पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मीडचें कमिशन. (१५९) बाबा नाफडे याणी लिहून घेणार सदहू कोळी आणि लिहून देणारा जोयताबाईचा बाप भाणाभाई असा एक बनावटी दस्ताऐवज तयार केला, आणि त्याजवर भाणाभाई- च्या नांवाची खोटी सही केली, आणि तो दस्ताऐवज त्या कोळी लोकांच्या स्वाधीन केला. त्यांत कोळी लोकांपासून मुलगा विकत घेतल्याचे लिहिले होते, व त्याबद्दल आणखी दरसाल रुपये २०० कोळी यास हरीभक्तीचे दुकानांतून द्यावे असा करार लिहिला होता. बाबा याचे शिकवणीप्रमाणे ते कोळी लोक तो दस्ताऐवज घेऊन भाणा भाईकडे गेले आणि त्यास ह्मणाले कीं, तुम्ही दस्ताऐवज लिहून दिला आहे त्याप्रमाणे करावें, अगर आमचा मुलगा आम्हास परत द्यावा. भाणाभाई याणें त्या लोकांस शिव्यागाळ करून काढून दिलें. कोळी लोकांनी मोठी आरडाओरड करून ती रचलेली गोष्ट एकत्र जमलेल्या लोकांस सांगू लागले, आणि हरीभक्तीच्या दुकानावर येऊन त्याणी तो खोटा दस्ताऐवज बाबा नाफडे यास दाखवून त्याप्रमाणे आपल्याशी केलेला करार पुरा करावा म्हणून मागणे केलें. बाबाने त्यांची हकीकत लिहून घेतली, तो दस्ता- ऐवज परत घेतला आणि त्यांस शंभर रुपये देऊन त्यांचे गांवी वाटे लाविलें. ज्या मध्यस्थीने हे कोळी लोक पैदा केले होते त्यास कंपनी शिक्याचे रुपये १७०० देण्याचा करार होता, परंतु त्या लुच्चया लोकांनी ती मसलत उघड करण्याचे भय घालून बाबा पासून दुकानांतून पुष्कळ रुपये उपटले. ही त्या लोकांची लुच्चे- गिरी पाहून मुलास त्यांचे हवाली करण्याचे बाबाचे धैर्य होईना. त्यास असे भय वाटलें कीं, मी त्या लोकांस पैसे देण्याचे बंद केले की, ते लागलीच माझे कपट उघड करून ब्रिटिश अधिकाऱ्यांस ती गोष्ट कळवितील. यासाठीं तो आतां मुलाचे आम्ही आईबाप आहोंत असें म्हणणारे दुसरे लोक शोधूं लागला. त्याणें गांवांत अशी बातमी उठविली कीं, मिठापुरचे कोळी लोक भाणाभाईकडे आपला मुलगा मागावयास गेले तेव्हां त्याणें त्यांस असे सांगितलें कीं, तुह्मापासून खरेदी केलेला मुलगा तर देवी येऊन मेला, आणि त्याचे ऐवजी दुसरा मुलगा आणणे मला भाग पडलें. बाबा याणे कांहीं कोळी लोक मळियारा गांवाहून बोलाविले. हें गांव हरीभक्तीच्या दुकानांत गहाण ठेविलें होतें, आणि त्यास आपल्या बागेत ठेविलें. दादामिय्या म्हणून एक हवालदार होता तो या कपट मसलतीत सामील होईना. सबब त्यास बाबाने बेड्या घालून कैदेत ठेविलें, आणि तो कबूल होईपर्यंत त्याचें अन्न पाणी वर्ज केले. बाबाचे म्हणण्याप्रमाणे शेवटी त्या बिचाऱ्यास लिहून देणे भाग पडलें कीं, जोतीबाईच्या आईच्या शिकवणीवरून मी अमलीयारा [ महिकाठ्यांत कोळ्यांचे एक लहानसें संस्थान आहे. ज्यास भाथिजीचे अमलियारे म्हणतात. ] चा कोळी दुलीया याजला रुपये शंभर देऊन एका रात्रीं मुलगा घेऊन आलों, आणि तो जोयतीबाईंच्या आईबापांच्या स्वाधीन केला. या लेखावर त्या हवालदाराने सही केल्यावर त्यास ४१५ रुपये देऊन बाबाने सोडलें. जरूरीचीं साधने हस्तगत झाल्या बरोबर बाबाने लागलीच प्रसिद्ध केलें कीं, जोय- तीबाई ही पाखंडी आहे, आणि तिला त्याणें दुकानचे एका खोलींत कैदेत ठेविली,