पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचे कमिशन. ( १७९) रुपयापेक्षां ज्यास्त उत्पन्नाचा गांव गणेशपंत यांच्या वंशजास द्यावयाचा नव्हता तर धावटगांव त्यांस परत कां दिला. दहा हजारांच्या उत्पन्नाचा दुसरा गांव कां दिला नाहीं अथवा दहा हजार रुपयापेक्षां ज्यास्त उत्पन्न होईल तें आम्ही सरकारांत देऊ असा गणेशपंत यांचे वंशजापासून दस्तऐवज कां करून घेतला नाहीं ? सन १८७२ च्या सालांत बार साहेब वारल्यावर मल्हारराव महाराज यानीं हा गांव पुनः जप्त केला. गणेश सदाशिव ह्यांस खंडेराव महाराज यार्णी सनद करून दिली त्यांत अशी अट आहे की, दहा हजार रुपयांपेक्षां उत्पन्न कमी झाले किंवा ज्यास्त झाले तर त्याबद्दल दरबारानी कांही हरकत करूं नये. याबद्दल दरबारचे म्हणणे असे होतें कीं, गणेश सदाशिव यांजकडे दिवाणगिरी होती, यामुळे सनदेत तशी अट लिहिली आहे, परंतु संकेताप्रमाणे दहा हजार रुपये रोख किंवा तितक्या उत्पन्नाचा गांव गणेशपंत यांच्या वंशजास देण्यास आम्ही कबूल आहोत त्यापेक्षां त्यांचा ज्यास्त हक्क लागू पडत नाहीं. अमेरिकेतील लढाईमुळे जेव्हां कापसाच्या भावास तेजी होती तेव्हां या धावट गांवचे उत्पन्न दरसाल पस्तीस पस्तीस हजार झाले होते असे म्हणतात. कसेही असो. दहा हजारापेक्षा फार ज्यास्त उत्पन्नाचा हा गांव आहे यांत कांही संशय नाहीं. या इनाम गांवाविषयीं दरबारानी जो मार्ग स्वीकारिला तो निष्कलंक आहे असे दाखवि - ण्याकरितां त्याणी या फिर्यादीबद्दल जबाब दिला त्यांत दोन प्रमाणे दाखविली आहेत. त्यांत एक प्रत्यक्ष मुख्य दिवाण गोविंद पांडुरंग रोडे यांचे. गणेश सदाशिव यांस धावटगांव इनाम दिला तेव्हांच गोविंदराव रोडे यांसही एक गांव इनाम दिला होता. गोविंदराव याणी आपल्या इनाम गविचें उत्पन्न ठरावी आकड्यापेक्षां ज्यास्त आहे असे पाहून लागलीच तो गांव खंडेराव महाराज यांस आपल्या इच्छेने परत देऊन बरोबर दहा हजार रुपयांच्या उत्पन्नाचा गोरवा गांव इनाम करून घेतला होता, आणि मग गणे- शांत भाऊ यांचे गांवावर जप्ती पाठविली. दुसरे प्रमाण कोहेना गांवाबद्दलचे. हा गांव एका दरकदाराकडेस पालखीच्या नेमणु- कीत रुपये अकराशाकरितां दिला होता, परंतु त्या गांवचे उत्पन्न त्या रकमेपेक्षां ज्यास्त असल्यामुळे गणेशपंत भाऊ याणी आपल्या दिवाणगिरींतच त्या दरकदारापासून पंच- वीस वर्षांचे ज्यास्त उत्पन्न सरकारांत घेतलें होतें. कर्नल फेर यांस दरबारचे म्हणणे मान्य झालें नाहीं, व त्याणीं जीं दोन प्रमाणे दाख- विली त्याजवरही कर्नल फेर पाणी आक्षेप घेतला. • गोविंदराव रोडे यांच्या इनामी गांवांत तात कीं, यावरून तर वंशपरंपरा दिलेली बदल केली याबद्दल कर्नल फेर असें म्हण- इनामे हिसकून घेण्याची गायकवाडीमध्ये एक चाल पडून गेली आहे असें उलटें शाबीत होतें, आणि या अपहाराबद्दल गोविंदराव रोडे यांच्या स्त्रीने दावा केला आहे.