पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. ठेवण्यासाठी त्यानीं स्त्रियोपभोगापासून देखील आपले मन आवरले होतें. लग्नाच्या बायको खेरीज त्यांस आणखी चार उपस्त्रिया होत्या; यावरून ते विशेष स्त्रीलंपट होते असे लौकिकांत दिसे, परंतु खरोखर त्याविषयी ते विशेष निरिच्छ होते. महाराज यांचा प्रकार त्याहून उलटा होता. त्यांचे शरीर अशक्त असून रोगी होते. त्यांस विषयाची चटक वाजवीपेक्षां ज्यास्त असून त्यांच्या मनावर जबर आघात झाले होते, यामुळे ते चिरायुषी होतील अशी आशा नव्हती, परंतु ईश्वरी संकेत निराळाच होता. मल्हारराव खंडेराव महाराज बडोद्याचें चौदा वर्षे राज्य करून एकाएकी संवत १९२५ मार्गशीर्ष शुद्ध ७, तारीख २० नवंबर सन १८७० रोजी दिवसाचे बारावर दोन वाजतां मकरपुरा येथे परलोकवासी झाले. महाराजांच्या उदरांत कांहीं रोग झाला होता, व तो प्राण- घातक आहे असें हकिमानीं त्यांस सुचविले होते; परंतु त्यांच्या दुराग्रही स्वभावामुळे औषधो- पचार करण्यांत त्यांनी फार हयगय केली, आणि आपले दुखणे साधारण आहे असे आग्रहाने लोकांस दाखवून आपल्या प्राणाची हानि करून घेतली. खंडेराव महाराज अति अस्वस्थ झाल्याची खबर बार साहेब यांस समजतांच ते मकर- पुण्यास गेले, परंतु त्या पूर्वीच महाराजांचें देहावसान झाले होते. अतिंग दिवाण निंबाजीराव ढवळे यांच्या विचाराने मल्हारराव महाराज यांस पादऱ्याहून आणविण्याचे ठरलें, तेव्हां भाऊ शिंदे जवळ होते. त्यानी खंडेराव महाराज यांची राणी जमनाबाई साहेब गरोदर आहेत असे कळवून आपल्या भावी विपद्दशेस एक ज्यास्ती साधन करून ठेविले. बार साहेब यानी भाऊ शिंदे यांस तुम्हास मध्ये बोलण्याचा अधिकार नाहीं अशी धमकी दिली म्हणून लोक सांगतात, परंतु आम्हास तें खरें वाटत नाहीं. भाऊ शिंदे यान जे कांहीं कळविले होतें तें खरें होतें. त्याबद्दल रोसडेंट साहेब यानी त्यांस रागे भरावें असें कांहीं त्यांत नव्हतें. मल्हारराव महाराज यांस पादऱ्याहून आणवून सांप्रदायाप्रमाणे व्यवस्था करावी असे अक्तिंग दिवाण यांस सांगून बार साहेब कापांत गेले, आणि नेटिव एजंट हरी आपाजी यांस राजवाड्याचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविलें. निंबाजीराव ढवळे यानी घोड्याची गाडी, दोन स्वार व रेसिडेन्सीतील एक पटेवाला यांस मल्हारराव महाराज यांस आणण्याकरितां पादऱ्यास पाठवून, खंडेराव महाराजांचें प्रेत मोतीबागेतील बंगल्याजवळ आणिले. मल्हारराव महाराज सूर्यास्ताचे सुमारास मोतीबागेजवळ आले. त्यांच्या प्रिय मंडळी पैकीं कांहीं लोक त्यांस सामोरे गेले होते; त्यांपैकीं तात्या टोणपे आणि बापाजी परभू यांस महाराजानी आपले गाडीत घेतले होतें. मोतीबागे जवळ जो लोकसमुदाय जमला होता त्यांनी मल्हारराव महाराज यांस पाहिले तेव्हां त्यांस धीर आला. महाराज यानीं बार साहेब यांचा तेथें शोध केला, आणि ते तेथें नाहींत असे कळ- ल्याबरोबर त्यांनी आपली गाडी मागे फिरविली, आणि कापांत जाऊन बार साहेबांस भेटले. बार साहेब यानी महाराजांपासून असा दस्तऐवज लिहून घेतला कीं, जमनाबाई यांस पुत्र झाला असतां राज्यावर माझा कांहीं हक्क नाहीं. नंतर महाराज पुनः मोतीबागेत आल्यावर खंडेराव महाराज यांचे प्रेत अशुभ सूचक समारंभानिशी स्मशानभूमीवर नेले,