पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(gee) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. गणपतराव बापू अकोलकर यांजकडे अमरोळीची सुभेगिरी असतां त्यांच्या मेहरबानीने शिवजी देसाई याजवर खंडेराव महाराज यांच्या कृपेची कमाल झाली होती आणि त्यामुळे मुजमदार आणि मावजी हिरजी अगदी हतप्रभ झाले होते, पण गणपतराव बापू यांचे काशीयात्रेकरितां प्रयाण हे त्यांच्या प्रतिपक्षास छिद्र सांपडलें, छिद्रान्वेषण करण्याविषय गृधाने देखील ज्यांची दीक्षा घ्यावी. ते संधी सांपडल्याबरोबर झडप घातल्यावांचून राहतात कसचे ? गणपतराव बापू यांच्या प्रतिपक्षानी त्याजवर खोटे आळ आणून खंडेराव महाराजांचे मन विटविले. गणपतराव महाजन यानीं अमरोळीची सुभेगिरी मिळवून शिवजी देसाई यास बेड्या घालून तुरुंगांत टाकले, आणि त्याचे प्राण कंटाळून त्यास सोडून गेले तेव्हां त्याच्या देहाची प्रतिबंधांतून सुटका झाली. गणपतराव बापूच्या कारकुनानें कागदपत्र जाळून टाकले व फाडून टाकले असा त्याजवर दोष स्यापित करून त्यास राजवा- ड्यापुढे कोरडे मारविले. महाजन यानीं निरुपयोगी कागद फाडून टाकले होते त्यांचे तुकडे केरकचऱ्यांतून एकत्र करून व त्याच्या पिशव्या भरून बडोद्यास आणिल्या आणि त्या महाराजांपुढे रिचवून त्या पुराव्यावरून प्रतिपादन केलें कीं, जमाखचीचे सर्व कागद फाडून टाकिल्यामुळे गणपतराव बापू यानीं अन्यायाने जे द्रव्य मिळविले त्याचा पत्ता लावण्यास आतां कांही मार्ग राहिला नाहीं. अन्यायाने पैसा मिळविल्याचा दप्तरांत जमाखर्च ठेवला असतो असे कोणी ऐकिलें तरी आहे का ? देशी राजांच्या दरबारांतील अशा प्रकारची कारस्थानें मनांत घेऊन त्याजवर विचार करीत बसले म्हणजे मति अगदी गुंग होऊन जाते. केरकचऱ्यांतून निवडून काढलेल्या कागदाच्या तुकड्यांवरून जर सरकारच्या दप्तरांतील कागदपत्रांचा नाश करून पुरावा नाहींसा केल्याचा अपराध लागू होऊन कोरड्याचा मार बतूं लागला तर मनुष्यानें आपला बचाव करावा तरी कसा ! गणपतराव बापू काशीहून आल्यावर खंडेराव महाराज यानी त्याजपासून न्यायाने त्यांच्या अंगी एक पैसाही लागू झाला नसतां दंडाबद्दल तीन लक्ष रुपयांची चिठ्ठी लिहून घेऊन हरीभक्ति पारख यांस जामीन घेतले आणि तो ऐवज बापू यानी आपली सर्व जिनगी विकून मोठ्या संकटाने पुरा केला. गणपतराव महाजन यानी अमरोळी पंचमहालचा कारभार चालविण्यासाठी मावजी हिरजी यास हाती धरले होते. त्यांस असें वाटले की, अंडरसन साहेब यांच्या कृपेंतील हा मनुष्य आहे तेव्हां माझी सुभेगिरी कांहीं वेळ टिकेल, परंतु गणपतराव बापू यांचा लाग साधल्याबरोबर त्यानी गणपतराव महाजन यांची कुरघोडी करून वैरप्रतिक्रिया केली. महाजन याजवर जव्हेरखान्याच्या कामांत पैसा खाल्याचे शाबीत करून महाराजाकडून त्याजपासून ऐशी हजार रुपये दंड घेवविला आणि अमरोळीची सुभेगिरी आपल्या आश्रयांतील कामगारास देऊन महाजन यांच्या बंधूकडे महालानिहाय सरसुभे यांची दप्तरदारी होती ती अबाजी गोविंद घासकडबीयांस देबविली आणि आपली व आपल्या आश्रितांची इनामी गांवें व नेमणुका जप्त होत्या त्या मोकळ्या करून घेतल्या. बडोद्याच्या सगळ्या राष्ट्रांत गणपतराव बापू सारखा शाहणा आणि कारस्थानी पुरुष कोणी नव्हता. मोठे सयाजीराव महाराज यांच्या