पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १७४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. झाला म्हणजे काय ती त्याची वासना मात्र अवशिष्ट राहते, आणि मग त्यास स्त्रियांचे समुदाय जमवून नानाप्रकारच्या अवाच्य अशा चेष्टा कराव्याशा वाटतात. त्याप्रमाणे मल्हारराव महाराज यांची स्थिति झाली असेल तर कोण जाणे. शेवटचा बाजीराव पेशवा याणें तरी उत्तरावस्थेत अशाच कांहीं चेष्टा केल्या होत्या असे म्हणतात. मल्हारराव महाराज यानीं आपल्या बसण्याच्या बंगल्यांत ( जेथें रावजी आणि नरसू यांजबरोबर विषप्रयोग करण्याची मसलत केली असे म्हणतात ) सर्व बाजूस ज्या इतक्या बीभत्स होत्या की, त्या बंगल्यांत जाणे सभ्य असे म्हणतात की, शेवटच्या कमिशनचे अधिकारी ती जागा पाहण्यास गेले तेव्हां तो सगळा थाट मुद्दाम तसाच ठेविला होता. तसबिरा लाविल्या होत्या त्या मनुष्यास मरणप्राय वाटत असे. खंडेराव महाराज यांच्या अप्तांवर व मंडळीवर जुलूम मह PR 10TRATE केल्याबद्दल फिर्यादी. खंडेराव महाराज यांच्या आप्तवर्गीस, त्यांच्या कृपेतील मंडळीस आणि नौकर लोकांस मल्हारराव महाराज याणी अन्यायाने वागविल्याबद्दल कमिशनापुढे चौकशी झाली. खंडेराव महाराज यांची. कन्या सौ० मंजुळाबाई साहेब, राणी साहेब जमनाबाई, यांचे बंधु आनंदराव माने, आणि खंडेराव महाराज यांचे खर्ची पुत्र अमृतराव गायकवाड हे मल्हारराव महाराजांवरचे फिर्यादी होते. कर्नल फेर याण खुद्द राणी साहेब जमनाबाई यांची देखील फिर्यादी कमिशनापुढे आणिली होती, परंतु त्याजबद्दल मुंबई सरकारचे कौन्सिलांत विचार चालू होता सबब कमिशनानीं त्याबद्दल चौकशी केली नाहीं. खंडेराव महाराज आणि मल्हारराव महाराज हे एकमेकांचे कट्टे दुष्मन होते. परस्परांनी परस्परांच्या आप्तवर्गांस आणि अनुयायी लोकांस जसा ज्याचा हात चालला तसें त्याणी छळले होते याबद्दल मल्हारराव महाराज यांजकडेसच दोष लागू होतो असे नाहीं, परंतु मल्हारराव महाराज यांचा जुलूम फार उग्र होता यांत संशय नाहीं. मल्हारराव महाराज अधिकारावर आले नाहीत तोच त्याणी मकरपुरा येथील ज्या बंगल्यांत खंडेराव महाराज नेहेमी बसत असत तो तात्काळ पाडून टाकविला, आणि एक मोठा बंगला खेरीज करून त्याच्या बाजूच्या लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या मोठ- मोठाल्या टोलेजंग इमारती अगदी जमीनदोस्त करून टाकविल्या. गणपतराव महाराज व खंडेराव महाराज यांच्या नांवाचे शिक्क्याचे हजारों रुपये नुकसान सोसून गाळून टाकविले. ज्यांच्या नांवाचा संस्कार जड पदार्थांस झाला होता त्यांस देखील मल्हारराव महाराज शासन करण्यास चुकले नाहींत मग ज्या सजीव प्राण्यांचा आप्तपणाचे संबंधाने व मित्रत्वाच्या व चाकरीच्या नात्याने खंडेराव महाराजांशी संबंध होता त्यांस त्यानी निर्दय- पणाने वागविले असेल यांत ते नवल कसचे ! !