पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १७०) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. मोतीलालभाई यास रेसिडेंट साहेब यानी आपल्या बंगल्याच्या बाजूसच एक जागा राहण्यासाठीं दिली होती असे लोक म्हणत होते. कमिशनच्या कामास आरंभ होण्या पूर्वी त्यांची प्रकृत बिघडल्यामुळे ते अमदाबादेस गेले आणि तेथे थोडक्याच दिव- सानी मृत्यु पावले.. कमिशनापुढे त्यांच्या मुलाच्या नांवे एजंटाने फिर्यादी केली त्यांत दावे केले होते ते. १. बडोद्यातील त्यांची जिनगी महाराजानी जप्त केल्याबद्दल. १२. दुकानचे घेण्याबद्दल अदालतीत फिर्यादी केल्या होत्या त्याबद्दल कमिशनाचे रुपये वीस हजार दरबार मागतात, परंतु कमिशन देण्याचा शिरस्ता नाहीं. ३. इनामी गांवें व पागा जप्त केली आणि रोख नेमणूक बंद केली त्याबद्दल. _बद्दल दरबाराकडून जबाब देण्यांत आले त्यांत पहिल्या कलमाबद्दल असें सांगण्य आले की, मोतीलालभाई यानी आपल्या जिनगीचा कांही बंदोबस्त न करितां अमदाबा- देस निघून गेले सबब ती जाबत्यांत ठेविली आहे. कमिशनाचे रुपये माफ करण्याचा शिरस्ता नाहीं आणि शेवटचे कलमाबद्दल दरबारचे लाजिरवाणे उत्तर हें होतें कीं, आतां दरबारास पारख मशारनिल्हे यांचे कांहीं देणे राहिले नाहीं सबब त्यांची नेमणूक व इनामी गांवे चालविण्याचे कांहीं प्रयोजन राहिले नाहीं. कमिशनानीं याबद्दल काय अभिप्राय दिला तो येथे सांगण्याचे प्रयोजन नाहीं. फिर्या- दीच्या दाव्यांबद्दल दरबारानी जाब दिले त्यावरून न्यायान्याय काय झाला तो सर्वांस अकलेनें कळण्या सारखा आहे. मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीत प्रजेचे जीवित, अब्रू आणि मालमत्ता संरक्षण करण्याविषयीं महाराज आणि त्यांचा दिवाण किती दक्ष होते याचा डंका जगभर वाजला आहे, तेव्हां मोतीलालभाई यांची मिळकत अफरातफर होऊं नये म्हणून दरबारानी आपल्या जाबत्यांत ठेविली असेल यांत संशय तो कसचा !! मालकाने आपली मिळकत खूप बंदोबस्ताने ठेविली तर चोर ती घेण्याचा कांही तरी प्रयत्न करितात काय ? पण मालकाने जर अव्यवस्थितपणे टाकली तर त्या बिचाऱ्या चोरास मग कोणास न सांप- डेल अशी आपल्या जाबत्यांत ठेवावी लागते ! ! पारख हरीभक्ती आणि सामळ बेचर यांच्या वारसांनी इनामे व नेमणुका याजबद्दल गायकवाडानी वंशपरंपरेच्या करून दिलेल्या सनदा कमिशनापुढे रुजू केल्या, त्या दरबा रच्या कामदारांनी खऱ्या आहेत असे कबूल केलें. सही शिक्याचे खरे दस्ताऐवज नाकबूल करून चालतें कसें, पण सनदा अन्वयें चालत आलेली इनामें आणि नेमणुका बंद करण्याचे अयोग्य कारण कमिशनापुढे सांगतांना दरबारच्या कामदारांस किती लाजि - वाणे वाटले असेल तें त्यांसच माहीत.' वंशपरंपरा चालविण्याच्या शर्तीनें जीं इनामे व नेमणुका करून दिल्या होत्या त्यांशी त्या सावकारांचे गायकवाडास कर्ज असणें अथवा नसणे याचा काय संबंध हें कां त्या कामदारांस कळत नव्हते. ज्याच्या दत्तविधानाला अनुमती देतांना दरबारानीं पांच लक्ष