पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

· ( १६८ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. लक्ष रुपये नजराणा दिला आहे आणि असे बोलण्यांत आले की, एक बडोद्याचा मोठा सावकार थोडक्याच दिवसांत पांच लक्ष रुपयांपेक्षां कमी नाहीं, इतकी रक्कम महाराजांस नजराणा देऊन दत्तक घेण्याच्या विचारांत आहे. ‘दत्तक घेतांना राजाच्या मंजुरीचे प्रयोजन तें काय ' आणि ' नजराण्याचे निमित्त करून खंडेराव महाराज याण हरिभक्तीच्या दुकानांतून पांच लक्ष रुपयांचा बलात्कारपूर्वक अपहार केला ' या म्हणण्यांत कर्नल फेर यांची किती गैर समजूत झाली होती हें सदरील • लार्ड साहेब यांच्या मिनिटावरून स्पष्ट होते. ज्या राजाच्या दरबारांत कर्नल फेर सारखा रेसिडेंट असेल त्या राजाने रेसिडेंट यांस सला विचारावी काय आणि त्याच्या सलेप्रमाणे चालावे कसे? अशाच प्रकारच्या एकाद्या कामांत कर्नल फेर यांची सला घेण्याचा मल्हा- रराव महाराज यांस प्रसंग आला असता तर त्याणी त्यांस हेंच सांगितलें असतें कीं, दत्तक घेणे हा हिंदु शास्त्राप्रमाणे एक हक्क आहे त्यांत तुमची मंजुरी ती कशास पाहिजे आणि नजराणा मागतां कसचा ? राजाने आपला हक्क आहे असा दावा सांगितला असता की, लागलीच रेसिडेंट आणि राजा यांजमध्ये एक कलह सुरू झाला असता. 'दुसऱ्याचा मोहोरी येव्हढा दोष मेरू येव्हढा करून दाखवावयाचा आणि आपल्या दोषाकडेस आपण कांहींच लक्ष द्यावयाचे नाहीं हा केव्हढा अविचार ! दरबारानी कळविलेल्या हकीगतीच्या खरेपणाविषय संशय घेऊन त्यावर कडक शब्दाने टीका करावयाची आणि फिर्यादी जे निवेदन करीत नाहीं तें आपण निवेदन करून नसते आळ दरबारावर घ्यावयाचे. मगनलालभाईच्या फिर्यादीत जो मजकूर नाहीं तो कर्नल फेर यानी आपल्या पदरचा सांगितला असे आमचे म्हणणे नाहीं; त्यास कोणी तरी तसे सांगितले असेल. पण जी गोष्ट फिर्यादी सांगत नाहीं ती दुसऱ्याच्या सांगण्या वरून आपण कशी खरी मानावी हा विचार तर कर्नल फेर यानी करावयाचा किंवा नाहीं ? किंवा जे कोणी आपणास सांगेल ते खरे मानून त्याजबद्दल वादविवाद घालीत बसा. वयाचे? रेसिडेंटाचा हुद्दा किती महत्वाचा आहे हे विस्ताराने सांगण्याचे प्रयोजन नाहीं. ज्याच्या अभिप्रायावरून देशी राजांच्या राज्यांत एक विलक्षण प्रकारची घडामोड व्हावयाची तो रेसिडेंट शांत, विचारी, न्यायी, निःपक्षपाती, देशी राजांच्या रीतीभातींत वाकब, I should also like to know why was the adoption guaranteed without the usu- al Nuzzerana. Volumes have gone home to the honorable Court on this very sub- ject, and the principle on which, as a financial measure, it had been advocated, is the large revenue which we shall derive from Nazzerana on succession; why therefore are we to deprive the Gaekwar of the same profit, which we in similar cases propose to secure to ourselves? had the late Vithalrao enjoyed the utmost favour of his sovereign and had he asked His Highness' permission to adopt a son, he must have purchased it by a Nazzerana of 3 or 4 lacs of Rs. When I was at Baroda I saw the adopted son of one of the Gackwar's hereditary ministers in attendance, and I was informed that two lacs of Rs. had had been paid to His Highness to sanction his adoption, and it is said that a wealthy banker at Baroda is shortly about to purchase the same favour by a Nazzerana to His Highness of no less a sum than five lacs of Rupees. (The Gaekwar and his relations with the British Government by Colonel Wallace Page 151 )