पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १६२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. आपण कैद झाल्यावर प्रयत्न चालविला. ही गोष्ट सुरजराम यानीं रेसिडेंटास कळविली आणि त्यांच्या मसलतीने सुरजराम यानी लांचेबद्दल वीस हजार रुपये घेण्याचे कबूल केलें. बाबा नाफडे यांचा अनुचर मोतिचंद हिराचंद एका गाडीत रुपये ९३०० घेऊन सुरजराम याचे घरी गेला, आणि तेथें त्यास पूर्वी संकेत करून ठेविला होता त्याप्र- माणे पकडले. त्याणे खरी गोष्ट सांगितली, आणि आणखी रुपये ६५०० आपल्या घरी आहेत म्हणून कळविलें, व ते सर औटराम यांचे सुचनेवरून दरबाराने जप्त केले. मोतिराम यास गायकवाडांचे स्वाधीन केला. सुरजराम याचे येथें जे रुपये धरले ते सर औटराम यांचे शिफारशीवरून बडोदे कापांत साहेब लोकांच्या स्नानासाठी वगैरे जागा तयार करण्याकरितां खर्च करण्याविषयीं इंडिया सरकारानीं परवानगी दिली. जोयताबाईनी त्यानंतर बोर्ड आफ डायरेक्टरपर्यंत कितिएक दाव्याबद्दल फिर्यादी केल्या त्यापैकीं त्यांच्या चरितार्याबद्दल जे त्यांचं म्हणणें होतें त्याजविशीं वाजवी बंदोबस्त करून व त्यांजला कर्ज झाले होते त्याबद्दलची व्यवस्था करून दत्तक घेण्याची परवानगी द्यावी म्हणून त्यांचे तिसरे मागणे होते ते नाकबूल केलें. सन १८५५ चे सालों सर जेम्स औटराम याणी बाहेदारीबद्दल रिपोर्ट केला त्यांत हरिभक्तीस दिलेली जामिनकी वंशपरंपराची नसून बेचर सामळ सन १८४५ चे सालांत मेले तेव्हांच रद्द झाली असें त्याणी सरकारास कळविले, पण अशी शिफारास केली कीं, पुरुषोत्तमदास यांचे हयातीपर्यंत ती जरूरीच्या कारणासाठी चालू ठेवावी, परंतु ही गोष्ट इंडिया सरकारांनी कबूल केली नाहीं. महालक्ष्मीबाई सन १८६० मध्ये मरण पावली, आणि त्या योगाने इंग्रज सरकारची जामिनगिरी सहजच अगदी रद्द झाली.* पुरुषोत्तमभाई संवत १९१८ च्या जेष्ट महिन्यांत मरण पावले. हे लहानपणापासून शरीरानें फार अशक्त होते. त्यांस पुत्रसंतान नवते सबब त्यांची पत्नी हरकुवरबाई याणी हल्लींचे मालक मगनलालभाई यांस दत्तक घेतले. खंडेराव महाराज याणी त्याबद्दल पांच लक्ष रुपये नजराणा घेतला तेव्हां या दत्तविधानास त्यानी आपली मंजुरी दिली. या दुकानचा जुना मुनीम पितांबर शिवलाल होता, हा फार प्रामाणिक मनुष्य होता, अशी त्याची लोकांत ख्याति होती; परंतु त्याने या पेढीच्या संबंधाने शेवटी जे वर्तन केले तेणेंकरून त्याच्या यशास काळिमा लागली. हरकुवरबाईचें आणि पित्तांबर याचे सूत्र जमले नाही सबब त्यानीं त्याला मुनीमगिरविरून काढिलें आणि त्या स्वतः दुकानचे सर्व कामकाज पाहूं लागल्या. असे सांगतात की, ही बाई फार हुशार होती. सन १८६३ च्या सालीं खंडेराव महाराज याणी या पेढीवर असे मागणें केलें कीं, पासष्ट वर्षांपूर्वी म्हणजे संवत १८५४ च्या सालांत गायकडांनी सुमारे पंधरा लक्ष रुपये या पेढींत ठेविले होते ते परत मिळाले नाहींत ते व्याजसुद्धां द्यावे. हरिभक्तीच्या पेढीचा वृत्तांत वालिस साहेबांच्या बुकाच्या आधाराने लिहिला आहे.