पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १६० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- आणि तिचें आईबापांस व त्या मुलास कबजांत ठेविण्यासाठीं मनुष्ये पाठविली. जोय- तीबाईची आई लाडबाई पळून गेली. जोयतीबाईचा बाप भाणाभाई सांपडला त्यास त्याच्याच घरांत कैदेत ठेविलें, आणि त्या मुलास दुकानावर आणिलें. दुसरे दिवशी त्या मुलावरील सर्व अलंकार काढून घेतले, आणि त्या मुलास ज्या बागेमध्ये ते कोळी लोक आणून ठेविले होते तेथे नेलें, आणि त्यास कोळी लोकांचे स्वाधीन केले. कोळी लोकांनी प्रथम त्या मुलास आम्ही काय करावे म्हणून तक्रार केली, परंतु त्यांस कांहीं रोख पैका व आठ मण धान्य दिले होते, यामुळे त्या बिचाऱ्यांस तो मुलगा घेऊन अमलियारा येथे जावे लागलें. बाबा याणे त्या लोकांबरोबर आरब लोकांचा पहारा दिला होता. दोन दिवस तें मूल त्या कोळी लोकांच्या येथे राहूं दिलें. नंतर तेथून त्यास काढून एका ओस घरांत नेऊन ठेविलें. दुलिया नांवाचा कोळी याची बायको मात्र दिवसांतून तीन वेळां त्या मुलास स्तनपान करविण्यासाठी तेथे जात असे. या खेरीज तेथें कोणास जाऊं देत नसे. तीन महिन्यानंतर ते मूल महामारीचा वाखा होऊन मेलें. सन १८४९ चे फेब्रुवारी महिन्यांत अक्टिंग रेसिडेंट आंडु साहेब याणी जी बातमी त्यांस कळविली त्याबद्दल मुंबई सरकारांत रिपोर्ट केला त्याचे जबाबांत त्यांस असें उत्तर आले की, इंग्रज सरकारानी ज्याची जामिनकी केली आहे त्याजकडून फिर्यादी झाल्या- वांचून घडलेल्या गोष्टीच्या संबंधाने लक्ष देण्याचे काही प्रयोजन नाहीं. नंतर जोयती- बाईने मुंबई सरकारास अर्जी केली, आणि त्यावरून रेसिडेंट यांस रिपोर्ट करण्याविषयीं हुकूम झाला. रेसिडेंटानें दरबारास अशी सूचना केली की, त्याणी त्याबद्दलचा पंचांच्या विद्यमानें तपास करावा. त्याप्रमाणे पंचांनी त्याबद्दल तपास केला, परंतु ते आपला ठराव सांगेनांत; कारण दरबारचा बाबास पक्ष होता. इतक्यांत कर्नल अउटराम रजा घेऊन युरोपांत गेले, आणि त्यांचे जाग्यावर क्या- प्टन फ्रेंच साहेब यांची नेमणूक झाली. त्याणी मुंबई सरकारास असा रिपोर्ट केला कीं, या दोघीही सवतींमध्ये जे वाद आहेत त्याबद्दल पंचांचे विद्यमाने निकाल करावा, आणि पंचांच्या ठरावाप्रमाणे वागण्याविशीं दोघींपासून राजीनामे घ्यावे. जोतीबाईने ही तोड नाकबूल केली. तिला बाबा नाफडे याने कपटाची मसलत करून बनावटी कागद केले, खोटे साक्षी उभे केले त्याबद्दल व तिची जी बेअब्रू केली होती, व तिच्या बापास कैदेत ठेविलें होतें त्याबद्दल त्यास शासन करावयाचें होतें. तिची अशी तक्रार होती की, मला इंग्रज सरकारची जामिनकी आहे. यास्तव याबद्दलची चौकशी ब्रिटिश अधिकाऱ्यांपुढे व्हावी. परंतु मुंबई सरकाराने त्यांस असें कळविलें कीं, ज्यापेक्षां तुम्ही लवादाचे मार्फत वादाचा निकाल करून घेण्यास राजी नाहीं त्यापेक्षां आतां तुमच्या- साठी सरकार कांहींएक मध्यस्ती करणार नाहीत.