पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१८६ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. करण्या पुरती हकीगत कमिशनास निवेदन करून त्या संबंधाची खरी हकीगत वगळली आहे. बळवंतराव देव यानी अमरोळीच्या सुभेगिरींत लक्ष रुपये मिळविले असे मावजी हिरजी नांवाचा एक मोठा खटपटी मनुष्य होता त्याने खंडेराव महाराज यांच्या मनांत भरवून दिले होते व त्या मनुष्यास दरबारांतील कांहीं कामदार मंडळीचीही अनुकूलता होती, याच मनुष्यावर गणपतराव अनंत महाजन यांच्या सुभेगिरीत अमरोळी पंचमहाल- चा कारभार करून अन्यायाने द्रव्य संपादन केल्याबद्दलचा आरोप आला होता आणि त्याबद्दलची चौकशी करण्याविषयों बळवंतराव देव यांस महाराजानी अमरोळीचे सुभे नेमले तेव्हां त्यांस हुकूम दिला होता. मावजी हिरजी यास जेव्हां असें वाटलें कीं, आपल्यावर दोष लागू होत आहे तेव्हां तो अमरोळीहून पळाला आणि महाराजांच्या कृपेंतील जासूद खिजमतगार वगैरे हलक्या लोकांच्या साह्याने आणि दरबारांतील कांहीं कामदार मंडळीच्या मदतीनें वर लिहिल्याप्रमाणे बळवंतराव देव यांजविषयीं महाराजांचे मन दूषित करण्यांत कृतार्थ झाला. कर्नल पार साहेब जे नुक्तेच कोल्हापूरच्या एजंटीचा राजीनामा देऊन विलायते स गेले ते त्या वेळेस अमरोळी पंचमहालचे असिस्टंट रेसिडेंट होते. त्यानी बळवंतराव देव यांस अशी सल्ला दिली कीं, तुम्ही स्वतः बडोद्यास जाऊन महाराजांच्या मनांतील संशयाची निवृत्ति करावी आणि मीही कर्नल बार साहेब यांस पत्र लिहून त्यांजकडून महाराजांच्या मनांतील कलुष काढून टाकवितो. बळवंतराव देव बडोद्यास येऊन कांहीं दिवस झाले नाहींत तोंच भाऊ शिंदे यांजवर सालमीन साहेब यांस लांच देण्याचा प्रयत्न केल्याबद्दलचा आरोप येऊन ते पदच्युत झाले आणि त्यामुळे खंडेराव महाराज आणि कर्नल बार यांच्या मध्ये वितुष्ट आले होते. बळवंतराव देव यांच्या शत्रूस ही उत्तम संधी सांपडली. त्यांनी महाराजांच्या मनांत असे भरवून दिलें कीं, साहेब लोकांच्या शिफारसीने महाराजांची ते कांहीं पखा बाळगीत नाहींत; आणि महाराजांच्या मनांत असें भरवून ठेविल्यामुळे कर्नल बार साहेब यानी त्यांजविषयीं महाराजांस आग्रहपूर्वक शिफारस केली म्हणजे महाराज विशेष चिरडीस जाईत. भाऊ शिंदे यांचे मनही बळवंतराव देव यांजविषयीं शुद्ध नव्हतें. कर्नल बार साहेब यानी त्यांच्या समक्ष बळवंतराव देव यांचा आपल्या बंगल्यांत मोठा सत्कार करून त्यांच्या हुशारीबद्दल व लायकीबद्दल प्रशंसा करितांना भाऊ शिंदे यांस उद्देशून कांहीं शब्द बोलले होते त्याचे वोढे त्यानी बळवंतराव देव यांजवर या प्रसंगी काढले, कामकाजाच्या संबंधाने ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर दरबारांतील ज्या कामदार लोकांचा संबंध असे त्यांस आपला अधिकार सुरक्षित ठेवणे फारच दुर्घट होते. कामदार लोकांनी ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांची मर्जी सुप्रसन्न ठेवून कामांत यश मिळविले की, दरबारांत त्यांविषयीं मत्सर उत्पन्न झालाच मग त्यांनी सरकारची नौकरी कितीही एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणाने केली असो, व त्यांत कितीही सरकारचे हित