पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मीडचें कमिशन. (१८९ ) कारकीर्दीपासून खंडेराव महाराज यांच्या कारकीर्दीपर्यंत त्याने आपला सर्व जन्म राज- संनिधानांत घालविला होता. त्याजवर त्याच्या प्रतिपक्षानी पुष्कळ वेळां संकटे आणिली होतीं, परंतु अभ्राच्छादित सूर्य अभ्रमुक्त झाला म्हणजे जसा विशेष सतेज भासतो त्याप्रमाणे गणपतराव बापू एकदां संकटमुक्त झाला की त्याच्या प्रतिपक्षास दुरदर्श होत असे. महाजन यांचा पक्ष धरून अंडरसन साहेब यानी पराकाष्ठेची खटपट केली, परंतु खंडेराव महाराज यानी त्यास एकच उत्तर दिलें कीं, तुम्हास माझ्या राजकारभारांत ढवळाढवळ करण्याचें कांहीं प्रयोजन नाहीं. अमरोळीच्या सुभेगिरीत वारंवार फरे बदल करितां करितां खंडेराव महाराज त्रासले व त्यानी त्या कामावर बळवंतराव देव यांची योजना केली. हें काम पत्करण्याची देव यांची अगदीं मर्जी नव्हती; कारण महालानिहाय सरसुभे यांचे सर्व काम तेच चालवीत होते, व त्यांजवर महाराजांची, दिवाणसाहेब गोविंदराव रोडे यांची, आणि महालानिहाय सरसुभे हरीबादादा गायकवाड यांची पूर्ण कृपा असल्यामुळे सरसुभे खात्यांत ते करतील ती पूर्व दिशा असा त्यांचा अधिकार होता. त्या कामाशिवाय ते अनपेक्षित असतांही खंडेराव महाराज याणी त्यांस बळेच बडोदे परगण्याचा अधिकार दिला होता. तेरा चौदा लक्षांच्या उत्पन्नाचा हा परगणा ह्मणजे एक जिल्हाच होता. सारांश, खंडेराव महाराज यांच्या कारकीर्दीत त्यांच्या हातांत जितकी सत्ता होती तितकी आज दिवाणाखे- रीज दुसऱ्या कोणत्याही कामदाराच्या हातांत नाहीं, आणि त्या वेळेस दिवाणाच्या हातांत जी सत्ता होती ती आतां राजाच्या हातांत तरी राहूं देण्यांत येते किंवा नाही याचा देखील वानवा आहे. असें मन्वंतर बदलत चालले आहे. सारांश, अशी मोठ्या अधिकाराची दोन कामे सोडून अमरोळीची सुभेगिरी पत्करण्यांत योग्यता आणि इतमाम खेरीज त्यांस कांहीं विशेष अर्यलाभ नव्हता, परंतु महाराजानी त्यांस हुकूम फर्माविला की, अमरोळी पंचमहालांत फार घोटाळा झाला आहे, यास्तव तुमच्यावांचून तेथील बंदोबस्त होणार नाहीं. अमरोळीच्या सुभेगिरीचें तीन वर्षे काम करून त्यानी जे यश मिळविलें त्याविषय विस्तारपूर्वक सांगण्याचे कांहीं प्रयोजन नाहीं. सुदैवाने ब्रिटिश सरकारच्या सूज्ञ अधि- काऱ्यांशी संयोग झाला, आणि काम करण्याची शक्ति आणि प्रामाणिकपणा असला म्हणजे ते अधिकारी सुप्रसन्न झालेच, आणि ते सुप्रसन्न झाले कीं, कीर्तीने माळ घातलीच. साहेब लोकांची नेक नजर असली म्हणजे काम करण्यास किती हो हुरूप येतो, आणि त्यांच्या अनुकूलतेने राजाचे हक्क कितीहो सुरक्षित ठेवितां येतात. कर्नल वाकर साहेब, पार साहेब आणि क्याप्टन जाक्सन साहेब हे फार मोठया मनाचे, निःपक्षपाती, स्वराज्य- सत्तेविषयीं पराकाष्ठेचे अभिमानी, आणि दयाळू असल्यामुळे देव यानी ती बाजू उत्तम प्रकारें सांभाळली, परंतु दुसरी बाजू त्यांच्याने सांभाळली गेली नाही. बळवंतराव देव याणी कागदोपत्री पुराव्यावरून मावजी हिरजीच्या अंगी कांहीं रकमा लागू करून देऊन खंडेराव महाराज यांची पूर्ण खात्री करून दिली व त्याबद्दल बऱ्या बोलाने निकाल करण्याविषयीं महाराजानी त्यास ताकीद करून गणपतराव महा-