पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१८२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. कमिशन याणी त्यांच्या रिपोर्टाच्या तिसरे कलमांत मल्हारराव महाराज आणि त्यांचे दिवाण आदिकरून अधिकारी मंडळीविषयीं साधारण माहिती लिहून कामदार लोकांविषयीं त्याणी थोडीशी टीका केली आहे, त्यांतील तात्पर्य याप्रमाणे आहे:- मल्हारराव महाराज हे सयाजीराव महाराज यांचे पांचवे पुत्र येवढेच आतां जिवंत आहेत. यांचे वय त्रेताळीस वर्षांचें आहे. त्यांच्या चार वडील भावांपैकीं गणपतराव आणि खंडेराव एकामागून एक बडोद्याचे राजे झाले. सन १८६३ च्या सालांत खंडेराव महाराज यांस विषप्रयोग करून अगर दुसरा कांहीं उपाय करून मारण्याच्या कटांत मल्हारराव महाराज यांचे अंग होते असा त्यांजवर आरोप आला, आणि त्याबद्दल ते राष्ट्राचे कैदी म्हणून पाद्रे येथे कैदेत ठेविले होते, आणि त्यांच्या सोबत्यांस लांब मुदतीच्या कैदेच्या शिक्षा दिल्या होत्या. सन १८७० च्या नवंबर महिन्याच्या २८ वे तारखेस खंडेराव महाराज यांस एकाएकी देवाज्ञा झाली तेव्हां मल्हारराव महाराज यांस पाद्रचाहून बोलावून आणून रेसिडेंट साहेब याण बडोद्याच्या राज्याचे अधिकारी ठरविलें, परंतु त्यांस असे कळविलें होतें कीं, तुमच्या अधिकाराचे अस्तित्व ब्रिटिश सरकारच्या मंजुरीवर अवलंबून राहील. डिसेंबर सन १८७० रोजी ब्रिटिश सरकारानी त्यांच्या अधिकारास मंजुरी दिली. महाराजांच्या दरबारांत मुख्य अधिकारी व सलागार लोक आहेत ते. १. दिवाण शिवाजीराव खानवेलकर. २. सेनापति बापूजीराव मोहिते. ३. वरिष्ठ कोर्टाचे मेंबर. १. गोविंदराव मामा २. बळवंतराव देव. FISIT ३. बापुभाई दयाशंकर. ES FIRS १. मार्तंडराव अण्णा ४. रिव्हिन्यू कमिशनर हरीबा गायकवाड. ५. सर फौजदार बळवंतराव येशवंत., दुसरे अधिकारी ज्यांचा दरबारचे कामकाजाशी कमीज्यास्त संबंध आहे ते. डिप्युटी रिव्हिन्यू कमिशनर नारायणभाई ललूभाई. २. माधवराव रामचंद्र फडनवीस. ३. महाराजांच्या खाजगी दुकानाची व्यवस्था पाहणार वसंतरामभाऊ." पहिले दोन हे महाराजांचे मेव्हणे आहेत. असल्यामुळे दिवाणगिरीच्या अधिकारास अगदी आहे व त्याणें गैर कायद्याची कामे करून विख्याती आहे. ता ० १ T T दिवाण गैर माहितगार आणि अननुभवी नालायक आहे. तो अतिशय लोभी पुष्कळ द्रव्य संपादन केले अशी त्याची