पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज गादीवर बसण्या पूर्वीचें वर्तमान. (३) यांजवर लागलीच सक्त पहारा ठेविला, आणि त्या कटामध्ये जे लोक होते त्यांस कैद केले, आणि रेसिडेंट साहेब यांच्या सल्याने मल्हारराव महाराज यांस पादरें येथें प्रतिबंधांत ठेवि- ण्याचा ठराव झाला. उभयतां बंधूंची मातोश्री चिमणाबाई बया साहेब जिवंत होत्या. त्यांस मल्हारराव यांची ही स्थिति पाहून फार दुःख झाले. महाराज यांस पादऱ्यास रवाना करावयाचे त्या दिवश बालेस साहेब राजवाड्यांत आले होते. त्यांची व खंडेराव महाराज यांची महाराज यानी फार काकुळतीने विनंती केली, व खंडेराव महाराज यांचे पाय घट्ट धरिले, परंतु सर्व व्यर्थ. महाराजांचें शेवटपर्यंत हेच म्हणणे होतें की, माझ्यावर हे सर्व कुभांड रचिले होते. ज्या वेळेस त्यांस पादयस रवाना केले, त्या वेळेस त्यांच्या दुःखाबद्दल ज्यांच्या नेत्रां- वाटे अश्रुपात आले नाहीत असे लोक फार थोडे होते. मल्हारराव महाराज यांची स्त्री भागुबाई यांचा असा आग्रह होता की, मला माझ्या पतीबरोबर पादऱ्यास जाऊं द्यावें, परंतु खंडेराव महाराज यानीं तें ऐकिले नाहीं; कारण कीं ती मोठी कारस्थानी बायको होती असे त्यांस वाटत होते. भागुबाई यांची प्रकृति अशक्त होती, व त्यांस पोटदुखीची व्यथा होती. त्यांत पतिवियोगाचें त्यांस नवे दुखणे जडल्या- मुळे मल्हारराव महाराज पादऱ्यास गेल्यावर त्या लवकरच गत झाल्या. मल्हारराव महाराज यांच्या शरीर सुखास उपयुक्त अशी खंडेराव महाराज यानी तजवीज ठेविली होती. ज्या वस्तूंची ते अपेक्षा करतील त्या तात्काळ त्यांस पुरवाव्यात अशी त्यांजवर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या कामगारांस सक्त ताकीद होती. रोख पैसा मात्र महाराजांच्या हातांत जाऊं देत नसत. महाराज यांची स्थिति कशी आहे हे पाहण्यासाठी तीन चार महिन्यांनी रोसडेंट साहेब पादऱ्यास जात होते. यावरून इंग्रज सरकारच्या मनांत त्यांजविषयों दयाभाव होता असे दिसते. परंतु मल्हारराव महाराज यानी मुंबई सरकाराकडे काही अर्ज पाठविला तर ' इंग्रज सरकारास गायकवाड सरकारचे कुटुंबाचे संबंधांत मध्यस्थी करण्याचा अधिकार नाहीं ' हा एक ठरीव जबाब त्यांस नेहेमी मिळत असे. 6 महाराज यांस कैदेतून मुक्त करावे यासाठी त्यांच्या मंडळीपैकी व्यंकटराव पटवर्धन, आणि बाजीराव विठ्ठल यांनी पुष्कळ प्रयत्न केले, व मुंबई सरकारांस देखील त्यांची शेवटीं करुणा आली होती, पण रोसडेंट साहेब यांची अनुकूलता नसल्यामुळे महाराजांची सुटका झाली नाहीं; असे लोकांचे म्हणणे होतें. सन १८६३ सालांत खंडेराव महाराज मुंबईस गेले होते, त्या वेळेस सर बार्टल फ्रियर साहेब हे मुंबईचे गवरनर होते. आपण जो दत्तक घेऊं तो इंग्रज सरकारानी कबूल करावा अशी खंडेराव महाराज यानी त्यांस विनंती केली होती, परंतु तीस त्यानीं आपले अनुमोदन दिले नाहीं. यावरून खंडेराव महाराज जर निपुत्रिक मरण पावले तर मल्हारराव महाराज गादीचे मालक होणार हा सिद्धांत ठरून चुकला होता. परंतु असा दिवस येईल किंवा नाहीं याविषयी लोकांस मोठी भ्रांती होती. खंडेराव महाराज शरीराने सदृढ असून त्यांस कोणतेंही दुर्व्यसन नव्हते. शरीर सामर्थ्य कायम ·