पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. ( १९० ) जन यांच्याकडे अमरोळी महाल असतां सरकारच्या पैशाची अव्यवस्था झाली या दोषाबद्दल महाजन यांजवर इतराजी होऊन त्यांजकडून नवाहिरखान्याचे काम काढले, परंतु मध्ये कांहीं दिवस लोटले नाहीत तोच हे सर्व प्रकरण उलटले. महाराजानी मावजी हिरजी यांस सुभेगिरीचा पोषाख देऊन ते बळवंतराव देव यांजपाशीं साठ हजार रुपये दंड मागूं लागले, आणि शेवटी वीस हजारांवर आले. तेव्हां त्याणी महाराजांस विनंती केली कीं, माझे अंगी अपराध लागू करून मग जें कांहीं करावयाचे असेल ते करावे, पण तिकडे महाराज लक्ष देत नाहींत असे दिसून आलें. तेव्हां ते आपली सर्व स्थाव- रजंगम मिळकत महाराजांच्या चरणी अर्पण करण्यास सिद्ध झाले. त्यानी महाराजांस प्रार्थना केली की, मजपाशीं जें कांहीं आहे ते सर्व आपलें आहे, आणि तें सर्व महारा- जांच्या आज आतां स्वाधीन करण्यास तयार आहें, परंतु दंडाबद्दल अमुक रुपये मी देईन, अशी चिट्टी लिहून देण्याची व त्याबद्दल जामीन देण्याची रीत आहे त्याप्रमाणें मी चिठ्ठी लिहून देणार नाहीं, व जामीनही देणार नाहीं. महाराजानी ती गोष्ट कबूल केली व त्याप्रमाणे बळवंतराव देव यानी प्रथम दागिने विकून नऊ हजार रुपये सरकारांत भरले, आणि महाराजांस विनंती केली की, आतां घर आणि दुसरी किरकोळ मिळकत मात्र राहिली आहे ती महाराजानी ताब्यांत करून घ्यावी. तेव्हां त्यांची खात्री झाली की, याजपाशीं कांहीं द्रव्य नाहीं. त्यानंतर महाराज पुष्कळ महिने जिवंत होते, परंतु त्यानीं त्यास कांहीं तगादा केला नाहीं, व मावजी हिरजी अमरोळीहून त्याजवर खोटे मोकदमे तयार करून पाठवीत असे त्याजकडेही लक्ष दिले नाहीं. पागेचें काम छत्रीमशालीचे इतमामा- सह त्यांजकडेस होतें तें होतेंच. त्याखेरीज अमरोळी सुभेगिरीपेक्षांही मोठ्या अधिकाराचें काम त्यांस द्यावयाचें महाराजांच्या मनांत होतें, व त्याबद्दल त्यांनी वारंवार बोलूनही दा- खविले होते. महाराजांची कोणावर कृत्रिम इतराजी हे त्यांच्या भावी उत्कर्षाचे उगम स्थान होतें. रागाचा उपशम झाला की, त्या राजाच्या मनांत दयेचा पाझर सुटलाच, परंतु सर्व मनोरथांचा अंत आणणाऱ्या मृत्यूने महाराजांवर एकाएकी घाला घातल्यामुळे त्यांचे सर्व विचार जागच्या जागींच राहिले. कोण मनुष्य किती योग्यतेचा आहे याची महाराजांस उत्तम परीक्षा होती. त्यानीच बळवंतराव देव यांस उंच पदावर चढविलें होतें, व रागाच्या भरांत देखील ते त्यांची स्तुति करीत. त्यानी एकदां सिंहरूप धरले म्हणजे त्यांजकडे कोणाच्याने पहावत नसे, व अपशब्दांचा ते भडिमार करीत, पण बळवंतराव देव यांस ते एक देखील अप- शब्द बोलले नाहीत. असे ते गुणज्ञ होते. महाराज कांही महिने वाचले असते तर त्यानी त्यांस मोठ्या पदावर बसविलें असतें. अशी ही बळवंतराव देव यांच्या संबंधाची खरी हकीगत आहे. ते जर मल्हारराव महाराज यांचे प्रतिपक्षी असते आणि महाराज यानी त्यांजपासून अशा रीतीनें दंड घेतला असता आणि त्याजबद्दल कमिशनापुढे फिर्याद झाली असती तर मल्हारराव महाराजांच्या राज्यकारभारावर अन्यायाने दंड घेतल्याबद्दलच्या आणलेल्या आरोपाला तो एक सबळ पुरावा कमिशनाने मानला असता, व कर्नल फेर यानी त्या अन्यायाबद्दल एक लांबच लांब टीका