पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मीट कमिशन. (१७१) रुपये नजराणा घेतला होता तो कांही त्यांच्या खाजगी मिळकतीचा त्याणी उपभोग घ्यावा म्हणून घेतला नव्हता. सरकारांतून त्यास जीं इनामे व नेमणुका करून दिल्या होत्या त्या चालविण्याबद्दल घेतला होता हें कां त्या कामदारांस समजत नव्हते, परंतु बिचारे करितात काय. सर्व प्राणी पोटाचे गुलाम आहेत तसे तेही होते. बडोद्याच्या राज्यांत मराठ्यास दिवाणगिरी करण्याची चट लागल्यापासून दरबारां- तील कामदार मंडळीच्या शहाणपणाचा उपयोग नाहींसा झाला होताच. नाना साहेब खानवेलकर दिवाण झाल्यावर त्या लोभी पुरुषाने किती अपयशस्कर कृत्ये केली तें - लोकप्रसिद्ध आहेच. दरबारच्या कामदारांत जे कोणी विचारी व शहाणे होते त्यांणी मल्हारराव महाराज यांच्या अनन्वित कृत्याला न्यायीपणा आणण्याकरितां आपलें चातुर्य खर्च करून आपणास त्याच मालिकेत गोंवून घेतलें. मोतीलाल सामळ पाजबद्दल सर रिचर्ड मोड साहेब याणी खाजगी रीतीनें देखील दरबारच्या कामदारांस सूचना केली होती की, मोतीलालचे महाराज समाधान करतील तर फार चांगले होईल. यावरून कर्नल फेर याणी मोतीलालविषयीं मीड साहेब यांस देखील शिफारस केली होती असें दिसतें. दरबारच्या कामदारांनी याबद्दलचे उत्तरही पूर्वी दिले होतें तसेच देऊन आपल्या योग्यतेस काळिमा लावून घेतली. मोती- लाल याजवर महाराजानीं अन्यायाचा जुलूम केला आहे खरा, आणि आपण म्हणतां त्याप्रमाणें महाराजानीं त्यांचे समाधान करावें हें वाजवी आहे, असे स्पष्टपणें कामदारांनी सर रिचर्ड मोड साहेब यांस सांगितले पाहिजे होते असे आमचें ह्मणणे नाहीं; कारण ती गोष्ट महाराजांस समजली असतां त्या कामदारांवर महाराज पराकाष्ठेचे खप्पा झाले असते. परंतु मोतीलालच्या संबंधाने महाराजांचे वर्तन न्यायाचे आहे, आणि आपण म्हणतां त्याप्रमाणे समाधान करण्यास मार्ग नाहीं, अशा झोंकाचे कामदार यांणी मीड साहेब यांस उत्तर द्यावयाचे नव्हतें. आपल्या मर्जीप्रमाणे करण्याविषयीं महारा- जांस विनयपूर्वक विनंती करून त्यापासून जो परिणाम निष्पन्न होईल तो आपल्यास निवे- दन करूं असें मीड साहेब यांस सांगून मोतीलाल यांजवर झालेला जुलूम आपल्यास अभिमत नाहीं असें गर्भित अर्याच्या भाषणाने स्पष्ट करावयाचें होतें, आणि महाराजास त्याबद्दल पराकाष्ठेचा आग्रह धरून विनंती करावयाची होती तें त्यांणी केलें नाहीं हा त्यांजकडे मोठा दोष लागू झाला आहे. • सर रिचर्ड मोड साहेब यांच्या सूचनेप्रमाणे महाराजानों मोतीलालभाई यांच्या मुलास. इनामी गांवें, पागा व नेमणुका परत देऊन कमिशनचे मेंबर बडोद्यास असतांनाच त्या मुलास मोठें दरबार भरवून पोषाख दिला असता आणि सन्मानाने त्यास त्याच्या वाड्यांत पोहोचविला असता तर मल्हारराव महाराज यांस हे कृत्य किती बरें यशस्कर झालें असतें ? परंतु त्या भाग्यहीन राजास कीर्तीची आणि अब्रूची मुळींच चाड नव्हती. ज्या सावकार लोकांस दंडवत घालितांना त्यांच्या वडिलांच्या कपाळास घट्टे पडले होते त्या सावकारांच्या वंशजांस त्यानीं भिकेस लाविल्यामुळे त्यांज- विषय लोकांची राजभक्ती उणी झाली होती यांत कांही संशय नाही.