पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १५८ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. बाबावर फार विश्वास असे, परंतु तो मनुष्य फार वाईट चालीचा होता असे इंग्रज सरका- रच्या दृष्टोत्पतीस आलें होतें. * बेचरभाई मरण पावले तेव्हां त्यास दोन स्त्रिया होत्या. एक लक्ष्मीबाई आणि दुसरी जोय- तीबाई. लक्ष्मीबाईस पुरुषोत्तम नांवाचा मुलगा तिच्या नवऱ्याच्या मरणापूर्वी तीन वर्षे अगोदर झाला होता. बेचरदास मेला त्यापूर्वी त्याची दुसरी बायको जोयताबाई गरोदर आहे असे प्रसिद्धीस आले नव्हते. त्याच्या मरणाच्या दिवशी मात्र असे प्रसिद्धीस आणिलें कीं, ती गरोदर आहे. पुढे ता० २२ डिसेंबर सन १८४५ रोजी तिला पुत्र झाला असें प्रसिद्धीस आणिले. मुलाच्या जन्मकाळी जे कांहीं संस्कार होतात ते व प्रमोदजनक समारंभ यथास्थीतपणे झालें. बारशाकरितां गायकवाडांची स्वारी गेली होती. रेसिडेंट मात्र त्या समारंभास आले नव्हते. ता० १३ फेब्रुवारी सन १८४६ रोजों त्यांच्या ज्ञातीच्या सांप्रदायाप्रमाणे मुलाचा वाग्वरण संस्कार झाला. गुजराथेंत कितीएक जातींमध्यें अशी चाल आहे की, मुलगा अगर मुलगी झाली म्हणजे अगदी बाल्यावस्थेत म्हणजे कधीं कधीं दहा दिवसांत देखील वागदान विवाहावीध करण्याची चाल आहे. मुलाचा जन्म झाल्यावर एक वर्षाहून अधिक दिवसपर्यंत कायदेशीर वारशाविशी कांहींएक प्रश्न निघाला नव्हता, व तो जोयतीबाईच्या उदरी जन्मला नाहीं अशीही शंका निघाली नव्हती. त्याची सापत्न मातोश्री लक्ष्मीबाई इणे आणि ज्ञातीचे लोकांनी तो बेचर सामळ याचा त्याच्या मरणानंतर जन्मलेला मुलगा ह्मणून कबूल केला, आणि सर्वांनीं हिंदुधर्माप्रमाणे तो लक्ष्मीबाईचा मुलगा पुरुषोत्तम बेचरदास यांचे मिळक- तीत अंशभान आहे असें मानिलें. सन १८४९ चे सालांत जोयतीबाईस बाबा नाफडे याणीं दुकानांतील भांडवला- मध्ये कांहीं घोटाळा केला आहे असे कळून आल्यावरून तिणे त्याबद्दल बाबावर आरोप आणिला. बाबा नाफडे याणें जोयतीबाईची खराबी करून त्या संकटांतून मुक्त व्हावें असा निश्चय केला. लक्ष्मीबाई त्यास अनुकूळ झाली आणि दुकानांतील सर्व लोक बाबाचे ताबेदार असल्यामुळे त्यास अनुकूळ होते. जोयताबाईचें मातेरें करण्यासाठी बाबा नाफडे याणें तिचा मुलगा हा अनौरस आहे असें ठरवावें अशी युक्ती योजिली. यासाठी त्याणें ललू भगवान या नांवाच्या मनु- ष्यास पेटलाद परगण्यांतील मिठापूर गांवीं पाठविलें. याणे त्या गांवच्या ठाकुरांच्या मदतीनें रघुनाथ नांवाचा एक कोळी आणि त्याची बायको हे आम्ही त्या मुलाचे आई- बाप आहोत, आणि गुमान नांवाचा कोळी मी मुलाचा मामा आहे असे म्हणणारे तीन इसम पैदा केले, आणि त्यांस बडोद्यास घेऊन आला. बाबाने त्या लोकांस गुप्तपणे आपल्या बागेत आणून ठेविलें, आणि त्यांनपाशीं कोणाचा प्रवेश होऊं नये ह्मणून त्यांजवर आपल्या चाकरांतील आरब लोकांचा पहारा ठेविला.

  • बडोद्याचे रेसिडेंट कर्नल वालेस साहेब यांच्या बुकाचें पान ५४९ पहा.