे, आणि अशी आशा करितां येईल की, आतां ते बडोद्याच्या राज्यकारभारांत कांहीं अड आणणार नाहींत इतकें त्यांच्यांत शहाणपण आहे, आणि त्यांनीं आपलें अयुष्य सुखांत घालवावें इतका त्यांजवळ पुष्कळ पैसा आहे. द्या कलमाचा स्पष्टार्थ काही समजत नाहीं. कोणास उद्देशून हैं कलम लिहिले आहे. कोणाकडे पैशासंबंधीं लचांडें होतीं त्याचें स्वरूप काय, आणि त्याबद्दल निकाल कोणत्या प्रकारें केला है कांही देखील समजत नाही. अशी या कलमाची शब्द योजना मोठया चातुर्याने आणि जपून केलेली आहे. (पुढे चालू.)