पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मौडचें कमिशन. ( १८१ )

  • खंडेराव महाराज यांच्या तीर्थरूपास इंग्रज सरकारच्या जामिनकीबद्दल पराकाष्ठेचा त्रास भोगावा लागला हे गायकवाडांचा इतिहास ज्यास आबगत आहे त्यास माहित आहे, तथापि खंडेराव महाराज याणी दोन्ही दिवाणांच्या इनामाबद्दल इंग्रज सरकारानी जामिनकी करावी म्हणून शिफारस केली, परंतु राजा आणि त्याची प्रजा यांजमध्ये आप- ल्यास पडावयाचें नाहीं म्हणून गवरनर जनरल अर्ल क्यानिंग यांणी जामिनगिरी कर- ण्याचे तर कबूल केलें नाहीं, परंतु त्याबद्दल महाराजांस जें उत्तर पाठविलें त्याची शब्द योजना अशी कांहीं सुंदर आणि व्यापक आहे की, इंग्रज सरकारानी जामिनकी केल्या- सारखे श्रय आलेले आहे. प्रयोग DIE FISP

F अर्ल क्यानिंग याणी ता० ६ फेब्रुवारी सन १८६० रोजी खंडेराव महाराज यां खलिता लिहिला त्यांत असें लिहिलें आहे की, महाराज आपल्या इच्छेने जी देणगी देतात तीच स्वतः सिद्ध जामिनकी आहे, आणि ती महाराजांची देणगी कोणाच्याने परत घेववणार नाहीं. या खलित्यावरून सर रिचमंड शेक्सपियर याणी ता० १ मे सन १८६० रोजी दरबारांत यादी पाठविली त्यांत देखील गणेश सदाशिव यांची प्रशंसा करून त्यांच्या इनामास जितकी बळकटी आणवेल तितकी आणिली आहे. परंतु कर्नल फेर यांच्या आश्रयाने फिर्यादी यास फिर्यादी करितांना ज्या लाभाची आशा उत्पन्न झाली होती तसा कांही लाभ झाला नाहीं. कमिशनानी याबद्दल असा अभिप्राय दिला आहे कीं, दहा हजार रुपयांचे उत्पन्नाचे गांव इनाम द्यावयाचे असा संकेत होता खरा, परंतु कमीज्यास्त उत्पन्न झालें असतां दरबारानी कांही हरकत क नये अशी सनदेत अट लिहिली आहे, सबब आतां दरबारास कांही हक्क राहिला नाहीं. मल्हारराव महाराज यांजकडे काय तो येवढाच दोष आहे की, त्यांच्या बंधूनें जो अन्याय केला तो ते दूर करीत नाहींत. इंग्रज सरकारानीं जामीनागरी पतकरली असती तर ज्यास्ती उत्पन्नाचा गांव आहे या सबबेनें गायकवाड सरकारास त्याणी गांव जप्त करून दिला असता की काय ? या प्रश्नाचे उत्तर जर अस्तीपक्षाने देतां येईल तर गणेशपंत यांचे वंशजास दहा हजार रुपयां- आणि 'जास्ती पक्षाने देतां येईल तर च्या उत्पन्नाचा गांव वंशपरंपरेने दिला पाहिजे धावट गांव त्यास परत मिळाला पाहिजे, मग तो किती कां उत्पन्नाचा असेना, परंतु असें ऐकण्यांत आहे कीं, राजा सर टी. माधवराव तर त्यांचा वंशपरंपराचा हक्कच कबूल करीत नाहींत. फक्त कांही रोख रक्कम आमची इच्छा असेल तोपर्यंत आम्ही तुम्हा देऊ असे गणेशपंत भाऊ यांच्या पुत्रास सांगतात. तिसऱ्या भागांतील महत्वाच्या फिर्यादी होत्या त्याविषयीं संक्षिप्त वृत्त सांगून हें प्रकरण पुरे केलें आहे. कमिशनापुढे ज्या प्रकरणांची चौकशी झाली आहे. आताँ कमिशनानीं हिंदुस्थान सरकारास सांगावयाचे आहे. त्याबद्दल संक्षिप्त हकीकत वर सांगितली त्याबद्दल रिपोर्ट केला त्यांतील तात्पर्यं