पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड यांच्या कारकीर्दीतील खरा इतिहास. DO(1 भाग १. मल्हारराव महाराज यांच्या जन्मापासून बडोद्याच्या गादीवर ते आले तोपर्यंतचें संक्षिप्त वर्तमान. व गाय- महाराज मल्हारराव यांचा जन्म शके १७५४ मार्गशीर्ष शुद्ध ३ रविवारी झाला. बाळ- पणी हे फार छांदिष्ट होते, व त्यांजवातून त्यांचे तीर्थरूप व मातोश्रींस बराच त्रास झाला होता असे म्हणतात. यांच्या लहानपणीच लोक त्यांस अर्धवेडा म्हणत असत. कवाड यांचे वंशांत दमाजीराव यांचा पुत्र सयाजीराव, आणि गोविंदराव यांचा पुत्र आनंदराव हे मनाने कांहांसे विकल होते. यावरून गायकवाड यांच्या वंशांत कोणी तरी असा एक जन्मतो अशी_लोकांची समजूतच पडून गेली होती. सयाजीराव महाराज परलोकवासी झाले, तेव्हां मल्हारराव महाराज यांचे वय १५ वर्षांचें होतें. गणपतराव महाराज गादीवर असतां त्यांजबरोबर मल्हारराव महाराज यानीं कांहीं कज्या भांडण केले होते असे कांही लौकिकांत दिसून आले नाहीं. खंडेराव महाराज हे गणपतराव महाराज यांचे अभावी गादीचे वारस होते, त्यामुळे गणपतराव महाराज यांजबरोबर द्वेष बुद्धीने वागण्याचे मल्हारराव यांस कांहीं प्रयोजनही नव्हते. महाराज यांचे लग्न त्यांच्या तीर्थरूपानी, बाघोजीराव खानवेलकर यांची कन्या भागूबाई यांजबरोबर केले होते. या जोडप्याचें रहस्य फार उत्तम होते असे म्हणतात. मल्हारराव गणपतराव महाराज निवर्तल्यानंतर खंडेराव महाराज गादीनशीन झाले. सयाजीराव यांच्या पांच पुत्रांपैकी त्या वेळेस दोघेच जिवंत राहिले होते. एक खंडेराव व दुसरे मल्हा- रराव. उभयतां बंधूंमध्ये एक दोन वर्षे बरेंच रहस्य होतें, परंतु ते प्रेम फार कालपर्यंत टिकलें नाही. मल्हारराव महाराज कांहीं जादू करून आपणास मारविण्याच्या खटपटीत आहेत असे खंडेराव महाराज यांस वाटले, आणि त्याच आरोपावरून मल्हारराव महाराज यांचा जिवल ग मित्र बळवंतराव राहुरकर यास बडोद्यांतून काढून दिले होते. खंडेराव महाराज यांचे मनांत त्यांस बेड्या घालून तुरुंगांत टाकावयाचे होते, परंतु मल्हारराव महाराज त्यांच्यासाठी आपला प्राण देण्यास तयार झाले होते; यामुळे खंडेराव महाराज यांच्याने त्यांस दुसरे कांहीं शासन . करवले नाहीं. सन १८५७ साली इंग्रज सरकारची पलटणें फितूर होऊन या देशांत मोठें बंड झालें होतें, तेव्हां गुजराथेतही धाडशी मनुष्यांनीं फितूर करण्याचा बेत केला होता. त्यांपैकीं जे लोक पकडले गेले त्यांच्यापासून असे निदर्शनास आले होते की, त्या बंडखोर लोकांचा