पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. खंडेशव महाराज यांस मारण्याचा इरादा होता. खंडेराव महाराज यांच्या अभावी मल्हारराव महाराज यांस गादी मिळावयाची होती; तेव्हां त्या बंडांत मल्हारराव महाराज यांचे कांही अंग असावे अशी कल्पना निघाली होती, परंतु त्याबद्दल मल्हारराव महाराज यांस त्या- वेळेस कांहीं उपद्रव झाला नाही. ते कांहींसे मनाने विकल आहेत, यामुळे त्यांच्या कृत्या- ची जबाबदारी त्यांजवर ठेवितां येत नाही, असा त्या अपवादाचा त्या वेळेस निकाल झाला. या उभयतां बंधूंच्या वैमनस्यास कारण काय ती मल्हारराव महाराज यांची स्त्री भागूबाई होती असे ह्मणतात. ती मोठी मानी, हट्टी व महत्वाकांक्षी बायको होती, आणि मल्हारराव महाराज तिच्या धोरणाने वागत असत, यामुळे उभयतां बंधूंचे वैमनस्य दिवसानुदिवस ज्यास्त वाढू लागले. मल्हारराव महाराज यांस एक मुलगी कमाबाई साहेब शिर्के, आणि एक मुलगा व्यंकटराव बाबासाहेब अशी दोन अपत्ये झाली होती. त्यांपैकी बाबा साहेब मल्हा- रराव महाराज यांस पादरा येथे पाठविले, त्या पूर्वीच गत झाले होते. त्या प्रसंगी खंडेराव महाराज यानीं विशेष अममत्व दाखविल्यावरून या दोघां बंधूंमध्ये अतिशय वैरे वाढले आहे, असे लोकांच्या दृष्टीस आले. एक वेळां मल्हारराव महाराज यांस विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाला होता. महाराजां- चे अन्नांत विष मिश्र केले होते, आणि त्यापासून त्यांस विकृतीही झाली होती. वाघोजी लळितवाला यानें मल्हारराव महाराज यांच्या स्वैपाक्यास फितवून विष प्रयोग करविला होता असे मानण्यास बराच पुरावाही मिळाला होता. बाघोजी व तो स्वयपाक्या यांस तुरुंगांत टाकिलें होतें, पण पुढे काही दिवसांनी त्यांस सोडून दिले. मल्हारराव महाराज राजे असते तर त्यांस खंडेराव महाराजांचे त्यांत आंग होते असे स्वरूप अयासाने सिद्ध करतां आले असतें. सन १८६३ मध्ये मल्हारराव महाराज यांजवर खंडेराव महाराज यांस मारून टाकण्याची म सलत केल्याचा आरोप आला. गंगाधरशास्त्री यांचा नातु कृष्णराव भिमाशंकर ऊर्फ तात्याशा- स्त्री या मसलतीत होता. कापांतील एका पलटणीच्या आफिसरा बरोबर याच कृत्यासाठी त्याने मुद्दाम स्नेह केला होता, आणि खंडेराव महाराज यांस त्याजकडून गोळी घालून मारवावे असा त्याचा बेत होता, असे निदर्शनास आले होतें. तात्या शास्त्री याने ती गोष्ट त्या युरोपियन आ- फिसरापाशी काढिली, आणि त्याने ती गोष्ट रोसडेंट कर्नल वालेस साहेब यांस कळविली. बालेस साहेब यानी अशी मसलत केली कीं, तात्या शास्त्री याची त्या आफिसराने पुनः गांठ घेऊन, त्याजकडून पुनः ते शब्द वदवावेत; त्याप्रमाणे त्याने एके दिवशी रात्री केले, आणि तें सर्व भाषण दोन युरोपियन कामदार छपवून बसविले होते त्यांस साद्यंत ऐकविले. तात्याशास्त्री यांस दुसरे दिवशी दरबारांत कैद करून आणिल्यावर त्याने पूर्व दिवशींची सर्व हकीगत कबूल केली. हाच काय तो मल्हारराव महाराज यांजवर पुरावा होता. तात्याशास्त्री यानें विष्णुपंत नेने, भगवानदास बोवा आणि मुकुंदराव मामा यांस या कटाची माहिती होती असे सांगितले होते, परंतु या तिघांवर पराकाष्ठेचा जुलूम झाला असतांही त्यांनी ती गोष्ट कबूल केली नाही. अगोदरच उभयतां बंधूंमध्यें वैमनस्य पडले होतेंच, आणि त्यांत हे कारस्थान उघड- कीस आले तेव्हां खंडेराव महाराज पराकाष्ठेचे रागावले. त्यानी मल्हारराव महाराज