पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचे कमिशन. ( १८५ ) होते. सांप्रतकाळी ते आपल्या कामांत बेपर्वाईने वागतात आणि वाईट काम केल्याबद्दल माजी राजानें दंड घेऊन त्यास काढून दिले होते असे सांगण्यांत आहे असें कमिशनचे म्हणणे आहे. लांच घेतल्यामुळे लुनावाड्याच्या दरबारांतून त्यांस काढून दिल्याबद्दल कमिशनास मिळालेली माहिती अगदी चुकीची आहे. वीस वर्षांवर घडलेल्या गोष्टीविषय कोगाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे उल्लेख करणे कामेशनास योग्य नव्हतें. रेवा काठाच्या एजंटाच्या दप्तरांतून त्यानी याबद्दलची माहिती मागवून त्यावरून जसे दिसून येईल तसे उल्लेखांत आणावयाचे होतें. श्रीपाद बाबाजीच्या संबंधाने कर्नल फेर यांजबरोबर बळवंतराव देव यांस अंमळ कडक भाषण करण्याचा प्रसंग आला होता त्याचीं हीं फळें आहेत. * ते आपल्या कामांत बेपरवाईने वागतात असें कमिशनरच्या म्हणण्यांत आले आहे त्याचे कारण दुसरें कांही दिसत नाहीं. बळवंतराव देव यानीं कर्नल फेर यांस महाराजांसमक्ष एक वेळां आपली हकीगत निवेदन केली तेव्हां त्यांस स्पष्ट कळविलें होतें कीं, रेवाकाठ्याचे पोलिटिकल एजंट कर्नल वालीस साहेब यांचे व माझें सूत्र नमलें नाहीं सबब मी राजीनामा देऊन लुनावाड्याच्या दरबारची चाकरी सोडली असून एजन्सीच्या दप्तरांत मजकडे कांहीं एक गुन्हा नाहीं असा लेख आहे; यासाठीं तें काम आणवून आपली संशयनिवृत्ति करून घ्यावी, परंतु त्याप्रमाणें कर्नल फेर यानी कांहीं केलें नाहीं व कमिशन यानींही पुरती चौकशी केल्यावांचून ज्या दोषाचा कधीं कोणी उद्गार काढला नव्हता तो दोष त्यांजवर बेलाशक स्थापित केला आहे. बळवंतराव देव यानी लुनावाड्याच्या दरबारची चाकरी सोडल्या नंतर बडोद्याच्या दरबारांत त्यांस चाकर ठेविले तेव्हां त्या वेळचे कारभारी गणेशपंत भाऊ यानी ते निर्दोष आहेत अशी खात्री करून घेतली होती. आनंदराव लक्ष्मण जे भाऊ खेडकर या नावाने प्रसिद्ध गृहस्थ आहेत त्यानीच गणेशपंत भाऊ यांस शिफारस करून बळवंतराव देव यांस सदर न्यायाधिशाच्या शिरस्तेदारीची जागा देवविली होती आणि पूर्वी उभयतांचा ऋणानुबंधही फार उत्तम होता. बळवंतराव देव यांचा बडोद्याच्या दरबारांत जो उत्कर्ष झाला त्याचे उगमस्थान भाऊ खेडकर यांची त्यांजवरील कृपा असें म्हटलें असतांही चालेल. भाऊ खेडकराविषयीं बडोद्याच्या राष्ट्रांतील लोकांची इतकी भक्ति आहे त्याचें कारण हेंच आहे की, त्यानी अनेक लोकांची कल्याणे केली आहेत. आतां त्या कल्याण करण्याच्या रीतीत कांहीं दोष असतील व अवश्य कर्तव्य कर्माचा लोपही झाला असेल, परंतु लोकांस आपल्या स्वार्थाची गरज असते ते कल्याण करणाराच्या सदसद्विचाराकडे लक्ष देऊन अप्रीति करितात! मग कां त्यास चाहतात अथवा खंडेराव महाराज यानी बळवंतराव देव यांजपासून दंड घेऊन कामावरून दूर केल्या- बद्दलची कमिशनची माहिती फार अपुर्ती असून माहिती देणाराने दोष लागू

  • बारावा भाग पहा.

२४.