पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचे कमिशन. ( १८७ ) साधलें असो त्याविषयीं विचार करतो कोण ! आणि खरी स्थिति राजाच्या कानावर नेतो कोण ! दरबारांतील कुटाळ लोकांस आपल्या स्वार्याची गरज ! ते दरबारच्या हिताहिता- विषयीं विचार करितात कशाला ? बरें जर कामदारानी साहेब लोकांची मर्जी सुप्रसन्न ठेविली नाहीं तर रेसिडेंटाकडून त्यांच्या नालस्तीबद्दल यादी आली की, त्यांची उचलबांगडी झालीच. मग त्यांनी कांहीं अपराध केला असो अगर नसो याप्रमाणे काष्टाच्या दोन्ही शेवटांनी पेट घेतल्याने त्यांतील प्राण्यांनी कोणतीही बाजू धरली तरी त्यांचा नाश जसा अपरिहार्य तसा त्या बिचाऱ्या कामदार लोकांचा नाश अनिवार्य होता. त्यति अमरोळी पंचमहालची सुभेगिरी म्हटली म्हणजे अपयशाचे केवळ माहेरघर. हा सुभा कांहींसा काठेवाडाच्या मध्यभाग आला असून त्याची सरहद्द चाळीस पंचे- चाळीस कोस पर्यंत लांबली आहे. या पंचमहालच्या सरहद्दीवर अनेक संस्थानिकांचे मुलूख आले असून त्या संस्थानिकांबरोबर सीमेसंबंधी वगैरे अनेक प्रकारचे वाद हमे उत्पन्न होत असल्यामुळे अमरोळीच्या सुभ्यास पोलिटिकल एजंट आणि असिस्टंट पोलिटिकल एजंट यांजबरोबर वादविवाद करण्याचा हमेष प्रसंग येत असे. काठे- वाडांतील पोलिटिकल एजंट यानी संस्थानिकांचा पक्ष धरून अमरोळी पंचमहालच्या अधिकान्यास मनस्वी त्रास दिल्याचे दृष्टोत्पत्तीस आल्यावरून बडोद्याच्या रेसिडेंटानी आपला असिस्टंट अमरोळी पंचमहालांत ठेविला असून त्याच्या मध्यस्थीने पोलिटिकल एजंट यानीं अमरोळीच्या सुभ्याशीं पत्रव्यवहार करावा असा नियम केला आहे, यामुळे सुभ्याचा अधिकार बराच उपद्रवरहित झाला आहे, तथापि त्यांच्या अधिकाराची अवधी म्हटली म्हणजे कापती एक वर्षाची; कारण असा एक मोठा अधिकार राजाच्या कृपेंतील मनुष्यासच मिळावयाचा आणि तो तर ज्ञानशून्य असावयाचा तेव्हां अधिकार टिकतो तरी कोणत्या गुणावर आणि साहेब लोक त्यास टिकूं देतात कसचे ! ह्या सुभेगिरीत त्या काळी आणखी एक मोठे विघ्न होते. परस्परांचे परम देसाई आणि मुजमदार हे दोन जमीदार आणि अंडरसन साहेब यांच्या कृपेंतील मावजी हिरजी नांवाचा वाणी किंवा लमाणा हे त्रिकूट त्रिशंकू राज्याला जशीं तीन पातकें जडली होतीं तसें अमरोळीच्या सुभ्याच्या कपाळाला जडलें होतें. त्यांत मुजमदार यांचे प्रस्थ फार मोठे. साहेब लोकांमध्ये आणि काठेवाडांतील संस्थानिकांमध्ये त्यांचे वजन विशेष सुभ्याने जर त्यांच्या तंत्राने वर्तन केलें नाहीं तर पोलिटिकल एजंटा- कडून रेसिडेंटाकडे आणि त्यांच्याकडून दरबारांत त्याच्या नालस्तीबद्दलच्या यादीचा वर्षाव व्हावयाचा. सुभा मुजमदार यांचे धोरण ठेवून वागूं लागला कीं, देसाई याने दरबारांतील कारभाऱ्यांच्या साधनाने त्यांस वाटाण्याच्या अक्षता देऊन आपल्या पक्षाच्या मनुष्यास सुभेगिरीचीं वस्त्रे देवविलींच. मावजी हिरजीच्या धोरणाने वागले नाहीं कीं, अंडरसन साहेब यानी सुभ्याचा पिच्छा घेतलाच; याप्रमाणे त्या हतभाग्य सुभ्याची कुतरओढ होत असे. अशा झोटिंगपाछाई कारभारांत मोठ्या शहाण्याची मात्रा चालावयाची नाहीं तेथें ज्ञानशून्य मनुष्याचा पाड काय ? त्याने जसे तसे करून काह दिवस काढावे आणि अपयशरूप पांयेय बरोबर घेऊन परत यावे हा क्रम एक सारखा चालू होता.