पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचे कमिशन. ( १६५ ) खंडेराव महाराज याणी वीस लक्ष रुपयांची चिट्टी लिहून घेतली, व त्यापैकी सहा लक्ष रुपये वसूल करून घेतले येणेंकरून त्या पेढीस मोठा धक्का बसला यांत कांहीं संशय नाहीं, परंतु त्याबद्दल खंडेराव महाराज याणी या पेढीवर अन्यायाचा जुलूम केला असे काही पेढीच्या मालकास खरे करून देता आले नाहीं. ते येवढेच म्हणाले की, वीस लाख रुपयांची चिट्टी लिहून दिल्यानंतर त्या रुपयांची फेड दुकानांतून झाली असा पुरावा सांपडला, आणि त्यावरून खंडेराव महाराज यांची खात्री झाली कीं, आपलें घेणें दुकानाकडेस राहिले नव्हते, परंतु तो पुरावा कोणता हे काहाँ पेढीवाल्यांनी कमिशनास स्पष्टपणे कळविलें नाहीं, आणि या त्यांच्या म्हणण्यावरून एक गोष्ट सिद्ध होते कीं, ज्या समयीं चिट्टी लिहून घेतली त्या समयी हरीभक्तीवाल्यांजवळ असा काही पुरावा नव्हता की, खंडेराव महाराज रुपये मागत होते ते त्यांस देणें नव्हतें. चिट्टी लिहून दिल्यानंतर त्याबद्दल पुरावा सांपडला असे म्हणतात. हा पुरावा कोणता हें कमिशनास पेढीवाल्यांनी कळविले असतें तर खंडेराव महाराज यांच्या कृत्यांत न्याया- न्याय किती याचा निर्णय करितां आला असता. सर लुईस पेली याणी रेसिडेन्सीचा चार्ज घेतल्यावर हें प्रकरण हातांत घेतले तेव्हां मल्हारराव महाराजानी त्यांस अशी सूचना केली होती की, वीस लक्ष रुपयांची चिठ्ठी अन्यायाने लिहून घेतली असे पेढीवाले म्हणतात, तर त्याणी ती चिठ्ठी अमानत ठेवावी आणि मीही त्यांजकडून आणिलेले जवाहीर अमानत ठेवितों, आणि चौकशी होऊन नवा निकाल व्हावा, परंतु ही गोष्ट हरीभक्तीवाल्यांस कबूल झाली नाहीं. सर लुईस पेली याणी मगनलालभाई याच्या दाव्याचा महाराजानी कोणत्या रीतीनें निकाल करावा याबद्दल नंबर २३९२ ता० १६ डिसेंबर सन १८७४ रोजी यादी लिहिली त्यांत या तक्रारीबद्दल असें लिहिलें आहे कीं, महाराजानी सूचना केल्याप्रमाणे चिठ्ठीचे रुपये देणें नवतें असा पुरावा करण्याचें जोखम हरिभक्तीवाले आपल्या अंगावर घेत नाहींत. चिट्टीप्रमाणें रुपये घेणें होते असा पुरावा करण्याचा बोजा महाराजांवर टाकितात. चिट्टी आणि जवाहीर अनामत ठेवून पुनः चौकशी करावी आणि नवा निकाल करावा असें महाराजांचे म्हणणेही त्यास कबूल नाहीं. याप्रमाणे हें प्रकरण ज्याची गुंतागुंत कधींही काढतां येणार नाहीं अशा कडाकुटीचें आहे यासाठी त्याबद्दल महाराजांस मी कोणतीही सला देण्यास शक्त नाहीं. * "Your Highness in the statement has proposed that the complainants should prove their assertion of the chittie being invalid. But this the complainant declined to do, and threw the onus of proving the chittie to be valid on your Highness. "Your Highness also proposed that both chittic and jewellery should be placed in deposit, and a general settlement be arrived at by inquiry. But this proposal also the complainants declined to accedc. "Meantime the head of the Firm is a minor, and has to trust to his Moonim and others to plead his case. which "On the whole, as I said above, I find myself unable to advise in this matter, appears to me to be an inextricable mess. (Baroda Blue Book No. 4 Page 96. )