पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. मोठे उणीकरण करण्याचा भाईचंद यांस अधिकार नव्हता, होते, असे मानितां येत नाहीं. याविषयीं दरबारास अज्ञान • पहिल्या मोकदम्पांत नी तडजोड सांगितली आहे तशीच या कामांत झाली पाहिजे त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. काही दागिने मोडले आहेत असें कमिशनास कळ- विण्यांत आले आहे, परंतु जे कायम आहेत त्याची किंमत केली असता मोडलेल्या दागिन्यांची किंमत करितां येईल. मागील मोकदम्यांत लिहिल्याप्रमाणे दोन्ही पक्षकार ब्रिटिश सरकारची प्रजा आणि ब्रिटिश सरकारच्या दिवाणी कोर्टास जबाबदार असते तर फिर्यादी त्यांनी आपला दावा जिंकला असता; परंतु तसे नाहीं त्यापेक्षा तोडजोडीनें निकाल झाला पाहिजे हाच काय तो मार्ग आहे असे आमच्या विचारास येतें. * तिसरी फिर्याद बळवंतराव गणेश वझे यांची होती. वोझे खंडेराव महाराज यांचे कारकीर्दीत बडोद्याचे दुय्यम त्यांचे तीर्यरूप गणेश सदाशिव दिवाण होते. त्यांस खंडेराव सन महाराज यानी बडोदे परगण्यांतील धावटगांव इनाम दिला होता तो मल्हारराव महाराज यानी जप्त केला होता तो परत मिळण्याबद्दल ही फिर्यादी होती. गणेश सदाशिव जिवंत होते तोपर्यंत म्हणजे सन १८६६ पर्यंत तो गांव त्यांजकडेस चालत होता. १८६७च्या सालीं खंडेराव महाराज यानी तो गांव जप्त केला व तो अशा सबबेने की, दहा हजार रुपयांचे उत्पन्नाचा गांव इनाम द्यावयाचा संकेत होता त्यापेक्षां या गांवचें उत्पन्न फार ज्यास्त होतें. सन १८७१चे सालांत बार साहेब यांच्या शिफारशीवरून मल्हारराव महाराज यानी या गांवावरील जप्ती उठवून गणेश सदाशिव यांच्या वारसाच्या स्वाधीन केला, पण जप्तीतील वर्षांत जे उत्पन्न सरकारांत आलें होतें त्यापैकीं दरसाल रुपये दहा हजार प्रमाणे गणेश सदाशिव यांच्या वारसास देऊन बाकीची ४३२०० -१५-० रुपयांची रक्कम मल्हारराव महाराज यानी घेतली. फिर्यादीचे म्हणणे असे होतें कीं, ही रक्कम नजराणा म्हणून घेतली, पण यावर दरबारचें असें म्हणणे होते कीं, नजराण्याची ठोक रक्कम असते त्या रकमेवर आणे पाव आणे नसतात आणि ज्यापेक्षां त्रेचाळीस हजार दोनशे रुपये पंधरा आणे सरकारांत घेतले आहेत त्यापेक्षां हा नजराणा नाहीं. दरबारानी गणेशपंत यांच्या वंशजांनी जी चूक केली त्याबद्दल फायदा घेतला खरा, परंतु आम्हास वाटतें कीं, ही रक्कम नजराणा म्हणूनच मल्हारराव महाराज यानी घेतली असावी. दहा हजार मल्हारराव महाराज यांचे कारकीर्दीत याबद्दलचा कांहीं निकाल झाला नव्हता. राजा सर टी. माधवराव यांनी आपल्या कारकीर्दीत जव्हेरी लोकांचा कसा निकाल केला हैं माहीत नाहीं. ब्रिटिश सरकारच्या दिवाणी कोर्टात जो दावा जिंकला गेला असतां तो सर टी. माधवराव यांजपुढे जिंकला गेलाच पाहिजे; कारण मल्हारराव महाराजांसारखे सबब सांगून जव्हेरी लोकांस पहिल्याने नक्की केलेली किंमत न देण्याविषयीं सर टी. माधवराव यानी कांहीं हरकत घेतली नसेल. इतक्यावर जर जव्हेरी लोकांस पहिल्यानें ठरलेली किंमत मिळाली नसेल तर दरबारांतून लोकांला पैसा देण्याच्या संबंधानें सर टी. माधवराव यांचे धर्मशास्त्र निराळेंच आहे असें मानिले पाहिजे; कारण तसा अनुभव शेंकडो लोकांस आलेला आहे. त्यांतून जव्हेरी लोक बचावले असतील कीं काय याचा मोठा संशयच आहे.