पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचें कमिशन (१७३) - कमिशनानी याबद्दल अभिप्राय दिला त्यांतील आशय असा आहे की, आमच्या- पुढे जे मुकदमे आले त्यांतील कितीएक मुकदम्यांत दरबारच्या हलक्या कामदारांकडून व चाकरांकडून स्त्रियांवर जुलूम झाला होता, व महाराजानी आपल्या सत्तेचा उपयोग गैरशिस्त रीतीने केला असें आम्हास खात्रीपूर्वक वाटते. हे कृत्य करून महाराजानी आपल्यास व आपल्या राष्ट्रास मोठा कलंक लावून घेतला आहे. कमिशन आणखी शेव- टी असेही म्हणतात कीं, आमच्यापुढे जो पुरावा झाला त्याजवरून व नंबर २ व ५ ह्या खटल्यांच्या संबंधानें रेसिडेंटाने जी लेखी माहिती सादर केली आहे. तिजवरून उघड होतें कीं, महाराजांचे राणी साहेबांचे व उपस्त्रियेचें दास्यत्व करण्याकरितां ह्या बायकांस धरून नेऊन वाड्यांत त्यांचे इच्छेविरुद्ध आडकवून ठेविल्या होत्या; परंतु ह्या सर्व पुराव्यांत किंवा रेसिडेंटाने दिलेल्या लेखी माहितीत ह्या बायकांस वाड्यांत वाईट कामाकरतां नेल्या होत्या किंवा त्यांपैकी कोणावरही तशा प्रकारचा जुलूम करण्यांत आला होता असे दिसत नाहीं. * मल्हारराव महाराज यानीं या नीच वर्तनापासून गायकवाडाच्या कुळांस जो डाग लावून घेतला त्याबद्दल कमिशनानी यापेक्षां ज्यास्त म्हणावे तरी काय ? महाराजांची अनेक अनन्वित कर्मे होती त्यांतील लोकांच्या स्त्रिया राजवाड्यांत आणून त्यांजबरोबर यथेष्टाचार करणे या कृत्यासारखें लाजिरवाणे कृत्य कोणतेंही नव्हतें. या कर्मांत महाराजांचा सोबती तो प्रसिद्ध दामोदरपंत नेन्या प्रमुख होता. त्याने रोसडेन्सी- च्या एका कारकुनाची बहीण पळवून नेली होती याबद्दल त्याजवर शाबिती झाली असत मल्हारराव महाराज याणी त्याचे कांहीं देखील पारपत्य केलें नव्हतें. कर्नल फेर साहेब यांचे मल्हारराव महाराज यांच्या संबंधाचें वर्तन कितीही सदोष असो, स्त्रिया संबंधी मल्हारराव महाराज यांच्या वर्तनाकडेस त्यानी कांहींसें अलक्ष केले असते तर बडोद्यांतील आणखी कांहीं गरीब लोकांच्या बायकांवर जुलूम झाला असता, आणि त्यापासून काय परिणाम झाला असता तो सांगतां येत नाहीं. आम्ही मार्गे लिहिलें आहे की, मल्हारराव महाराज फार विषयी होते आणि असे पुष्कळ ऐकिण्यांत आहे कीं, विषयलंपट पुरुष विषयसेवने करून एकदां बळहीन

  • On a full consideration cf all that has thus come before it, the Commission can only form the opinion that several cases of the description stated have undoubtedly occurred, involoing an abuse of power on the part of the Maharaja, and oppression by certain inferior Darbar officials and servants, which have brought a most serious scandal on the personal character of the Chief himself, and the administration of which he is the head.

It is proper to add that the evidence of the complainants who have come before the Commission, and the statements furnished by the Resident in reference to cases No. 2 and 5, refer solely to the unjust seizure and detention of these person's to ren- der forced service in the Palace, as attendants on the Ranee and the Chiefs mistress, but make no allusion to the object of such seizure having been for immoral purposes, or even that any of them were subjected to treatment of the latter character: (Baroda Blue Book No. I. Page 141. ). ह्या दोन पारेग्राफांचा विचार केला ह्मणजे आमच्या लोकांनी व विशेषतः बायकांनी दिले- ल्या साक्षीचें खरें स्वरुप युरोपियन लोकांस मुळींच समजत नाहीं असें ह्मणर्णे भाग पडतें.