पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १०४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास: ज्या राष्ट्राचा राजा मल्हारराव महाराज आणि दिवाण शिवाजीराव खानवेलकर त्यां राष्ट्रीतील प्रमुख कामदार मंडळीस आपल्या पदराला जनापवादाचा डाग न लागू देणें ही गोष्ट सर्वथैव अशक्य होती. उदरभरणार्य त्यांनी महाराजांची चाकरी करून आपल्या शहाणपणांस कलंक लावून घेतला होता त्याविषयीं पूर्वी लिहिण्यांत आले आहे. कमिशनानी कामदार लोकांच्या चालीविषयीं स्वतंत्रपणे कोणत्या रीतीने शोध केला हे आपणास समजण्यास कांहीं साधन नाहीं. दिवाण नाना साहेब खानवेलकर यांजविषयों कमिशनानी जें कांहीं लिहिलें आहे त्या- विरुद्ध आपणास काहीं लिहितां किंवा बोलतां येत नाहीं. तमाशांतील प्रसिद्ध सोंगाड्या राणू गोंधळी खानवेलकर यांच्या समक्ष महाराजांपुढे दिवाणाचें सोंग आणून त्यांच्या लांचखाऊपणाच्या दुष्टाचरणाबद्दल शेकडो लोकांदेखत त्यांची पराकाष्ठेचो फजिती उड- मग कमिशनानी त्यांजविषयीं इवें तसे लिहिले तरी त्यांस बाघ कोण वीत असे. आणणार !! सेनापती बापू साहेब मोहिते यांजविषय लोक चांगले बोलतांत असें कमिशनानों लिहिलें आहे. राज्यकारभारांतील मनुष्याच्या हाताने कांहीं चांगले अथवा वाईट झा - ल्यावाचून लोक कधीही कोणास चांगले अथवा वाईट म्हणत नाहींत... मोहिते हे शेतकीचा धंदा सोडून दक्षिणेतून बडोद्यास येऊन नुकतेच सेनापति बनले होते व दरबारांत त्यांचे वजन नवते असे तर कमिशनानींही लिहिले आहे. तेव्हां त्यांच्या हातून कोणाचें बरें अथवा वाईटच होण्याचा संभव काय ? तथापि ते दुष्ट बुद्धीचे होते असे लोकांच्या अनुभवास आलेले नव्हतें यास्तव कमिशनानी त्याजवर जी कृपा केली होती त्यास ते पात्र होते असे म्हणण्यास काही हरकत नाहीं.. गोविंदराव मामाविषयीं लोकांचे मत चांगले नाहीं हा कमिशनचा लेख अगदी लोकमताविरुद्ध आहे. या गृहस्थाच्या विरुद्ध कमिशनापुढे एक शब्द देखील कोणी बोलला नाहीं. श्रीमंत गोपाळराव मैराळ यांच्या घराण्याचा गोविंदराव मामा यानी पुष्कळ वर्षे कारभार करून प्रामाणिकपणाविषयीं मोठी कीर्ति संपादन केली होती. मल्हारराव महाराज यांस बेमुरखत कान उघडून सला देण्यांत हे प्रथमांगुलीनिविष्ट होते. कमिशनानी अपेक्षा केली असती तर आपल्याविषयीं लोकमत चांगले आहे असा हजारो प्रतिष्ठित लोकांच्या सह्यांचा मेहेजरनामा त्यानीं कमिशनापुढे रुजू केला असता. देशी राजांच्या दरबारांतील कामदार लोक लांचखाऊ आणि बदसलागार असे इंग्रज सरकारचे अधिकारी म्हणत आले आहेतच आणि आतां त्यांनी त्या कामदार लोकां- विषयी लोकमत चांगले नाहीं असा दोष लाविण्याची एक नवी रीत काढिली आहे. सर्व लोकांच्या तर्फे मुख्त्यार घेऊन गोविंदराव मामाविषयीं कमिशनास कोणी माहिती कळविली असेल ती असो. 1. बळवंतराव देव यांजवर कमिशनानीं तीन दोष लागू केले आहेत. लुनावाड्याच्या राजाचे ते कारभारी असतां त्यानी लांच घेतली, सबब त्यांस कामावरून काढून दिलें