पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचे कमिशन. ( १९१ ) करून बळवंतराव देव यांचा पूर्णपणे कैवार घेतला असता, पण दुर्दैवाने त्यांचा मल्हारराव महाराजांच्या राज्यकारभाराशी संबंध असल्यामुळे त्यांच्याविषयीं कमिशनास निराळाच विचार करणे भाग झाले ! आमच्या देशांतील कांहीं दुराग्रही राजे आपल्या दरबारांतील कामदार लोकांची अब्रु इज्जत तीच आपल्या राज्याची अब्रु इज्जत असे मानीतच नाहींत, व त्यांस लघुत्व आणिल्याने आपल्या दरबारचा बोज किती कमी होतो, याविषयी ते काहीएक परवा बा- ळगीत नाहींत. लहर लागली म्हणजे अपराधाची शाबिती झाली असो अगर नसो फक्त संशयावरून कामदार लोकांची घरे दारे लुटून फस्त करण्यास तयार आणि पुनः त्यांस मोठया अधिकाराची कामे देण्यासही तयार. अशा राजाच्या दरबारांत चांगला कोण आणि वाईट कोण याची कांहीं निवड करितां येत नाहीं. आपल्या कामदारांचा बोज कसा ठेवावा याविषय शिक्षण घ्यावयाचे असल्यास इंग्रज सरकारचें घ्यावें. कर्नल फेर यांस रेसिडेंटाचे हृद्यास गैरलायक ठरवून बडोद्याच्या दरबारांतून काढिलें होतें, परंतु त्यांच्या प्रयाणकाळी हल्ली जसे काय ते मोठा विजय संपादन करून जात आहेत असा त्यांस मान दिला होता. खंडेराव महाराज याणी गोविंदराव रोडे यांच्या दिवाणगिरीने दरबारांतील सर्व काम- दार मंडळीपासून दंड घेतले होते. त्यापैकी आज बरेच लोक सुदैवाने दरबारच्या चाकरीत असून थोडेसे मोठ्या हुद्यावरही आहेत. खंडेराव महाराज याणी तुम्हापासून दंड घेतला यामुळे तुम्ही नौकरी करण्यास लायक नाहीं असें राजा सर टी. माधवराव याणी त्यांस सांगितले असते तर त्या बिचाऱ्यांचे काय चालले असतें ! खंडेराव महाराज यांच्या अम- लांत हा प्रसंग कामगार लोकांवर गुजरला तेव्हां त्यानी आपल्या प्रामाणिकपणाविषयी पा- हिजेल तशी खात्री करून घ्यावी म्हणून विनवणी केली, परंतु त्यांचे ऐकतो कोण ? गोविंदराव रोडे पाणी त्यांस एकच उत्तर दिले की, जो कोणी महाराजांच्या मर्जीप्रमाणे दंडाबद्दल चिट्टी लिहून देणार नाहीं त्याचे महाराज काय करतील हे माझ्याने सांगवत नाहीं, यास्तव याबद्दल कामदार लोकांनी जे कांहीं करावयाचें तें विचारपूर्वक करावे. हें उत्तर ऐकल्याबरोबर कामदार लोकांनी चिठ्या लिहून दिवाणापुढे ठेविल्या. ही कामगार मंडळीपासून दंड घेण्याची रीत, आणि न्यायाचा नमुना. अशीं प्रमाणे घेऊन बडोद्याच्या दरबारांतील कामगार लोक लांचखाऊ होते असें जर मानले तर दंड घेणाराच्या अन्या- यांत आणि लांचखाऊ मानणाराच्या अन्यायांत भेद तो कोणता ? खंडेराव महाराज यांस पाहिजेल ते करून घ्यावयाचे होते, पण कामदार लोकांनी आ- पल्या प्रामाणिकपणास डाग लावून घ्यावयाचा नवता, असे म्हणणारे आज पुष्कळ निघ- तील. दुसऱ्यास मोठ्या धार्मिकपणाच्या गोष्टी सगळ्यांस सांगतां येतात, परंतु तसाच प्रसंग आपल्यावर गुजरला असता तर आपण तरी काय केलें असतें हें कोणी मनांतच आणीत नाहीं. सत्ताधीश अनयवर्ती झाला म्हणजे त्याजपुढे कोणाचे काही चालत नाहीं.