पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १६४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- ३. मल्हारराव महाराज यांस गादीनशीन होण्यापूर्वी पाऊण लक्ष रुपये कर्ज दिलें होतें तें न देतां त्याबद्दल फारकती लिहून घेतली. ४. हिरे आणि दुसरे जवाहीर मल्हारराव महाराज याणी जबरीने नेलें. ५. नीळ मण्याचा हार चारपासून पांच लक्ष रुपयेपर्यंतच्या किंमतीचा मल्हारराव महाराज पाणी जबरीने नेला. सरकारी दुकानांतील किल्लेदारीची जागा मला दिली असतां मी त्याबद्दल हरीभक्तीच्या दुकानांतून चाळीस हजार रुपये नजराणा देववीन असे तुमचा गुमास्ता गोवरधन याणे कबूल केलें आहे, सबब ते रुपये तुम्ही द्यावे असे म्हणून जबरीने रुपये २५००० पंचवीस हजार घेतले. ७. इनामी चार गांवें जप्त केली, आणि बीस हजार रुपयांची रोख नेमणूक बंद केली. ८. गिरधरलाल मुनीम यास काढून टाकण्याची परवानगी देण्याबद्दल रुपये पंचा- हत्तर हजार नजराणा घेतला, आणि पुनः त्यास चाकरीस ठेवणे भाग पाडले. याबद्दल दरबारानी जबाब दिले ते. १. दत्तविधान मंजूर करण्याबद्दल जो नजराणा घेतला तो शिरस्त्याप्रमाणें आहे. २. वीस लक्ष रुपयांची चिट्टी परत दिली आहेच. सहा लक्ष रुपये खंडेराव महाराज याणी घेतले ते परत देण्याचे त्यानी कबूल केले होते असा काही पुरावा नाहीं. ३. महाराजांकडे खाजगी घेणें होतें त्याबद्दल दुकानवाल्यांनी स्वसंतोषाने फार- कती दिली आहे. ४. राज निळमण्याचा हार आणि दुसरे जवाहीर चौदा लक्ष रुपये माफ करून चिट्टी परत दिली त्याच्या मोबदल्यांत दिले आहेत. ५. गिरधरलाल मुनीम यास कामावरून दूर करण्याबद्दल रुपये ७५००० हजार नजराणा देऊन दरबारची परवानगी मिळविली. पुढे त्या मुनीमावांचून दुकानचा व्यवहार चालेना सबब शेट याणी आपण होऊन त्यास पुनः चा- करीवर ठेविलें. ६. या दुकानचें कांहीं आतां दरबारास देणे राहिलें नाहीं, सबब इनामी गांवें आणि रोख नेमणूक जप्त केली आहे. - मगनलालभाई याणी दरबारावर जे दावे केले त्या प्रत्येक दाव्याबद्दल तपशिलवार ● पीगत सांगितली पाहिजे असे त्यांत महत्व आहे. ह.