पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १६६ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- कमिशनानं देखील वीस लक्ष रुपयांच्या चिट्टीबद्दल आणि दत्तक मंजूर करण्याबद्दल जो नजराणा घेतला त्याबद्दल कांहींएक अभिप्राय दिला नाहीं. परंतु कर्नल फेर यांस हीं प्रकरणे कांहीं मोठी गुंतागुंतीची आहेत असे वाटलें नाहीं. यावरून 'वीस लक्ष रुपयांच्या चिट्टीबद्दल ते असे म्हणाले की, या चिट्टीच्या आधाराने खंडे- राव महाराज याणी हरिभक्तीच्या दुकानांतून सहा लक्ष रुपये लुटून आणिले, आणि . मल्हारराव महाराज याणी ती चिट्टी परत दिल्याबद्दल मोठा उपकार केला असे दाखवून पांच लक्ष रुपयांचें जवाहीर लुटून आणिलें. खंडेराव महाराज याणी वीस लक्ष रुपयांची चिट्टी लिहून घेतल्यानंतर दरबारचे रुपये देणें नवते असा पुरावा सांपडला असे हरिभक्तीवाले याणी जाहीर केलें, परंतु तो पुरावा कोणता हें कांहीं त्याणी दाखविलें नाहीं. खंडेराव महाराज याणी हरीभक्तीपासून ज्या रुपयांबद्दलची चिठ्ठी लिहून घेतली तो ऐवज दुकानवाल्यांस देणे होता यांत कांहीं संशय राहत नाहीं. आतां पुष्कळ वर्षांवरच्या घेण्याबद्दल हरीभक्तीवाल्यांस चिठ्ठी लिहून देणे भाग पाडले याबद्दल खंडेराव महाराजांस कांहीं दोष देतां येईल, परंतु त्याणी हरीभक्तीच्या दुकानास लुटले असा अप्रयोजक शब्द प्रयोग करण्यासारखा कांहीं खंडेराव महाराज यानी अन्याय केला नव्हता. पण कर्नल फेरे यानी रेसिडेंटीचा चार्च घेतला तेव्हांच गायकवाडाच्या विरुद्ध ल्याहावयाचें अशी जर त्यांस प्रतिज्ञा करणे भाग पडलें असेल तर त्यांत त्यांचा दोष तरी कोणता ! ! जशी ज्याची समजूत तसा त्याचा अभिप्राय असावयाचा. कर्नल फेर यांस जसें वाटलें तसें त्याणीं लिहिलें यांत त्यांच्या गैरसमजुती खेरीज दुसरा दोष त्यांस आपण लावूं शकत नाहीं. परंतु जो मजकूर फिर्यादी सांगत नाहीं तो जर कर्नल फेर यांच्या हकीकतींत आला तर तो मुद्दाम त्याणी गायकवाडाच्या राज्यकारभाराचा उगाच बभ्रा करण्याकरतां लिहिला असेंच मानणे भाग येते. मगनलालभाई याणी रेसिडेंट साहेब यांजपुढे जबानी दिली ती अक्षरशहा वाचून पाहतां व कमिशनापुढे जें कांहीं त्यानीं सांगितले तेही लक्षपूर्वक अवलोकन करतां त्यांत खंडेराव महाराज याणीं वीस लक्ष रुपयांची चिठ्ठी लिहून देणे भाग पाडण्यासाठीं मगनभा- ईची मातोश्री हरकुवरबाई यांस त्यांच्याच हवेलीत एक महिनाभर प्रतिबंधांत ठेविलें होतें आणि त्यांच्या विश्वासू तीन गुमास्त्यांस कैद केलें होतें, व दरबारच्या इच्छेप्रमाणें चिट्टीवर सही करीपर्यंत त्या बाईकडे कोणासही जाऊं देत नवते, असे कांहीं कोठें लिहिलेले आढळत नाहीं.

  • "Khunderao Gaekwar first employed the bond to plunder Hari Bagti's firm, of 6 lacs of Rupees, and Malharrao Gack war has employed the same bond to plunder the petitioner of jewels amounting to 5 lacs of rupees in value, under the shallow disguise of performing an act of generosity. ( Baroda Blue Book No I. Page 289.) + ब्ल्यू बुक नंबर १ पान १७७ व २८७ पहा.