पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मौडचें कमिशन ( १६९ ) राष्ट्राचा अभिमानी आणि राजाचा परम मित्र नसेल तर त्या राज्याचा काय परिणाम होईल हे मल्हारराव महाराज यांच्या राज्याच्या परिणामांवरून स्पष्ट झालेच आहे. कमिशनानी मगनलालभाई यांच्या पहिल्या व दुसऱ्या दाव्यांबद्दल आपला कांहींच अभिप्राय दिला नाहीं; कारण कीं ते दावे गुंतागुंतीचे होते आणि खंडेराव महाराज यांच्या कारकीर्दीशी त्या दाव्याचा संबंध होता. बाकीच्या दाव्यांबद्दल कमिशनानीं मल्हारराव महाराजांस दोष लाविला आहे. या पेढीच्या संबंधाने महाराजास जे दोष आपण देत आहोत तेच कमिशनानी दिले आहेत सबब त्यांच्या अभिप्रायांतील भावार्य • न लिहितां अभिप्राय मात्र टिपेंत लिहिला आहे. * फिर्यादीच्या दाव्यांबद्दल दरबारांतून जबाब देण्यांत जे चातुर्य खर्च केलें आहे त्यावरूनच मल्हारराव महाराज यानी या पेढीच्या संबंधानें अगदी अयोग्य वर्तन केले होते असे अगदी स्पष्ट होतें. मला असे वाटत नाही, की मल्हारराव महाराज यांचे हे कृत्य न्यायी आहे असे प्रतिपादन करून दाखविणारा कोणी शाहणा बारिस्टर या जगावर जन्मला असेल किंवा जन्मेल. पेढीचे मालक लहान म्हणून दरबारानों दुकानची वहिवाट चालविण्याकरितां मनुष्य नेमावयाचा, त्यास दूर करण्याची परवानगी देण्याबद्दल पंचाहत्तर हजार रुपये नजराणा घ्यावयाचा आणि पुनः त्याच मनुष्यास चाकरीस ठेविर्णे पेढीच्या मालकास भाग पाडावयाचें आणि जबाब देतांना त्या मनुष्यावाचून पेढीचें काम चालेना सबब पेढीवाल्यानीं आपण होऊन त्यास चाकरीस ठेविलें म्हणून सांगाव - याचे !! ही आपल्या राज्यांतील अल्पवयस्क सावकाराच्या मिळकतीचें संरक्षण करण्याची मल्हारराव महाराज यांची रीत. वंशपरंपरा करून दिलेल्या नेमणुका व गांवे बंद केल्याचे कारण हें कीं, आतां त्या सावकाराचें आम्हास कांहीं देणें राहिलें नाहीं सबब इनामी गांवे व नेमणुका चालविण्याचे प्रयोजन राहिले नाही. कमिशनानी लिहिल्याप्रमाणे हें महाराजांचे कृत्य त्यांस किती अपयशस्कर आणि लुटारूपणाचे होते हैं आपणास सांगतां देखील येत नाहीं. कामेशनापुढे दुसरा मोकद्दमा सामळवेचरच्या पेढीचे मालक मोतीलाल सामळदास यांचा होता. या मनुष्याविषयीं कर्नल फेर यानी मोठा पक्ष स्वीकारला होता आणि त्याच्या दाव्याचा निकाल महाराजानी उदार मनाने करावा अशी त्यांची फार इच्छा होती, परंतु महाराजांस ती गोष्ट कबूल झाली नाहीं.

  • The Commission is of opinion that, considering that the complainant in this case was a minor and a ward of the Durbar which had made its own selection of, a manager for the firm, and was therefore in a way responsible for the proper conduct of its business and of its interests, the proceedings thus admitted by the Durbar it- self toward an old banking firm of such respectability, and which seems to have pos- sessed many claims to the good offices and support of the State can not but be regarded as discreditable and indeed spoliatory. (Baroda Blue Book No. I. Page 135.)

२२.