पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मौडचे कमिशन. सेनापतीविषयों लोक चांगले बोलतात, परंतु त्यांचे दरबारांत वजन नाहीं. १. वरिष्ठ कोर्टाच्या अधिकाऱ्यांपैकी. १. गोविंदराव मामाविषयी लोकांचे मत चांगले नाहीं. (१८३) २. बळवंतराव देव यांस पूर्वी लुनावाड्याच्या दरबारांतून लांच घेतल्याच्या तोहमतीवरून काढून दिले होते. सांप्रत त्यांच्या हुद्याच्या कामांत ते बेपरवाईने वागतात. वाईट कामाबद्दल माजी राजाने दंड घेऊन त्यांस काढून दिलें होतें असें सांगण्यांत आले आहे. ३. बापुभाई दयाशंकर यांची अब्रू चांगली आहे आणि ते प्रामाणिक आहेत. ४. मार्तंडराव अण्णा यांस कोणी चांगले म्हणत नाहीं, परंतु त्यांचे दरबारांत फारसे वजन नाहीं. रिविन्यु कमिशनर यांचा अम्मल मोठा जुलमी आहे आणि त्यांजवर लांच घेतल्याबद्दल भाणि जुलूम केल्याबद्दल आरोप आले आहेत. कमिशनापुढे ज्या फिर्यादी झाल्या त्यांपैकी कितीएक कामांत जुलूम करण्यति व रीती- विरुद्ध कामे करण्यांत सर फौजदार यांचा संबंध होता असे दिसून आले आहे, आणि असे म्हणतात की, माजी महाराजानी त्यास लांच घेतल्याच्या गुन्ह्याबद्दल कैदेत ठेविलें होतें. डिप्युटी रिविन्यू कमिशनर यांस ब्रिटिश सरकारच्या चाकरींतून लांच घेतल्याबद्दल व दुसऱ्या वाईट चालीबद्दल बरतर्फ केले होते. लोकांचे मत यांजविषय अति वाईट आहे. फडणीस यांजविषय ज्यास्त मांगणसासारखे काहीं नाहीं, परंतु वसंतरामभाऊ हा निःशंकप- णें पाहिजेल ते काम करण्यास हमेषा महाराजांस अनुकूल आहे असे लोक मानितात, आणि कमिशनापुढे जे मोकदमे आले त्यांपैकी कांहीं मोकदम्यांत त्याचें नांव बाईट कृत्यांत गोवले गेले आहे. FIRE WET वर सांगितलेल्या लोकांविषयों कमिशनानें जो अभिप्राय दिला आहे तो रेसिदेंट साहेब यांजपासून आम्हास माहिती मिळाली त्यावरून व आम्ही स्वतंत्रपणे चौकशी केली त्यावरून दिला आहे असे त्याणी लिहिले आहे. यावरून असे दिसतें कीं, बडोद्याच्या दरबारांतील कामदार मंडळीविषयों कामेशन चें मत एकंदरीने चांगले नवते. त्यानी एक दोन मंडळीबद्दल चांगले शब्द खर्च केले आहेत, परंतु ते शिवाय करून बाकी सर्व कामदारांस कांहींना कांहीं तरी दूषण देऊन त्यांस दिवाणाचे मालिकेत गोंवले आहेत. कमिशन पाणी केवळ रेसिंर्देट साहेब यांच्या सांगण्यावरच भरंवसा ठेविला नाहीं, त्याणी स्वतंत्रपणेंही याबद्दल चौकशी केली हें ठीकच केलें; कारण रोसेडेंट साहेब याणी पुष्कळ गोष्टी मुद्दाम वाढवून सांगितल्या होत्या असे त्यांच्या अनुभवास आल्यावर रेशेस- डेट साहेब यांजवरच भरंवसा ठेवणें त्यांस उचित नवते, परंतु त्याबद्दलची त्यांची चौकशी rai अपुरती होती आणि माहिती देणारांनी खऱ्या गोष्टी छपवून ठेवून त्यांची भलतीच समजूत केली होती असें आपल्यास पुढील हकीकतीवरून कळेल.