पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचे कमिशन. (१७७) दुसऱ्या जव्हेऱ्याची फिर्यादी अशी होती की, बडोद्याचा भाईचंद जव्हेरी याच्या विद्यमाने मी महाराजांस ११,९१,०४७ रुपयांचे दागिने विकत दिले, आणि हा सगळा ऐवज गोपाळराव मैराळ यांच्या दुकानों भरून भाईचंद जव्हेरी याजपासून पावती घ्यावयास सांगितले. गोपाळराव मैराळ यानी आपले १,८९,८३४ रुपये मजकडे घेणें आहेत ते कापून घेऊन बाकीचा ऐवज भाईचंद यांस द्यावा आणि त्याने मजकडे अमदाबादेस पाठवावा असा बंदोबस्त केला. महाराजानी आपल्या सहीची सदई रुपयांची दुकानावर चिठ्ठी लिहिली ती वसंतरामभाऊ याच्या हातांत गेली. त्यानें तो सर्व ऐवज आपल्या हाताखाली घालून भाईचंद याजपासून पुण्या किंमतीची पावती घेतली आणि आठ दिवसानंतर ६, ६२, २५९ रुपये गोपाळराव मैराळ यांस दिले आणि बाकीचे रुपये मागाहून देऊ म्हणून सांगितले. SEPT गोपाळराव मैराळ यानी आपले घेणे कापून घेऊन बाकीचा ऐवज भाईचंद यांस दिला. भाईचंद यांस बाकीचा ऐवज दरबारांतून वसूल करण्याविषयीं सांगितले, पण वसंतरामभाऊ यानें ऐवज देण्याचे नाकबूल केले. भाईचंद यांस ऐवज दिला तो अद्याप त्याजपाशीच आहे. माझे रुपये ५,२८,७८८ घेणे आहेत ते दरबाराकडून व्याजसुद्धां देववावे, दरबारचे म्हणणें असें होते की, फिर्यादी म्हणतो त्या किंमतीस जवाहीर खरेदी घेतले पण तें भाईचंद याजपासून खरेदी घेतले आहे. फिर्यादी मगनलाल हकमचंद याचा त्यांत संबंध नाहीं. भाईचंद याने पहिल्याने जी दागिन्यांची किंमत ठरविली होती त्या रकमेची पावती दिली आहे, परंतु नंतर त्या जवाहिराची पुनः किंमत केली ती रुपये ६,६२,२५९ झाली ती भाईचंद याने घेण्याचे कबूल केले व त्याप्रमाणे दरबारांतून ऐवज दिला आहे व त्याबद्दल गोपाळराव मैराळ यांच्या गुमास्त्यापासूनही पावती घेतली आहे. फसव- पावतीप्रमाणे रुपये घेण्याविषयी भाईचंद दावा करितो तो खोटा आहे. णुकीचा धंदा करण्यांत तो प्रख्यात आहे. त्याने अप्रामाणिकपणाने सरकारचा पैसा गटकाविला आहे. महाराजानी स्वतः सर रिचर्ड मोड यांस असे कळविलें कीं, कर्नल बार यांच्या समक्ष हें जवाहीर मी माजी गवरनर ( सर सीमोर फिट झरल्ड) जेव्हां बडोद्यास आले होते. तेव्हां त्यांस दाखविले. तेव्हां गवरनर साहेब म्हणाले की, त्याची किंमत फार जबर आणि खऱ्या किंमतीच्या फार पलीकडे आहे. कमिशनास दरबारचें म्हणणे पसंत झाले नाहीं. त्यांचे ध्यानास असे आले की, भाईचंद हा एक एजेंट असून त्यांस फिर्यादीच्या तर्फे थोडी रक्कम घेऊन भरपूर रूप- यांची पावती देण्याचा अधिकार नव्हता आणि जवाहीर व मिळकत फिर्यादीची आहे असे दरबारास माहीत नव्हते, व फिर्यादीच्या अनुमतावाचून ठरलेल्या किंमतीत इतके २३.