पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. ( २ ) अथवा तुम्ही आपले दागिने परत घ्यावे आणि तुमचे दागिने सरकारांत राहिले त्याचे नुकसानीबद्दल योग्य रक्कम महाराज तुम्हास देतील. ( ३ ) अथवा दरबार जी किंमत ठरवितील ती तुम्ही घ्यावी. ह्या तिन्ही तोडी मला मान्य झाल्या नाहीत, सबब नक्की केलेली किंमत व व्याजाबद्दल रूपये ३९,३३२ मिळण्याबद्दल मी रेसिडेंट साहेब यांजकडेस फिर्याद केली आहे त्याप्र- माणे मला ऐवज देवविला पाहिजे. लग्न झाल्या- याबद्दल दरबारांतून जबाब दिला व महाराजानीं स्वतः कमिशनाचे अध्यक्ष सर रिचर्ड मोड साहेब यांस हकीकत सांगितली त्यांतील तात्पर्य असे आहे कीं, नंतर जेव्हां काळजीपूर्वक तें जवाहीर तपासले तेव्हां असे दिसून आलें कीं, पहिल्याने जी किंमत सांगितली त्यापेक्षां तें फारच कमी किंमतीचें आहे म्हणून त्याची पुनः वाजवी किंमत केली आणि दुसरे जव्हेरी यांच्या जवाहिराविषयी देखील असेच झाले पण त्यांणी किंमत घेतली, परंतु हा फिर्यादी आणि दुसरा अमदाबादचा जव्हेरी याणें ती गोष्ट नाक- बूल केली. दागिने परत देण्यांत मुळींच हरकत घेतली नाहीं. फिर्यादीस उलटे असें सांगितले होते की, तुम्ही आपले जवाहीर घेऊन जावे. कमिशनाचा अभिप्राय असा पडला कीं, मुख्य मुद्याच्या गोष्टी दोन्ही पक्षकारांनी कबूल केल्या आहेत. फिर्यादीस निःसंशय असे वाटले की, आपला सवदा पूर्ण झाला आहे, परंतु दरबारांतून त्यास रुपयाबद्दल हुकूम दिला नव्हता व रोख रुपये दिले नव्हते यामुळे दरबार असें समजत होते की सवदा अपूर्ण आहे. महाराजांचे म्हणणे असे आहे की, मला फसविले आहे. जवाहिराची खरी किंमत देण्यास मी तयार होतो व आहे. फिर्यादीने आपल्या दाव्याचा निकाल न झाल्याबद्दल नाखुषी व्हावे यास योग्य सबब आहे. दोन्ही पक्षकार जर ब्रिटिश सरकारची प्रजा असते तर महाराजांवर दिवाणी कोर्टात फिर्यादी करून फिर्यादी याने आपला पैसा घेतला असता, परंतु देशी राज्यांत जवाहीर खरेदीच्या बाबतीत तक्रार उपस्थित होणे आणि लौकर निकाल न होणे हे स्वाभाविक आहे आणि ही गोष्ट जव्हेरी लोकांस चांगली माहीत आहे. देशी जव्हेरी आपल्या मालाची किंमत अतिशय सांगतात ही गोष्ट मनांत आणिली असतां या वादाचा निकाल करण्याचे काम कमिशन यांस आपल्या अंगावर घेणे वाजवी होणार नाहीं. जाणते आणि निःपक्षपाती पंचांनी त्या दागिन्यांची किंमत करावी हेच वाजवी आहे. यासाठी रेसिडेंट साहेब यांच्या द्वारें तें जवाहीर मोठ्या बंदोबस्ताने मुंबईपाठवावें, आणि तेथें जी किंमत होईल ती फिर्यादीस द्यावी, अगर ती किंमत घेण्यास त्याने नाकबूल केले तर त्याचे दागिने त्यास परत द्यावे आणि त्याच्या दाव्याचा निकाल करण्यास जो विलंब लागला याबद्दल त्यास नुकसानीबद्दल योग्य रक्कम द्यावी.