पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १७२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. सावकार लोकांच्या फिर्यादीवरून कमिशन याणी सर्व साधारण असा अभिप्राय दिला की, ज्या धनवान लोकांवर व पेढीवाल्पांवर महाराजांची अथवा त्यांच्या दर- बारांतील मुख्य अधिकारी लोकांची मेहेरबानी नाहीं त्या लोकांची मालमिळकत व ते स्वतः सुरक्षित राहतील असा भरंवसा ठेविणे संशयीत झाले आहे. सहावें प्रकरण फटके मारितांना एक मनुष्य मेल्याबद्दल. फटके मारितांना एक मनुष्य मेल्याबद्दलच्या मुकदम्याचे स्वरूप कसे होते हे मागे तपशिलवार सांगितले आहे. कमिशनानी या मुकदम्याचा विचार फार गंभीरपणाने केला. ते असे म्हणतात की, आरोपी लोकांनी विषप्रयोग केला नसतां त्यांजवर उगीच खोटा आळ आणिला असे म्हणण्यास आधार नाहीं, परंतु शांतपणाने चौकशी न करतां आरोप्यांपैकीं एक मनुष्य अशक्त असतांही त्यास इतका निर्दयपणानें मार दिला कीं, तो तात्काळ मेला, हें क्रुराचरण होय. ( भाग ११ पान ७३ पासून पहा.) सातवें प्रकरण लोकांच्या बायकांवर जुलूम केल्याबद्दल. सभ्य गृहस्थांच्या विवाहित स्त्रिया व अविवाहित मुली जबरदस्तीने राजवाडयांत धरून नेल्याबद्दल कमिशनापुढे चौकशी झाली. त्याबद्दल दरबाराकडून असा जाब दिला होता की, चाकर राहण्यास ज्या स्त्रिया राजी असतील त्यांस मात्र वाड्यांत घेऊन याव्या, कोणावर जबरदस्ती करूं नये असा गणू हालकारा यास हुकूम दिला होता, व त्याने वाड्यांत आणिलेल्या स्त्रियांपैकी ज्या चाकरी करण्यास खुषी नव्हत्या त्यांस तात्काळ परत वाटेस लाविल्या. दरबारच्या या जबाबावरूनच फक्त चाकरीकरतां बायकांची गरज होती किंवा त्यांत दुसरे काही काळे बेरें होते हैं स्पष्ट समजते. गणू हालकारा यास ज्या स्त्रिया चाक- री करण्यास राजी होत्या त्यांसच आणण्याविषयीं हुकूम दिला होता, तर ज्या राजी नव्हत्या त्या त्याने वाड्यांत कां आणिल्या? आणि यावरून त्या स्त्रियांवर त्याने जुलूम केला असे होत नाहीं काय ? गायकवाडांच्या जनानखान्यांत इतके दिवस स्त्रियांच्या चाकरीची गरज नव्हती काय ? सयाजीराव महाराज यांस दोन स्त्रिया आणि चार उपस्त्रिया होत्या, व सुना लेकी पुष्कळ होत्या. त्याचप्रमाणे गणपतराव महाराज यांस पुष्कळ स्त्रिया व उपस्त्रिया होत्या. खंडेराव महाराज यांस एक स्त्री आणि चार उपस्त्रिया होत्या. त्या वेळेस जनानखान्यांत चाकरीकरितां बायांचा तोटा पडला नाहीं, आणि मल्हारराव महाराज यांच्याच वेळेस कसा दुष्काळ पडला ते समजत नाहीं. सयाजीराव महाराज यांच्या वेळेस ज्या राजवाड्यांत बायकांस जागा पुरत नव्हती इतकें जनानखाने होते. तो राजवाडा मल्हारराव महाराज यांच्या वेळेस अगदी शून्य झाला होता. महाराज यांची स्त्री ह्माळसाबाई साहेब व गंधर्व विवाहाची स्त्री लक्ष्मीबाई साहेब ह्या काय त्या दोन बायका होत्या. त्यांच्या चाकरीसाठीं त्या अशा किती बायका पाहिजे होत्या.