पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचें कमिशन. ( १६३) मागे सांगितलेच आहे कीं, बडोद्याच्या आणि पुण्याच्या दरबारामध्ये पैशासंबंधी जो कांहीं व्यवहार व्हावयाचा तो सर्व हरिभक्तीच्या पेढीच्या द्वारे होत असे. त्या संबंधी काहीं रकमा हरिभक्तीकडे राहून गेल्या होत्या असे दिसते. खंडेराव महाराज याणी खोटें निमित्य करून द्रव्यापहार केला असे कांहीं या पेढीकडून कमिशनापुढे देखील सांगण्यांत आले नाहीं. दुकानच्या चोपडयांवरून त्यांचे आंगीं दरबारचें देणे लावून खंडेराव महाराज याण हरकुवरबाईपासून व्याजसुद्धां वीस लक्ष रुपयांची चिठ्ठी लिहून घेतली. आतां ही घरफोडी कोणी केली ? संवत १८५४ च्या सालच्या चोपड्यांत गायकवाडाच्या नांवें रकमा जमा आहेत हे खंडेराव महाराज यांस समजले कसे ? याविषयी लोक वदंता अशी आहे कीं, हें सर्व कृत्य पितांबर शिवलाल याचें होतें, आणि ह्या लोकवदंतेस प्रमाणे आहेत. एक तर पितांबरभाई यांचे त्या पेढीच्या मालकाबरोबर सलूख राहिले नव्हतें, आणि दुसरे त्यांच्या इतका दुसरा कोणी इतक्या वर्षांची मागील माहिती सांगेल असा माहितगार नव्हता, आणि त्यांस खंडेराव महाराज याणीं गांव इनाम दिले तेव्हां तर लोकांची पक्की खात्री झाली की, या कृत्याचा कर्ता काय तो तोच होता. अगोदरच ही मोठी पेढी जीर्ण दशेस आली होती आणि त्यांत तीस आणखी वीस लक्ष रुपयांची चट लागण्याचा प्रसंग आल्यामुळे तीस ज्यास्त जरा आली. खंडेराव महाराज यांचे हयातीत दोन हप्ते मिळून सहा लाख रुपये मात्र वसूल घेतले होते. त्यानंतर सहा कर्षेपर्यंत महाराज हयात होते, परंतु त्याणी बाकीच्या हप्त्यांबद्दल तगादा केला नव्हता. मागें एक ठिकाणीं असें सांगितलेच आहे कीं, महाराजांच्या लहरीप्रमाणे एकदां एकादी गोष्ट होऊन गेली म्हणजे त्याबद्दल त्यांस पश्चाताप होत असे, आणि ते समूळ नाश होईपर्यंत कोणाचाही अंत घेत नसत. त्याप्रमार्णे पाहिलें असतां पासष्ट वर्षांवरील घेण्याबद्दल पडत्या दशेस आलेल्या आपल्या राजधानींतील सावकारापासून वीस लक्ष रुपयांची चिट्टी आपण लिहून घेतली हैं नीट केलें नाहीं असें महाराजांस वाटून त्याणी पुढील हप्ते घ्यावयाचे नाहींत असें मनांत आणिले असेल तर तें संभवनीय आहे. येथपर्यंत हरीभक्तीच्या पेढीची मागील हकीकत संपली. आतां कमिशनापुढें या पेढीच्या मालकाने मल्हारराव महाराज यांजवर कोणत्या फिर्यादी आणिल्या त्याबद्दल सांगावयाचे आहे. मगनलालभाई याणीं कमिशनापुढे खालीं लिहिलेलीं गाऱ्हाणी सांगितलीं. १. खंडेराव महाराज याणीं पांच लक्ष रुपये नजराणा घेतला तेव्हां माझ्या दत्तविधानास मंजुरी दिली. २. मागील घेणें बाकी राहिलें आहे असे निमित्त काढून माझी मातोश्री हरकुवर- बाई यांजपासून वीस लक्ष रुपयांची चिट्टी लिहून घेतली, आणि त्यापैकी सहा लक्ष रुपये वसूल घेतले. चिट्टी मल्हारराव महाराज याणी परत दिली, परंतु रुपये परत दिले नाहींत. खंडेराव महाराज याणीं रुपये परत देण्याचे कबूल केले होते.