पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १९२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. - अपराध लागू केल्यावांचून उगीच कोणास धरणें, कैदेत टाकणे, कोणाची मालमि- ळकत जप्त करणे, कोणापासून दंड घेणे आणि कोणास मुलुखा बाहेर हकून लावणें ह्या गोष्टी तर देशी राजांचा राज्यकारभार चालविणाराच्या ललाटपटावरील सटवीचे लेख होऊन बसल्या आहेत. मग तो राज्यकारभार चालविणारा किती कां न्यायनिपुण आणि नियमाने नियंत्रित केलेला असेना. टक्कर साहेब यांजकडे एका देशी गृहस्थाने राजकरण नियमाची एक कलमबंदी तयार करून पाठविली आहे. त्यांत टिपेत लिहिल्याप्रमाणे एक नियम आहे. * ह्या कलमाचा भावार्थ असा :--- ---योग्य रीतीने कायदेशीर काम चालविल्यावांचून कोणा धरूं नये, अथवा कैद करूं नये, अथवा मिळकतीचे हरण करूं नये, अथवा मुलुखांतून हकून देऊं नये, अथवा अपराधी ठरवून शिक्षा देऊं नये, अथवा कोणाचे प्राण, स्वातंत्र्य अथवा मिळकत यांचे हरण करू नये. हें कलम पराकाष्ठेचें नयदर्शक असून त्याचें प्रयोजन असें लिहिलें आहे कीं, देशी राजांच्या दरबारांत अशा गोष्टींचा फार सुकाळ आहे; यास्तव ऐच्छिक आचरणाला प्रतिबंध व्हावा यासाठी हा नियम फार महत्वाचा आहे. देशी राजांच्या दरबारांत या गोष्टींचा फार सुकाळ आहे असें जें लिहिलें आहे तें अगदी खरे आहे असें टिपेत लिहिलेल्या हकीकतीवरून स्पष्टपणे कळेल. यासाठी ती टीप अवश्य अवलोकनांत आणावी. +

  • No person shall be taken, or imprisoned, or deprived of his estate, or exiled, or con- demned or deprived of life liberty or property, unlese by due process of law.

This provision is of vital importance to ensure good government, and to exclude arbitrary proceedings so ripe in most Native States. I have framed this by almost adopting the words of Kent,-vide page 623, Vol. I., of his commentaries on American Law. ( Baroda Blue Book No. I. Page 77 Section 32. ) + मल्हारराव महाराज यांस प्रतिबंध करून सर लुईस पेली यानी राज्यसूत्र हातांत घेतल्यावर लागलीच महाराजांच्या राज्यकारभाराशीं ज्यांचा निकट संबंध होता त्यांस प्रतिबंधांत ठेविलें. महाराज यांजवरील आरोपाची चौकशी संपल्यावर त्यांपैकीं कांहीं लोकांस सोडून देऊन बाकीच्या लोकांस तसेंच कैदेत टाकून ठेविलें होतें. नंतर महाराजांस मद्रासेस पाठविल्यावर बडोद्यांतील प्रजेनी एक मोठा दंगा केला तेव्हां मल्हारराव यांच्या राज्यकारभारांतील व छपॅतील मंडळीवर संशय घेऊन त्यांस सर रिचर्ड मोड साहेब यानीं बडोद्याचे बाहेर हाकून लाविलें. त्यानंतर राजा सर टी. माधवराव यांची कारकीर्द सुरू झाली. त्यानीं नानासाहेब खानवेलकर, हरीबा गायकवाड, आणि नारायणभाई यांजपासून दंड घेऊन त्यांस बडोद्यांतून हकून दिलें. नानाजी विट्ठल यास कांहों वर्षेपर्यंत कैदेत टाकून ठेविलें होतें, आणि त्याजपासून दंड घेऊन सोडल्यावर तो लागलीच मेला. वसंतराममाऊ यास सहा वर्षेपर्यंत कैदेत ठेविलें होतें व त्याजपासून दंड मागत होते, परंतु त्यानें कैदेच्या असम यातना सोसून दंड दिला नाहीं व आपल्या मुलास देऊ दिला नाहीं. आतां तो कैदेत मरतो असें वाटलें तेव्हां त्यास नुक्केच सोडलें. कैदेतून मुक्त झाल्यावर लागलीच तो तीर्थ- (पुढे चालू.)