पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मीटचे कमिशन ( १७५) मल्हारराव महाराज याणी खंडेराव महाराज यांच्या मंडळीवर कसे जुलूम केले, त्यांच्या कशा अप्रतिष्टा केल्या व त्यांच्या मिळकतीचा कसा अपहार केला, हे आम्ही पूर्वी सांगितले आहे सबब त्याबद्दल येयें पुनः निरूपण करण्याचे कांहीं कारण नाहीं. (भाग २ पहा.) वंशपरंपरेची इनामें जप्त केल्याबद्दल. शेवटचे प्रकरण इनामे व वंशपरंपरेचे हक्क जप्त केल्याबद्दल कांहीं लोकांनीं कमिशनापुढे. फिर्यादी केल्या त्याबद्दल होते. कमिशनानीं त्याबद्दल असा अभिप्राय दिला की, सन- देतील शब्दार्याप्रमाणे तो इनामें जप्त करण्यास मल्हारराव महाराजांस अधिकार नाहीं. कमिशनानी एकंदर फिर्यादीचे तीन भाग केले होते. त्यांत पहिला भाग ब्रिटिश सर- कारच्या रयतेवर गायकवाडाकडून जुलूम झाल्याबद्दल व इंग्रज सरकाराबरोबर केलेले कौलकरार न पाळल्याबद्दल कर्नल फेर याणी गाऱ्हाणे केलें होतें त्याबद्दल, दुसरा भाग गायकवाड सरकारच्या रयतेच्या फिर्यादींबद्दल, आणि तिसरा भाग इंग्रज सरकारची आम्ही प्रजा आहोत अशा हक्काने कांही लोकांनी गायकवाड सरकारावर दावे केले होते त्याबद्दल. पहिल्या दोन भागाबद्दलची हकीकत वर सांगितली आहे. आतां तिसऱ्या भागांत ज्या फिर्यादींचा समावेश केला त्यांचे स्वरूप काय आणि कमिशनानीं त्याविषयीं आपलें काय मत दिलें तें पुढील हकीकतीवरून कळून येईल. अमदाबादचे जव्हारी याणीं कमिशनापुढे आपण महाराजांस जवाहीर विकले त्याची किंमत मिळाली नाहीं त्याबद्दल दावे केले. त्यांत एकाचे म्हणणे असे होतें कीं, मी महाराजांस रुपये २,७१,७९० दोन लक्ष एकाहत्तर हजार सातशे नव्वद रुपयांस जवाहीर खरेदी दिले. ही रक्कम माझे नांवें जमा केली आणि कांहीं दिवसांनंतर महाराजानी मला रुपये देण्याबद्दल दुकानावर आपल्या सहीचा हुकूम दिला. मी रुपये घ्यावयास गेलो तेव्हां वसंतरामभाऊ याने मला सांगितले की, भरपूर किंमत तुम्हास मिळणार नाहीं तेव्हां मी सांगितलें कीं, मी भरपूर किंमत घेईन अगर माझे दागिने परत द्यावे तेव्हां मला असा जबाब मिळाला कीं, दागिने राणी साहेब याणी आंगावर घातले, सबब परत मिळावयाचे नाहीत. नंतर मी असें ऐकलें कीं, वसंतरामभाऊ याणे महाराजांच्या हुकुमाप्रमाणे रुपये घेऊन एका दुकानांत व्याजी ठेविले आहेत. महाराजांवर त्याबद्दल मी फिर्यादी केल्यावरून त्याणी मला दिवाणाकडेस जाण्याविषयी सांगितले त्याप्रमाणे दिवाण यांजकडेस गेल्यावर त्याणी मला तीन तोडी सांगि- तल्या त्या. (१) अमदाबादचे दोन जव्हेरी आणि बडोद्याचे दोन जव्हेरी याणी दागिन्याची पुन: किंमत करावी आणि ते जी किंमत ठरवितील ती तुम्ही घ्यावी.. त्या रकमेचे पहिल्या बारा महिन्यांचे व्याज मात्र तुम्हास मिळेल.