पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचे कमिशन. ( १६१ ) सन १८५० चे सालांत अउटराम साहेब रजेहून परत आल्यानंतर त्यांस असें समजले की, अद्याप पंचांचे काम चालू आहे, परंतु निकाल झाला नाहीं, आणि जोय- ताबाई मुंबई सरकारास अर्ध्या करीत असून पंचांच्या द्वारे निकाल करण्यास त्या राजी नाहीत. सर अउटराम याण बाबा नाफडयावर एक मुलाचे हरण केल्याबद्दल व दुसरा त्यास जिवे मारल्याबद्दल असे दोन चार्ज ठेवून त्याबद्दलची चौकशी करण्यासाठी त्यास कैद करवून न्यायाच्या कोर्टापुढे आणविले. जोयताबाई यांस निर्दोष ठरविण्याकरितां गायकवाड सरकारच्या दिवाणानी उघडपणे प्रसिद्ध केले की, जोयतीबाई ही खऱ्या मुलाची आई होती. आणि त्याजवर आणिले- त्या आरोपापासून त्या अगदीं निष्कलंक झाल्या ही गोष्ट लोकांत चांगली प्रसिद्धीस यावी म्हणून जोयताबाईस दरबारांत आणून त्यांस महाराजानी पोषाख दिला. ज्या पंचांपुढे बाबा नाफडे आणि गायकवाड सरकारानी, आणि नंतर त्यांजपासून साडे यांचा तपास झाला त्यांणी त्यांस अपराधी ठरविले, त्याबद्दल त्यांस बेडीसहीत सात वर्षेपर्यंत कैदेत ठेवावे, पंधरा हजार रुपये दंड घ्यावा अशी शिक्षा केली. बाबा नाफडे यांस शिक्षा झाली त्या कामांत सर औटराम साहेब यांचे रपोटाप्रमाणे मध्यस्ती करण्याचे मुंबई सरकारांनी नाकबूल केलें आणि असा ठराव केला की, या पेढीचे मुनिमास त्याच्या अपराधाबद्दल ज्यापेक्षां शिक्षा झाली आहे त्यापेक्षां ही पेढी आतां बि- टिश सरकारचे आश्रयास पात्र राहिली नाहीं. दुकानचे हिशेब तपाशीत असतां त्यांतून असे उघडकीस आले की, १७,०५,०४३ ४११४९ ची शिलकेंत तूट आहे. याबद्दल बाबा नाफड्या हिशेब देईना तेव्हां त्याची मिळकत आणि त्याच्या मुलाच्या नांवें जीं दुकाने चालतात ती जप्त करावीं असें रेसिदेंट याग दरबारास सुचविलें. या गोष्टीत देखील मध्ये पडण्याचे मुंबई सरकारांनी नाकबूल केलें, परंतु सर औटराम साहेब याण पुनः मुंबई सरकारास आग्रहपूर्वक विनंती केल्यावरून त्याणी पूर्वीच्या हुकुमांत येवढाच फेरफार केला कीं, मि० डेव्हिस सर औ- टराम यांचे जागेवर आलेले रेसिडेंट याणी महाराजांस सला द्यावी कीं, त्याणी हिशेब देण्याबद्दल अथवा तूट आली आहे ती रक्कम भरून देण्याबद्दल बाबा यास जबाबदार धरावे. हिशेबाचे तपासांत सर औटराम यांस असे दिसून आलें कीं, बाबा नाफडे याणें दुकानांतील पुष्कळ द्रव्य लांच देण्यामध्ये खर्च केलें, व पुष्कळ पैसा इंग्रज सरकारच्या मुलखांत पाठवून दिला. मुंबई कौन्सिलच्या मेंबरांस लांच देण्याची देखील त्याणें लालसा धरली होती असे त्यास वाटले. नरसो लक्ष्मण रोसेडेंसीचे दप्तरदार यांस बाबा नाफडे याजकडून पैसा मिळत असे व त्याखेरीज त्याची दुसरी गैर वर्तणूक होती असे सर औटराम याणीं स्थापीत करून त्यास कामावरून दूर केलें. नरसोपंत याचे जागेवर सुरजराम गंगाराम यांस दप्तरदार नेमिल्यावर त्यांजला लांच देण्याविशीं बाबा नाफडे या २१.